Turichya danyache Vade : सध्या हिवाळा सुरू आहे. बाजारात तुरीच्या शेंगा आल्या आहेत. या हंगामात ओल्या तुरीच्या दाण्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. तुम्ही ओल्या तुरीच्या दाण्यापासून झुणका, चटणी, भाजी खाल्ली असेल पण तुम्ही कधी तुरीच्या दाण्याचे वडे खाल्ले आहे का? होय. तुरीच्या दाण्याचे वडे. तुरीच्या दाण्याचे वडे हा विदर्भात बनवला जाणारा पदार्थ आहे. हा विशेष करुन विदर्भात बनवला जातो. त्या भागात तुरीच्या शेंगाचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे हिवाळ्यात तुरीच्या दाण्याचा भरपूर वापर केला जातो.
तुरीच्या दाण्याचे वडे तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. हिवाळ्यात गरमा गरम वडे खाण्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. तुरीच्या दाण्याचे वडे सुद्धा कुरकुरीत आणि तितकेच स्वादिष्ट वाटतात. हे वडे कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लगेच ही सोपी रेसिपी जाणून घ्या. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी तुरीच्या दाण्याचे वडे बनवू शकता. हे वडे चवीबरोबर तितकेच हेल्दी असतात. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून ही रेसिपी करा.
साहित्य
- ओल्या तुरीचे दाणे
- तांदळाचे पीठ
- हिरवे मिरचे
- जिरे
- धने
- हिंग
- हळद
- मीठ
- पांढरे तीळ
- पातीचा कांदा
- कोथिंबीर
- मीठ
- तेल
हेही वाचा : Peruchi koshimbir : अशी बनवा पेरूची कोशिंबीर; ही सोपी रेसिपी माहितीये का?
कृती
- सुरुवातीला ओल्या तुरीचे दाणे घ्या.
- त्यात हिरवे मिरचे, जिरे, धने आणि लसणाच्या पाकळ्या घाला.
- आणि हे सर्व एकत्रित पाणी न घालता मिक्समधून बारीक करा.
- एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या
- या मिश्रणात हिंग, हळद, पांढरे तीळ, पातीचा कांदा, कोथिंबीर घाला.
- या मिश्रणात तांदळाचे पीठ घाला
- शेवटी त्यात चवीनुसार मीठ घाला.
- सर्व मिश्रण एकजीव करा.
- तळहाताला तेल लावा आणि छोटे छोटे गोळे करुन हातावर आवडेल त्या आकाराचे वडे थापून घ्या.
- हे वडे गरम तेलातून काढून घ्या
- तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.
- तांबुस रंग येईपर्यंत वडे कुरकुरीत तळून घ्या.
- आणि गरमा गरम तुरीच्या दाण्याचे कुरकुरीत वडे सर्व्ह करा.