Vegan Chocolate Ice-cream Recipe In Marathi: मे महिना संपून आता जून महिन्याला सुरुवात झाली आहे. असे असूनही उन्हाचा प्रभाव कमी झाला नसल्याचे पाहायला मिळते. उलट मे महिन्यापेक्षा जूनमध्ये जास्त उकडत आहे असे लोक म्हणत आहेत. दुपारी १२ ते ३ या दरम्यान उष्णतेचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी काहीजण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पंखा, एसीच्या समोर बसतात. तर काहीजण गार पाण्याने अंघोळ करतात. उन्हामध्ये उकडत असल्यावर अनेकजण आईसक्रीम खात असतात. दुकानामध्ये मिळणारी आईसक्रीम आपण घरी देखील बनवू शकतो. चला तर मग घरच्या घरी व्हेगन चॉकलेट आईसक्रीम कशी बनवायची ते जाणून घेऊयात..

साहित्य –

  • ४२० मि.लि. नारळाचे दूध
  • अर्धा कप पिठीसाखर
  • दोनतृतीयांश कप कोको पावडर (साखरविरहित)
  • अर्धा कप बदाम दूध (साखरविरहित)
  • ४०० ग्रॅम भिजवलेले खजूर
  • १ चमचा व्हॅनिला

कृती –

  • १० मिनिटे थंड होण्यासाठी फ्रीजरमध्ये एक मोठा मिक्सिग बाऊल ठेवा.
  • दरम्यान, फूड प्रोसेसरमध्ये खजुराची जाडसर पेस्ट करा.
  • त्यात थोडे गरम पाणी घाला. बाजूला ठेवा. वरील मिश्रणात नारळ दूध आणि साखर टाका.
  • मिश्रण मिक्सरमध्ये गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. वरील मिश्रणाचे दोन समान भाग करून घ्या.
  • त्यातील एका भागात कोको पावडर, व्हॅनिला, बदामाचे दूध हे टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • चवीनुसार फ्लेवर्स टाका. एका प्लास्टिकच्या भांड्यात मिश्रण काढून घ्या.
  • त्या भांड्याला वरून पहिले प्लास्टिक आणि त्यावर फॉइलपेपर याने व्यवस्थित झाका.
  • मूससारखं आईसक्रीम हवं असल्यास हे मिश्रण फ्रिजमध्ये दोन तास ठेवा व नीट जमण्यासाठी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.

आणखी वाचा – गुजरात स्पेशल ‘मिनी हांडवा’! कधीही खाता येणारा, झटपट बनणारा पौष्टिक पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)