लिंबू हा आपल्या रोजच्या आहारात वापरला जाणारा पदार्थ आहे. त्याची चव जरी आंबट असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. लिंबू हे रुचकर आणि पाचक असल्याने त्यापासून अनेक पदार्थ तयार केले जाता. लिंबाचे लोणचे, लिंबाचा मुरांबा, लिंबाचे सरबत. उन्हाळ्यामध्ये थंडगार लिंबाचे सरबत पिण्याची मज्जा काही वेगळी असते. पण वर्षभर लिंबू मिळेल असे नाही. काळजी करू नका लिंबू नसेल तरीही तुम्ही वर्षभर लिंबू सरबताचा आनंद घेऊ शकता. तुम्ही म्हणाल ते कसे शक्य आहे. ही ट्रिक वापरून तुम्ही झटपट लिंहू सरबत बनवू शकता

तुम्हाला वर्षभर लिंबू सरबतचा आनंद घ्यायचा असेल तर येत्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही भरपूर लिंबू खरेदी करा आणि त्याची पावडर बनवून ठेवा. ही पावडर वापरून तुम्ही केव्हाही सरबत तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या लिंबू सरबत पावडर कशी तयार करायची?

हेही वाचा – Trick For Lemon Tree: लिंबाच्या रोपाच्या मुळाशी टाका ‘या’ गोष्टी, वर्षभर रोपाला येतील भरपूर लिंबू

हेही वाचा – ग्लुटेनयुक्त आहार टाळल्यास गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होईल का? काय आहे तज्ज्ञांचे मत…

साहित्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • लिंबाचा रस १ कप
  • साखर ३ कप
  • सैंधव मीठ १ चमचा

कृती

  • प्रथम लिंब स्वच्छ धूवून घ्या त्यानंतर कापून त्यातील रस काढून घ्या.
  • कप लिंबाचा रस काढा
  • एका ताटात हा रस ओतून घ्या.
  • त्यात साखर टाकून दोन्ही एकत्र करा
  • हे मिश्रण सुकू द्या. त्यानंतर चमच्याने खरडून कडक झालेले साखर मोकळी करा
  • त्यात मीठ टाकून ही साखर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • लिंबू पावडर तयार आहे.
  • जेव्हा लिंबू सरबत तयार करायचे आहे तेव्हा एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंह सरबत पावडर टाका.
  • थंडगार लिंबू सरबतचा आनंद घ्या