Natural Remedies For Cough : अनेक जणांना आईस्क्रीम खाल्लं, थंड पाणी प्यायलं की, लगेच सर्दी होते. तर काही जणांना महिन्यातून एकदा तरी सर्दी होतेच. सतत होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होतो. डोकं दुखते, सतत शिंका येतात आणि सतत झोपून राहावेसे वाटते. काही जण त्रास सहन होत नाही म्हणून डॉक्टरकडे जातात. पण, सारखा खोकला होतो म्हणून तुम्ही सारखी औषधे घेत असाल थांबा. सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओत खोकला आणि कफवर घरगुती उपाय सांगितला आहे; जो कदाचित तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

खोकला आणि कफसाठी कसा बनवायचा काढा चला पाहू…

साहित्य –

  • एक ग्लास पाणी
  • ५ ते ६ विड्याची पाने
  • ४ ते ५ लवंग
  • ओवा

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • एका टोपात पाणी घ्या आणि ५ ते ६ विड्याची पाने तुकडे करून त्यात टाका.
  • नंतर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे त्यात लवंग, ओवा घाला.
  • नंतर गॅसवर टोप ठेवा आणि उकळवून घ्या.
  • या मिश्रणाचे अर्धा ग्लास काढा होईल इतका उकळवून घ्या.
  • त्यानंतर गाळणीतून गाळून घ्या आणि गरम गरम पिऊन घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nilamchakor_या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.