How To Make Vegetable cheese Ball : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चवदार आणि टेस्टी पदार्थ शोधत असाल तर चीज बॉल्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे बटाटे, चीज आणि काही मसाल्यांपासून हा चीज बॉल नेहमी तयार केला जातो. पण, जर तुम्हाला लहान मुलांना पौष्टीक खायला द्यायचं असेल तर मग “भाज्यांचा चीज बॉल” नक्की बनवून बघा. तर कसा बनवायचा हा पदार्थ चला जाणून घेऊयात…

साहित्य

एक कप उकडलेले वाटाणे, Blanched पालक, कोथिंबीर, तांदळाचे पीठ आणि थोडंसं चीज, आलं, मिरची, मीठ, चाट मसाला, गरम मसाला इत्यादी

(Blanched पालक म्हणजे उकळत्या पाण्यात थोडा वेळ शिजवलेली आणि लगेच थंड पाण्यात बुडवलेली पालकाची पाने).

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • एक कप उकडलेले वाटाणे, पालक, कोथिंबीर, मिरची, आलं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या.
  • चीज किसून घ्या आणि त्यात तयार केलेली पेस्ट टाका आणि तांदळाचे पीठ, मीठ, चाट मसाला, गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर त्याचे गोल आकारात छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्या आणि चीजचा एक तुकडा मधोमध टाका.
  • त्यानंतर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे शॅलो फ्राय करून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचा भाज्यांचा चीज बॉल तयार.

भाज्यांचा चीज बॉल तुम्ही डब्यात, सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला मुलांना खायला देऊ शकता.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shriyan_littlestar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.