How To Make Sabudana Bhaji : ऑक्टोबर महिना सुरु झाला असला तरीही अधूनमधून पाऊस हा पडतोच आहे. तर अशा या थंडगार पावसात काहीतरी कुरकुरीत आणि चमचमीत खाण्याची नेहमीच इच्छा होते. तुम्ही आतापर्यंत कांदा, बटाटा, मुंगडाळची भजी नक्कीच खाल्ली असेल. पण, आज आपण अशा एका भजीची रेसिपी बघणार आहोत; जी तेलकट नाही किंवा तिखट लागणार नाही. पण, तुमच्या मनाला आनंद नक्कीच देऊन जाईल. काय आहे रेसिपी चला जाणून घेऊयात…

साहित्य –

  • २ बटाटे
  • साबुदाणा पीठ १/४ वाटी
  • वरई पीठ १/२ वाटी
  • मीठ
  • जिरे
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • २ बटाट्याची साल काढून किसून घ्या.
  • किसून घेतलेला बटाट्याचा किस स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
  • नंतर किसामधलं पूर्ण पाणी गाळून घ्या.
  • नंतर एका वाडग्यात बटाट्याचा किस, साबुदाणा पीठ, वरई पीठ, मीठ, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर गॅस चालू करा त्यावर कढई ठेवून त्यात तेल घाला.
  • नंतर तयार मिश्रणाच्या छोट्या, छोट्या कुरकुरीत भज्या तळून घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.