तुम्हाला पोहे आवडतात का? पोहे हा सहसा सर्व घरामध्ये तयार होणारा पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता आहे. गरमा गरम पोहे खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फक्त गरम पाणी टाकून आता गरमा गरम पोहे बनवू शकता. तुम्हाला रोज ऑफिसला जाताना नाश्ता तयार करणे जमत नसेल किंवा तुम्ही घरापासून दूर हॉस्टेल किंवा रुमवर राहत असला किंवा काही दिवसांसाठी घरापासून दूर जाणार असाल आणि घरच्यांच्या नाष्ट्याची सोय करायची असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. चला मग जाणून घ्या पोहे प्रिमिक्स रेसिपी….

पोहे प्रिमिक्स साहित्य

तेल – एक चमचा
मोहरी- जिरे- एक चमचा
मिरची – २ ते ३ मिरच्या
कडीपत्ता – चार पाच पाणे
पोहे – २ वाटी
हळद – चिमुटभर
भाजलले शेंगदाणे
आमचूर पावडर – चिमुटभर
मीठ – गरजेनुसार
पिठी साखर – चिमुटभर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोहे प्रिमिक्स कसे तयार करू शकता?

एका भांड्यात गॅसवर भांडे ठेवून तेल गरम करा. आता त्यात मोहरी जिरे टाकून तडतडू द्या, त्यात कडीपत्ता आणि त्यानंतर त्यात चिरलेली मिरची टाकून चांगली परतून घ्या. आता त्यात हळद आणि धने पावडर टाका आणि चांगले कोरडे होईलपर्यंत परता. त्यात आता थोडे जाडे पोहे साफ करून घ्या आण कढईत टाका. कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्या. त्यात साखर, आमचूर पावडर टाकून परतून घ्या. त्यात भाजलेले शेंगदाणे टाका. तयार पोहे एका हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवा आणि दोन महिन्यापर्यंत खाऊ शकता. तुम्हाला जेव्हा पोहे खायचे आहेत तेव्हा एका वाटीत थोडे तयार पोहे काढा आणि त्यात गरम पाणी टाका आणि झाकून ठेवा. त्यानंतर गरम गरम पोहे तयार आहे.