Makhana Ladoo Recipe: लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दुपारच्या वेळेत भूक लागते. तेव्हा अनेकदा आई घरात रवा, बेसन, नाचणी, शेंगदाणा आदी विविध प्रकारचे लाडू आवर्जून करून ठेवते. तर आज आपण एका अनोख्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत ; जे मखान्यापासून तयार केले जातात. मखाना हे ड्रायफ्रूट्स आहे ; जे आरोग्यदायी तसेच चवदार सुद्धा आहे. मखाना खाणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश असायला हवा. त्यासाठीच आज आपण ‘मखान्याचे पौष्टिक लाडू’ कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
साहित्य :
- तीळ – पाव किलो
- मखाना – १०० ग्रॅम
- शेंगदाणे – एक वाटी
- सुख खोबरं – अर्धी वाटी
- जायफळ पूड आणि वेलची पूड – अर्धा चमचा
- गूळ – दिड वाटी
- तूप
हेही वाचा…बनवायला सोपी, पाचक आणि चटपटीत आवळा गोळी ; पाहा रेसिपी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कृती:
- सगळ्यात आधी मखाना, तीळ, शेंगदाणे, सुख खोबरं भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घाला आणि त्यात गूळ वितळवून घ्या.
- त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण, जायफळ पूड, वेलची पूड तयार गुळाच्या पाकात घाला.
- मिक्स करून झाल्यावर मिश्रण तयार होईल तसे लगेच लाडू वळून घ्या.
- अशाप्रकारे तुमचे मखान्याचे पौष्टिक लाडू तयार.