हरा भरा कबाब हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. हे कबाब दिवसा स्नॅक म्हणून किंवा लंच किंवा डिनरमध्ये स्टार्टर म्हणून मोठ्या उत्साहाने खाल्ले जातात. चवदार असण्यासोबतच हा पदार्थ अतिशय आरोग्यदायीही आहे. जर तुम्ही घरी पार्टी करत असाल तर त्यातही स्टार्टर म्हणून हरा भरा कबाब बनवता येईल.चला तर मग हिवाळा स्पेशल कबाब रेसिपी पाहूयात.

हिवाळा स्पेशल – कबाब साहित्य

१ कप फ्रेश मटार
१/४ कप ब्रेड क्रम्बस
२ बटाटे शिजवून
२ टेबलस्पून हिरवा ठेचा
१ कप ओले हिरवे तुरी चे दाणे
१ कप ओले हिरवे हरभरे
१ टिस्पून हळद
१/२ टिस्पून हिंग
मीठ चवीनुसार
१ टेबलस्पून धणे पूड
१/२ टिस्पून जीरे पूड
१ टिस्पून आमचूर पावडर
१/२ कप फ्रेश कोथिंबीर
तेल आवश्यक ते नुसार
पाणी गरजे नुसार

हिवाळा स्पेशल – कबाब कृती

फ्रेश मटार, ओले हरभरे, ओले तुरीचे दाणे शेंगा सोलून दाणे काढा. स्वच्छ धून घ्यावे. नंतर एका पातेल्यात ते सगळे दाणे, पाणी, मीठ घालून शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यातले पाणी निथळून काढा व मिक्सर मध्ये ओबड धोबड वाटून घ्यावे.

लसूण आले मिरची कोथिंबीर चे वाटण करा व तेल तापवून त्यात वाटण घालून घ्या. त्यात हळद आणि हिंग घाला व खमंग परतून घ्या.

मटार, हरभरे, तुरीचे दाणे वाटण, ब्रेड क्रम्बस, बटाटे मॅश करा, त्यात हिरवे वाटण, मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर, धणे पूड, जीरे पूड घालून एकजीव करा.

एक सारखे गोळे करून त्याला पॅटिस चा आकार द्या. पॅन तापवून त्यात तेल घाला व त्यावर तयार पॅटिस एक एक करून ठेवा.

हेही वाचा >> मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झाकण ठेवून वाफवून घ्यावे. व सोनेरी रंग आल्यावर ते उलटून घ्या व दुसरी बाजू सोनेरी रंगावर भाजून घ्या. गरम गरम सर्व्ह करा.