थंडीत शक्यतो उष्ण पदार्थ, भाज्या आर्वजून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे थंडीपासून तुमचा बचाव होतो. सुकामेव्यासह बाजारात अशा काही भाज्या आहेत ज्या उष्ण असतात. त्यातीलच मेथीतील एक प्रकार म्हणजे बारीक मेथीची भाजी. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी

बारीक मेथीची भाजी साहित्य

  • १० जूडया बारीक मेथी
  • १ कांदा मोठा बारीक चिरलेला
  • १ छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • हिरवी मिरची 3 बारीक चिरलेला
  • १/४ कप ओल खोबर किसलेले
  • मीठ चवीनुसार

बारीक मेथीची भाजी रेसिपी

स्टेप १
प्रथम मेथी ३/४ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ कारण या मेथीत खूप रेती असते म्हणून आपण तिला 3-4पाणयाने धुवून घेऊ आणि चाळणीत निथळत ठेऊया.

स्टेप २
कढईत तेल गरम करून त्यात ठेचून घेतलेला लसूण, हिरवी मिरची 1-2 मिनिट परतून मग त्यात कांदा आणि टोमॅटो घालून परतून घेऊ मग त्यात मेथी चिरून घालून झाकण ठेवून वाफ काढून घेऊ पालेभाज्या पाणी सुटत त्यामूळे भाजी वाफेवर शिजली जाते.

स्टेप ३
५-७ मिनिटांत भाजीतल पाणी बहुतेक सूकल जात झाकण काढून सर्व पाणी सूकू द्या म्हणजे आपली भाजी तयार. ह्या भाज्या पटकन होतात आता भाजी तयार आहे वरून कीसलेल खोबर घालून १-२ मिनिट झाकण ठेवून गॅस बंद करा.

हेही वाचा >> हिवाळा स्पेशल मिक्स भाजी; सर्वांना आवडणारी हिवाळा स्पेशल झटपट आणि मस्त रेसिपी

स्टेप ४
ही भाजी गरम तांदळाच्या भाकरीबरोबर /चपातीसोबत छान लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारीक मेथीचे फायदे

  • पचनक्रिया
  • बारीक मेथीची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्टता, पोटाचे विकार दूर होतात.
  • त्वचा
  • चेह-यावर मूर्म आले असतील तर कमी करण्यास, त्वचा नितळ ठेवण्यास मदत होते.
  • मधुमेह
  • मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रक्तातील ग्लुकोज होमोस्टॅसिसचे प्रमाण संतुलित राहते.
  • केस मजबूत राहण्यास मदत
  • बारीक मेथी खाल्ल्यास आपली केसांची मूळं मजबूत होतात. त्यामुळे केस गळणे, तुटणे हा समस्या उद्भवत नाही.त्यामुळे थंडीत तुम्हाला बाजारात बारीक मेथी उपलब्ध झाल्यास त्याची भाजी करुन अवश्य खा. ही भाजी बनवणेही अतिशय सोपी आहे. थंडीत ही भाजी खाल्ल्यास शरीरास अनेक फायदे होतात.