आजचा अंक (लोकसत्ता ५ सप्टेंबर) बलात्काराच्याच बातम्यांनी भरलेला आहे : ताईत देण्याच्या आमिषाने बलात्कार, टेलिफोन ऑपरेटर बलात्कार प्रकरण, लग्नास नकार दिल्याने आत्महत्या (त्यातही बलात्कार आहे), ७ आरोपींकडून ४ बलात्कार, त्याने स्वीकारले तिच्या आईचा नकार.. यावरून एक लक्षात येते की खिसेकापू, चोरी या गुन्ह्यांसारखे आता बलात्कारही रूटीन झालेले आहेत. अनेक गुन्ह्यांची नोंद होत नाही, तसेच अनेक बलात्कार हे समाजापर्यंत येतही नाहीत. घरातील, नात्यातील ओळखीचे यांच्याकडून असे अत्याचार अनेक वेळा होत असतात. यावर मला काही उपाय सुचतात :  
१) योनिशुचितेबद्दलच्या कल्पना अवास्तव नसाव्यात, आपली अब्रू लुटली गेली तर आपण संपलोच ही भावना दूर करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, कारण बऱ्याच वेळा असे प्रसंग आले की मुलगी-स्त्री मनाने खचते आणि मग शरीराने आणि त्यामुळे ती प्रभावी प्रतिकार करू शकत नाही.
२) असा प्रसंग आला तर त्या पीडित महिलेने उलटी काढण्याचा प्रयत्न करावा, शिसारी  येऊन पुरुषाची वासना कमी होते.
३) बऱ्याच वेळा स्त्रीला याची चाहूल आधीच लागते, पण ते ती बोलत नाही. उगाच बभ्रा कशाला असे तिच्या मनात येते. असा थोडा जरी संशय आला तरी तिने नातेवाईकांना, मत्रिणींना, पोलिसांना याची माहिती द्यावी, कदाचित त्यामुळे दुर्धर प्रसंग टाळता येतील.
४)  स्त्रीसुलभ  लज्जा, भिडस्तपणा, नकारात्मक दृष्टिकोन यावर मात करून धाडसाने याबद्दल उघडपणे आवाज उठवावा.
 – गार्गी बनहट्टी, दादर

मतदानाचा मर्यादित हक्क, हा एक चांगला पर्याय
‘राखेखालचे निखारे’मधील ‘हवी पोिशद्यांची लोकशाही’ हा लेख ( ४ सप्टें ) तसेच ‘जय जवान! जय किसान! बाकी फुकटे घेती दान?’ ही संजीवनी चाफेकर यांची त्यावरची प्रतिक्रिया ( लोकमानस, ५ सप्टेंबर) वाचली. वस्तुत: जे स्वित्र्झलडसारख्या देशाला जमले ते आपल्यालाही जमायला हरकत नसावी. प्रसंगी त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तरी हरकत नाही.  शरद जोशी यांनी सुचविलेला मतदानाच्या मर्यादित हक्काचा मार्ग हा एक चांगला पर्याय होऊ शकेल, त्याबद्दल दुमत नसावे.
शेतकऱ्यांचा हातभार देशहिताला लागतोच, हे लक्षात घेऊन त्यांना किंवा सरकारचा कर भरणा वेळेवर करतात अशाच अन्य नागरिकांना मतदानाचा हक्क देऊन त्यांना सर्व शासकीय सोयी-सवलतींचा लाभ घेण्यास पात्र ठरविल्यास करचुकवेगिरीला आळा बसेल आणि आपली ‘बाळबोध’ लोकशाही प्रगल्भतेकडे वाटचाल करू लागेल.
धनराज मा. खरटमल, कांजुरमार्ग (पूर्व)

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

जिनांच्या इतिहासातून तरी शिका!
मदरशांना व तेथील शिक्षकांना महाराष्ट्र सरकारतर्फे  शैक्षणिक अनुदान देण्याच्या प्रस्तावाची बातमी (लोकसत्ता, ४ सप्टें.) वाचली व ११ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानचे संस्थापक बॅ. मोहम्मद अली जिना यांनी तेथील घटना समितीसमोर देशासाठी घटना बनवताना कोणती नीती असावी याची रूपरेषा सांगण्यासाठी केलेल्या त्या प्रसिद्ध भाषणाचे स्मरण करून द्यावेसे वाटले.
पाकिस्तानचे निर्माते म्हणाले होते, ‘पाकिस्तान हा या देशात राहणाऱ्या सर्वाचा आहे. जाती, भाषा, धर्म या सर्व खासगी जीवनाच्या बाबी मानण्यात याव्यात. सरकारच्या लेखी सर्व सारखे. देशात होणारे सर्व कायदे सर्वाना सारखे लागू व्हावेत, त्यामुळे अल्पसंख्य व बहुसंख्य असा कोणताही वर्ग असता कामा नये, अन्यथा देशाचे पुन्हा तुकडे पडण्यास वेळ लागणार नाही.’
ज्याने धर्माच्या नावानेच िहदुस्थानचे तुकडे पाडले त्यांच्याच तोंडी असे विचार असतील व ते जाहीरपणे देशाची नीती म्हणून मांडत असतील तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? धर्माच्या नावावर देशाची फाळणी हा त्या वेळी केवळ व्यक्तिगत राजकीय स्वार्थ होता. गांधी व नेहरू यांच्या बरोबरीचे स्थान असावे या केवळ राजकीय उद्देशाने जिना यांनी धर्माचा व मुस्लीम लीगचा उपयोग करून घेतला. त्या पद्धतीतील धोका त्यांनी ओळखला होता म्हणूनच पाकिस्तान अखंड राहावा म्हणून त्यांनी एकदा झालेली चूक पुन्हा देशाच्या हितासाठी कोणीही करू नये म्हणून पाकिस्ताननिर्मितीआधीच चार दिवस कोलांटी उडी मारली, असा इतिहासकारांनी काढलेला अर्थ आहे.
यातून आपले राज्यकत्रे काही शिकणार का? पश्चिम बंगाल सरकारने अशा प्रकारे केलेला (राज्यातील इमामांना भत्ते देण्याचा) प्रयत्न मंगळवार, ३ सप्टेंबर रोजीच कोलकाता उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला. म्हणजे राजकारणी लोकांनी जाणूनबुजून चुका करायच्या व त्याचे पाप न्यायसंस्थेवर फोडायचे.. आपण अल्पधर्मीयांसाठी केवढे करण्याचे ठरवतो, पण न्यायसंस्था त्यात खोडा घालते, असे चित्र उभे करणे हाच एकमेव राजकारणी उद्देश यातून दिसून येतो.
प्रसाद भावे, सातारा</strong>

‘मदती’ला मदरसेच?
महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सरकारने राज्यातील मुस्लिम मदरशांसाठी तब्बल १० करोड रुपयांची वार्षकि मदत जाहीर केली आहे. मदरशांमध्ये मुस्लिम मुलांना केवळ कुराणाधारित मुस्लिम धर्माचे शिक्षण दिले जाते. या लहान मुलांना विज्ञानाधारित शिक्षणापासून वंचित ठेवले जाते व त्यामुळे हा समाज मूळ प्रवाहापासून दूर राहतो व या देशाला आपला देश मानण्यासही बऱ्याचदा नकार देतो.
आज राज्यात महापालिकांच्या आणि मराठी माध्यमांच्या शाळा निधीअभावी बंद पडू लागल्या आहेत. सरकारने या शाळांच्या दर्जावाढीसाठी मदतीचा हात देऊन त्यांना सुस्थितीत ठेवले असते तर!  विज्ञानाधारित शिक्षण देण्याबाबतीत उदासीन असलेले हे सरकार निवडणुकांच्या काळात लांगूलचालनासाठी मात्र, धर्माधारित शिक्षण देणाऱ्यांवर मेहरबान झालेले दिसते.
महेश भानुदास गोळे, कुर्ला (पश्चिम)

संशोधनाचा पाया शुद्ध नव्हता..
‘पश्चिमद्वेष! आयतोबांच्या उलटय़ा बोंबा’  हा राजीव साने यांच्या ‘गल्लत, गफलत, गहजब’ सदरातील लेख (३० ऑगस्ट) मननीय आहे.
आपल्या पूर्वजांच्या कृती हा अकॅडमिक इंटरेस्टचा (अभ्यासू कुतूहलाचा) भाग आहे. आज काय आवश्यक आहे? हेच महत्त्वाचे आहे. साने म्हणतात त्याप्रमाणे : ‘कोणतीही गोष्ट, ‘कुठून’ आली वा ‘कुणाला’ सुचली, या आधारे ती त्याज्य वा ग्राह्य ठरविणे हा मोठाच वैचारिक प्रमाद आहे.’
परंतु जीवनात आज अराजक, भावना भडकणे आणि भडकावणे इतके वाढले आहेत की, वस्तुनिष्ठ विचार मागे पडत आहे. याबाबत डॉ. जयंत नारळीकर यांचे ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’च्या जानेवारी २०१२ अंकात प्रकाशित झालेले काही विचार असे:
‘‘पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे दूरदृष्टी इत्यादींची प्रत्यक्ष उदाहरणे पुराणात सापडतात ती गोष्टींच्या रूपाने आहेत, ज्याला आपण गणितीय विज्ञान-वाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत.
पुराणातील वर्णने पहिल्या (निव्वळ वर्णने) प्रकारची आहेत, दुसऱ्या (तांत्रिक माहिती) प्रकारची नाहीत. पुष्पक विमान करण्याची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही. वायव्यास्त्र आग्नेयास्त्र वगरे कशी बनविली गेली? त्याची कृति महाभारतात सापडत नाही. सध्या उपलब्ध पौराणिक वाङ्मयातून केवळ इतकेच निदान करता येते की, त्यांची कल्पनाशक्ति अचाट होती. त्यापलिकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्घ नाही. तसेच, आज खेडोपाडी भागवायच्या न्यूनतम गरजा – वीज आणि नळातले पाणी – महाभारतात अनुल्लेखाने आढळतात.. अगदी कौरवांच्या राजवाडय़ाात देखील.’’
राजीव साने यांच्या लेखात, ‘राइट बंधूंच्याही अगोदर  ‘. बापूजी तळपदे’ यांनी मुंबईच्या चौपाटीवर विमान उडवण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या केला होता म्हणे. हा दावा डॉ. प्र. न. जोशी यांच्या विज्ञानकथा नामक पुस्तकात आहे. .. दाव्यांचे डॉक्युमेन्टेशन कुठेच मिळत नाही.’’ असे वाक्य आहे. वास्तविक याबाबत लोकसत्तेच्याच रविवार दि. १८ जून १९७८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला ‘न झालेल्या विमानोड्डाणाची सुरस विद्वत् कथा’ हा गो. ग. जोशी या इंजिनीअर महोदयांचा लेखही मुळातून पाहण्यासारखा आहे.
गो. ग. जोशी यांनी डॉ. प्र. न. जोशी, प्रा.  भालबा केळकर इत्यादींच्या लेखांचा प्रतिवाद केला आहे. तसेच त्यांनी पंडित सातवळेकर यांची विधाने उद्धृत केली आहेत, त्यापकी काही अशी आहेत –
‘थोडय़ाच वेळानंतर माझ्या असे लक्षात आले की, या तिघांना (चिरंजीवलाल, शिवकर, बापूजी तळपदे) संस्कृत-व्याकरणाचा गंधही नाही .. (तळपदे यांच्या) वेद-विद्य्ोचा आधार म्हणजे वेदातील काही मंत्र एवढाच होता, ..श्री तळपदे यांचा वेदवचनांवर अढळ विश्वास होता. म्हणून ते या शब्दांचे मनन जवळजवळ १५ वष्रे करीत होते. पण विश्वासाने यंत्रे सिद्ध होणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात येऊ शकले नाही.
ही प्रमाणे अपूर्ण आहेत हे मी त्यांस अनेक वेळा सांगितले. पण त्यांचा परिणाम त्यांचेवर मुळीच झाला नाही .. त्यांनी काही शास्त्रज्ञांना बोलावून त्यांच्या प्रयोगाची परीक्षा करविली. ती शास्त्रज्ञांच्या कसोटीवर उतरली नाही. .. त्यामुळे धन-सहाय्य मिळले अस्ते तरी विमान बनू शकले नसते. .. त्यांनी ज्या पायावर संशोधन केले तो पायाच शुद्ध नव्हता’
-राजीव जोशी, कोथरुड, पुणे.