एप्रिल महिन्यात इंग्रजीत उपलब्ध झालेल्या ‘कॅपिटल इन द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी’ या थॉमस पिकेटी यांच्या  पुस्तकाची सध्या जगभर जोरदार चर्चा चालू आहे. नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ या पुस्तकाची प्रशंसा करत असून ‘परतून आलेला कार्ल मार्क्स’ असा पिकेटी यांचा उल्लेख केला जात आहे. हे पुस्तक लवकरच खपाचे, अनुवादाचे विक्रम मोडण्याची आणि या वर्षांतील सर्वाधिक चर्चेचे ठरण्याची शक्यता आहे. या पुस्तकाविषयी..
थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थतज्ज्ञाचे ‘कॅपिटल इन द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी’ हे पुस्तक आणि स्वत: पिकेटी दोघेही जगभरात सध्या भरपूर गाजत आहेत. केवळ ४३ वष्रे वयाच्या पिकेटींच्या कामाची जगभरातील अर्थतज्ज्ञांनी आवर्जून दखल घेतली आहे. कुणी त्यांना ‘परतून आलेला कार्ल मार्क्स’ संबोधले, तर कुणी ‘मार्क्सपेक्षाही थोर’ ठरविले आहे.
हे पुस्तक चच्रेत राहण्याचे पहिले कारण पिकेटींनी राजकीय अर्थव्यवस्थेतील गाभ्याच्या प्रश्नांचा घेतलेला ध्यास, हे आहे. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी भरवशाचे आधार जमा केले आणि उदारमतवादी न्याय्य भूमिका स्वीकारली. हे घटक संशोधनाशी निगडित आहेत. दुसरे कारण म्हणजे अर्थव्यवस्थांतील गाभ्याच्या प्रश्नांशी निगडित वादविवादांची मुख्यत: युरोपमध्ये गेल्या २५० वर्षांची परंपरा आहे. तिसरे कारण गेली चाळीस-पंचेचाळीस वष्रे विकसित देशांतील अतिश्रीमंत आणि इतर यांच्यातील दरी सतत वाढते आहे. मोजक्या हाती संपत्ती प्रचंड प्रमाणात एकवटणे ही लोकशाहीला मारक घटना ठरते आहे. अनेक देशांत वाढणाऱ्या आíथक विषमतेला प्रतिबंध घालण्याचे लोकशाही उपाय अमलात आणायचे झाल्यास देशोदेशींच्या राज्यकर्त्यां वर्गाला त्यामागील कारणे माहीत असणे गरजेचे ठरत आहे. त्याअभावी प्रतिबंधांचे उपाय परिणामकारक ठरू शकत नाहीत.
पिकेटी यांचे प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत संपत्ती एकवटण्याची चच्रेत असणारी कारणे समाधानकारक नव्हती. उदाहरणार्थ, कामगार संघटना, त्यांचे लढे आणि त्यांची ताकद ओसरणे, देशादेशांतील आíथक विषमता जागतिकीकरणामुळे वाढणे, या काळात कामगार वेतन कमी करणारी स्पर्धा जगात सुरू होणे (चिनी कामगारांच्या वेतनाची युरोपी कामगारांच्या वेतनाशी तुलना बोलकी आहे), चलनवाढीमुळे/ भाववाढीमुळे कामगार वेतनाचे मूल्य कमी होणे, तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे काही कर्मचाऱ्यांचे स्तर अनावश्यक ठरणे, इत्यादी कारणे जरूर चच्रेत होती. ही कारणे गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात उत्तरोत्तर एकवटणारा संपत्तीसंचय आणि वाढती विषमता यांचा अन्योन्य संबंध स्पष्ट करण्यासाठी पुरेशी नव्हती.
हे पुस्तक चार भागांत विभागले आहे. पहिल्या भागातील दोन प्रकरणांत पिकेटी आणि सहकाऱ्यांनी अभ्यासासाठी निवडलेल्या ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, अमेरिका, जपान या विकसित आणि काही विकसनशील अशा एकूण एकवीस देशांची अठरावे ते एकविसावे शतक या कालावधीतील उपलब्ध आíथक आकडेवारीचे आधार तपासून ती संकलित करून वापरली आहे. त्या आधारे प्रत्येक देशातील खासगी आणि सार्वजनिक भांडवलाची प्रत्येक वर्षांसाठी तत्कालीन चलनाची बाजारभावानुसार असलेल्या किमतीमध्ये नोंद केली. प्रस्तुत पुस्तकात ‘संपत्ती’ या अर्थाने ‘कॅपिटल’ (भांडवल) आणि ‘वेल्थ’ हे शब्द समानार्थी वापरले आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट, दागदागिने, जमीन-जुमला, शेअर्स, इत्यादी संपत्तीसंचय दर्शवणाऱ्या बाबींचा समावेश भांडवलात केला आहे. ‘कारखान्यांसाठी यंत्रे हे भांडवल असते’ या वाक्यातील भांडवलाचा अर्थ वाचकांनी घेतल्यास त्यांचा गोंधळ उडेल. गोंधळाच्या जागी न अडखळण्याची काळजी पुस्तकभर घ्यावी लागते. अभ्यासाच्या पुढील पायरीवर या भांडवलाची खरेदी-विक्री करून देशाचे उत्पन्न किंवा भांडवलावरील परतावा (रिटर्न्स) याची नोंद घेतली आहे. अशा तऱ्हेने देशाच्या वार्षकिी उत्पन्नाचीही (तत्कालीन चलनाची तत्कालीन बाजारभावातील किमतीमध्ये) आकडेवारी संकलित केली. निवडलेल्या देशात इन्कम टॅक्स, सांपत्तिक कर (इस्टेट टॅक्स) लागू असतील तर असे माहितीसंकलन शक्य होते. देशाचे विशिष्ट वर्षांतील भांडवल (सांपत्तिक स्थिती) आणि त्याच वर्षांतील उत्पन्न यांची माहिती चलन आणि त्याची बाजारपेठेतील किंमत सापेक्ष आहे. त्यामुळे देशांचे भांडवल अथवा उत्पन्न यांच्या विविध परिस्थितीत तुलना करता येत नाही.
दुसऱ्या भागातील पहिले प्रकरण वरील अडचणीवर गणिती तोडगा काढते. विश्लेषणासाठी निवडलेल्या प्रत्येक देशाचे या काळातील वर्षांगणिक भांडवल आणि प्रतिवर्ष उत्पन्न यांचे गुणोत्तर (रेशो) वापरणे हा तो तोडगा आहे. हे राष्ट्रीय वार्षकिी भांडवल-उत्पन्न गुणोत्तर देशाचा भांडवलसंचय त्या वर्षीच्या उत्पन्नाच्या पटीत सांगते. त्यामुळे गुणोत्तर चलन अथवा त्याची बाजारपेठेतील बदलती किंमत यावर अवलंबून उरत नाही. उदाहरणार्थ, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांचे राष्ट्रीय भांडवल  १७०० ते १९१० या दरम्यान वार्षकि राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे सात पट होते; परंतु ते १९१० ते १९५० धाडकन खाली आले.
दुसऱ्या भागातील उरलेली तीन प्रकरणे देश आणि जग यांच्यासाठी लोकसंख्या वाढीचा आणि उत्पादनक्षमता वाढीचा वेग याबाबत त्यांच्या इतिहासाचा वापर करून काही अंदाज गृहीत धरते. त्यावरून हे गुणोत्तर एकविसाव्या शतकाच्या शंभरएक वर्षांत कोणते चढ-उतार अनुभवेल याचे अंदाज व्यक्त करते. हे गुणोत्तराचे चलनशास्त्र (डायनॅमिक्स) आहे. त्या आधारे आíथक विषमतेचे ठोकताळे बांधते.
आíथक विषमतेचे अनेक अंगांनी विश्लेषण करणारा सहा प्रकरणांचा तिसरा भाग पुस्तकाचा गाभा आहे. तो देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर आíथक विषमता वाढीचे दर्शन घडवितो. सायमन कुझनेट्स यांनी वाढत्या आíथक विषमतेची काळजी बाजारपेठ घेत असल्याचा सिद्धांत मांडला होता. सिद्धांताची पूर्वअट असणारी ‘मोक्याची वळणे’ पार केल्यानंतर विषमता कमी होते, असे कुझनेट्स वळणे दाखवितात. या वळणांना अमेरिका, सर्व पश्चिम युरोपी देश आणि जपानमधील भांडवली अर्थव्यवस्थेने गेली चाळीस वष्रे जुमानलेले नाही, हे या विश्लेषणातून लक्षात येते. परिणामी, या वळणांच्या मोहिनीभोवती प्रश्नचिन्हाचे वेटोळे पडले आहे. अनेक विकसित देशांतील वाढत्या आíथक विषमतेची दोन अत्यंत महत्त्वाची कारणे विश्लेषणातून दिसली आहेत- पहिले, जागतिक महामंदीच्या  काळात संबंधित देशाच्या एकंदर आíथक वाढीपेक्षा भांडवलसंचय जास्त परतावा किंवा उत्पन्न देते. त्यामुळे भांडवल गुंतवणुकीतून उत्पादन निर्मिती करून उत्पन्न वाढीस पुरेशी चालना मिळत नाही आणि दुसरे, विकसित देशांतील उच्चपदस्थ मॅनेजमेंट आणि एक्झिक्युटिव्ह क्षेत्रांतील पगार त्यांच्या उत्पादनक्षमेतेपेक्षा १०० ते २०० पटीने जास्त आहेत. या व्यक्ती स्वत:चे वेतन स्वत:च ठरवितात. याही कारणामुळे आíथक विषमता वाढते आहे. प्रस्तुत अभ्यासामुळे भांडवलसंचय आणि आíथक विषमता यांच्यातील चच्रेला नवे आयाम मिळाले आहेत.
निष्कर्ष आणि संदर्भनोट्स यांनी पुस्तकाचा शेवट होण्यापूर्वी पुस्तकाचा चौथा भाग २१व्या शतकात या भांडवलसंचयावर नियंत्रण ठेवण्याच्या शक्य मार्गाची चर्चा करतो. त्यामध्ये उत्पन्न कर आणि संपत्ती कर यांचा पुनर्वचिार केला आहे. भांडवलशाहीचे सारे दोष बाजारपेठ नियंत्रित करेल, असा एक भाबडा आदर्शवाद बाळगणाऱ्यांना तो पटेलच असे नाही. त्यामुळेही कदाचित ‘पिकेटी हे परतून आलेले मार्क्स आहेत’ (रिटर्न ऑफ कार्ल मार्क्स) अशी विधाने होत असावीत. या संदर्भात स्वत: पिकेटी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात – ‘‘माझ्या पिढीने १९८९ साली वयाच्या अठराव्या वर्षांत प्रवेश केला. ते वर्ष फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार दुसऱ्या शतकातील होते आणि विशेष म्हणजे ते वर्ष बíलनची िभत पडल्याचेही होते. माझी पिढी रशियन कम्युनिस्ट हुकूमशाहीच्या पतनाच्या बातम्या ऐकत वयात आली आहे. साम्यवादी सत्तेबद्दल मला मुळीच आत्मीयता वाटली नाही.. उलट, या वातावरणाने भांडवलशाहीला निव्वळ वितंडवादाच्या रूपात विरोध करण्याच्या आळसाविरुद्ध माझे आयुष्यभर संरक्षण केले आहे. म्हणून भांडवलशाहीला बदनाम करण्यात मला काडीचाही रस नाही. आíथक विषमतेला सार्वजनिक उपयोगितेचा आधार असू शकतो. अशी विषमता माझ्यासाठी प्रश्नचिन्ह म्हणून उभी ठाकत नाही.. सर्वाना लागू पडणाऱ्या न्याय्य पायावर समाज आणि त्यातील विविध संस्था उभारण्याच्या गंभीर चच्रेत माझ्या कुवतीनुसार योगदान देण्यात मला रस आहे. हे न्याय्य मार्ग लोकशाहीमध्ये रुजलेले असले पाहिजेत एवढीच माझी धारणा आहे..’’
थोडक्यात हे पुस्तक स्वार्थासाठी लोकशाहीला मुरड अथवा वेसण घालणाऱ्या भांडवलशाहीतील विकृत प्रवृत्तीला विरोध करणारे, लोकशाही आणि भांडवलशाही एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकतात, तेव्हा लोकशाहीची बाजू लावून धरणारे आणि उदारमतवादाचा आग्रह धरणारे आहे. चकाचक रस्त्यांवरून वेगवान कारमधून फिरणाऱ्या ‘बोलक्या’ मंडळींच्या नजरेसमोर कायम विकासाची दृश्य प्रतीके चमचमली पाहिजेत, असा एक विकासाचा ‘प्रतीकाभिमुख’ अर्थ जगभरच्या आणि भारतातील राज्यकर्त्यांना आणि विचारवंतांनादेखील भुरळ घालतो आहे. या विकासाच्या व्याख्येत बालमृत्यू कमी करणे, टोकाचे दारिद्रय़ शमविणे अशा न दिसणाऱ्या गोष्टींना वळचणीची जागा असते. या पाश्र्वभूमीवर आíथक विषमता कमी करण्याचा आग्रह धरत विकासाच्या न्याय्य आणि उदारमतवादी अर्थाकडे जाण्यास हे पुस्तक प्रेरित करते.
कॅपिटल इन द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी – थॉमस पिकेटी,
इंग्रजी अनुवाद – ऑर्थर गोल्डहॅमर,
द बेल्कनॅप प्रेस ऑफ हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस,
पाने : ६९६, किंमत : ९१० रुपये.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट