समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांची पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आजपासून सुनावणी सुरू झालेली असतानाच पंजाबातील भटिंडा इथल्या लष्करी तळावर नुकत्याच झालेल्या चार जवानांच्या हत्येमागे समलिंगी संबंध हे कारण असल्याची शक्यता वर्तवली जावी, हा अजिबातच योगायोग म्हणता येणार नाही. लष्कराने भटिंडा तळावरील या हत्याकांडामागे वैयक्तिक कारण असल्याचे नमूद केले असले तरी लैंगिक छळाच्या त्रासाला कंटाळलेल्या जवानाने सूड उगवण्यासाठी संबंधित चौघांच्या हत्या केल्या असल्याचे पोलिसाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, एस. रवींद्र भट्ट, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या या याचिकेत केंद्र सरकारने समलिंगी विवाहांच्या विरोधात भूमिका घेतलेली असताना देशासाठी अभिमानास्पद असलेल्या लष्करात समलिंगी संबंधांच्या सक्तीवरून एखाद्या जवानाकडून टोकाचे पाऊल उचलले जाणे हे खरे तर या विषयाकडे नव्याने आणि वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त करणारे ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्री-पुरुष संबंध हीच काय ती नैसर्गिक गोष्ट अशी भूमिका सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली असली तरी लैंगिकतेला असलेल्या वेगवेगळय़ा छटा नाकारून त्याकडे फक्त एकाच रंगातून पाहणे, तेही विशेषत: समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारे ३७७ वे कलम २०१८ मध्ये रद्द केले गेल्यानंतर काळाची चाके मागे फिरवणारे ठरू शकते. त्यामुळेच विवाह या सामाजिक संस्थेअंतर्गत कोणत्याही नवीन  नातेसंबंधांना मान्यता देण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला नसून तो फक्त कायदेमंडळाला आहे, असे केंद्राने न्यायालयात म्हणणे हा तर व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार डावलून व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा उघड उघड प्रकार.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha punjab bhatinda military at the base of soldiers murder bhatinda by the army ysh
First published on: 19-04-2023 at 00:02 IST