scorecardresearch

Premium

व्यक्तिवेध: समीर शाह

बीबीसी ही ब्रिटनची सार्वजनिक माध्यम कंपनी असल्यामुळे, तिला कामकाजाची वा कार्यक्रमांच्या बाबतीत स्वायत्तता असली तरी तिच्या प्रमुखांची निवड सरकारकडूनच जाहीर केली जाते.

Freedom of Media in India British Broadcasting Corporation Sameer Shah Selection announced
व्यक्तिवेध: समीर शाह

भारतातील माध्यमांचे स्वातंत्र्य, त्यांचा कामाचा दर्जा या गोष्टींवर प्रश्नचिन्ह लावले जाण्याच्या सध्याच्या काळात बीबीसी म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश माध्यम क्षेत्रातील अखेरचा शब्द मानल्या जाणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉ. समीर शाह यांची निवड जाहीर झाली असून त्यांच्या अधिकृत नियुक्तीची फक्त औपचारिकताच बाकी आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या पसाऱ्यात झाकोळलेला माध्यम व्यवसाय, बीबीसीने जाहीर केलेली ५० कोटी पौंडांची खर्चकपात, परवाना फी दोन वर्षांसाठी गोठवलेली असल्याने निधीत वाढ होण्याची शक्यताही कमी, आधीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांची वादग्रस्त कारकीर्द अशा सगळय़ा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने अध्यक्षपदासाठी समीर शाह यांचे नाव निश्चित केले आहे आणि ७१ वर्षीय समीर शाह हा डोलारा सांभाळायला सज्ज झाले आहेत.

हे शाह कुटुंब मूळचे औरंगाबादचे. १९६० साली- म्हणजे समीर शाह ११ वर्षांचे असताना आईवडिलांसह ते इंग्लंडला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. त्यांनी बीबीसीमध्ये चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रम विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्याशिवाय २००७ ते २०२० या काळात ते बीबीसीचे अ-कार्यकारी संचालक होते. त्याआधी ज्युनिपर या स्वतंत्र टेलिव्हिजन आणि रेडिओ निर्मिती कंपनीचे ते मालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि त्याहीआधी- १९७९ पासून ‘लंडन वीकएन्ड टेलिव्हिजन’ या कंपनीत संशोधन प्रमुख असा चित्रवाणी कार्यक्रम-निर्मिती आणि माध्यम क्षेत्राचा ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. चित्रवाणी क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना २०१९ मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी ‘सीबीई’(कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) हा किताब बहाल केला होता.

Application by Foreign Creditors for Bankruptcy of Byju to Bangalore Bench of National Company Law Tribunal print economic news
परकीय देणेकऱ्यांकडून ‘बायजू’च्या दिवाळखोरीसाठी अर्ज; राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बंगळूरु खंडपीठाकडे धाव
liquor bottles Subhash Chandra Bose memorial nagpur municipal corporation marathi news
नागपुरात सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाजवळ मद्याच्या रिकाम्या बाटल्या! विविध संघटनांकडून संताप व्यक्त
Central government regulations are unfair private tutors are aggressive
केंद्र सरकारची नियमावली अन्यायकारक, खासगी शिकवणीचालक आक्रमक
Alok Kumar Mehta
राजद-जदयू यांच्यातील वादाच्या चर्चेदरम्यान बिहारमध्ये मोठी घडामोड, लालूप्रसाद यादव यांच्या विश्वासू नेत्याला शिक्षणमंत्रिपद!

ते वांशिक संघर्ष या विषयातील तज्ज्ञ मानले जातात. त्यामुळे २०२२ मध्ये, इंग्लंडमध्येच लीसेस्टर शहरात भारत-पाकिस्तान क्रिकेट ट्वेंटी-२० सामन्यानंतर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचा आढावा घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीत त्यांचाही समावेश होता. त्याआधी २०२१ मधील वांशिक भिन्नता आयोगाच्या अहवालासाठी त्यांनी काम केले होते.

बीबीसी ही ब्रिटनची सार्वजनिक माध्यम कंपनी असल्यामुळे, तिला कामकाजाची वा कार्यक्रमांच्या बाबतीत स्वायत्तता असली तरी तिच्या प्रमुखांची निवड सरकारकडूनच जाहीर केली जाते. शाह यांची निवडही ब्रिटनच्या सांस्कृतिक कार्यमंत्री ल्यूसी फ्रेझर यांनी जाहीर केली. प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी ब्रिटिश लोकप्रतिनिधिगृहाच्या (हाऊस ऑफ कॉमन्स) माध्यम, क्रीडा व सांस्कृतिक कार्यविषयक चयन समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांकडून प्रथेप्रमाणे डॉ. शाह यांची मुलाखत घेतली जाईल. मात्र ‘माझ्या कौशल्याने, अनुभवाने मी या संस्थेला आगामी आव्हानांसाठी तयार करू शकलो तर माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल’ अशी प्रतिक्रिया जगभरच्या प्रसारमाध्यमांना देऊन डॉ. शाह यांनीही, नियुक्तीचा उपचारच बाकी असल्याचे सूचित केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Freedom of media in india british broadcasting corporation sameer shah selection announced amy

First published on: 08-12-2023 at 02:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×