संगणकीय दृष्टी ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक अविभाज्य घटक झाली आहे. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत तिचा उपयोग केला जात आहे. त्यातील काही बाबींचा या लेखात उल्लेख केलेला आहे.

आपण कॅमेऱ्यापुढे उभे राहिलो की आपल्या चेहऱ्याची वैशिष्टय़े नोंदवून ती संगणकात साठवून ठेवली जातात. या माहितीच्या आधारे संगणकीय दृष्टी चेहऱ्याची ओळख करू शकते. कधी कधी आपल्याला संदेश येतो की आपला फोटो फेसबुकवर अपलोड केला आहे. तिथे याच तंत्राचा वापर केलेला असतो. चेहरा ओळखण्याच्या तंत्राचा वापर करून गुन्हेगाराची ओळख पटविता येते. गुन्हा करताना त्या व्यक्तीने मेकअप केला असेल तरी काही अडत नाही.

Make Purana chi Karanji
गोड खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा पुरणाची करंजी; पटकन लिहून घ्या साहित्य अन् कृती
Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
Facial Exercise For Glowing Skin Yoga for anti-ageing
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Here are six tips to make your old car look new
तुमची जुनी कार नवी दिसण्यासाठी ‘या’ सहा टिप्स करतील मदत; कार दिसेल नेहमी चकाचक
Portfolio Building for Design Career
पोर्टफोलिओ :डिझाइन क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली
side effects of vitamin c
‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता

संगणकीय दृष्टीचा वैद्यकीय क्षेत्रात खूप उपयोग होतो. दवाखान्यात क्ष किरण (एक्स-रे) चित्र, एमआरआय चित्र, ईसीजी, अँजिओग्राफी, अल्ट्रासाऊंड इमेजिंग अशा अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतात. त्यात मिळणाऱ्या चित्रांचे निरीक्षण करून डॉक्टर रोगाचे निदान करतात. हे काम संगणकीय दृष्टी लीलया करू शकते. विशेषत: रोगी आणि डॉक्टर एकमेकांपासून दूर असतील तर या तंत्राचा फारच उपयोग होतो. यात केवळ रोगाचे निदान केले जात नाही तर त्यावर उपाययोजना सुचविण्याचे कामदेखील संगणकीय प्रणाली करते.

आजकाल स्वयंचलित वाहनांचे प्रस्थ वाढत चालले आहे. चालकाविना चालणाऱ्या वाहनात अनेक कॅमेरे असतात. ते रस्त्यांची स्थिती, आजूबाजूला असलेल्या वस्तू, सिग्नल या सगळय़ा बाबींची माहिती वाहनातील संगणकाला देतात. त्या माहितीचे विश्लेषण करून संगणक वाहनाला चालण्याची किंवा थांबण्याची सूचना देते. विमान चालवताना ते ठरावीक उंचीवर गेले की ऑटोपायलटवर टाकले जाते.

कारखान्यात मोठय़ा प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन केले जाते. या वस्तू विक्रीला पाठविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासणे आवश्यक असते. हे काम संगणकीय दृष्टीची मदत घेऊन करण्यात येते. यंत्राला दिलेल्या सूचनेनुसार वस्तू योग्य की अयोग्य अशी विभागणी केली जाते.

शेतात पीक उगवले की त्याची निगा राखावी लागते. गरज असेल त्यानुसार पाणी द्यावे लागते, खत घालावे लागते, कीटकनाशके फवारावी लागतात. या सगळय़ा कामांत संगणकीय दृष्टी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. शेतात ठिकठिकाणी लावलेले कॅमेरे शेतपिकांची माहिती देतात. त्याचबरोबर काय करण्याची गरज आहे याची सूचना संगणक देतो. त्यानुसार उपाययोजना करून शेतात चांगले उत्पन्न घेता येते.

उज्ज्वल निरगुडकर ,मराठी विज्ञान परिषद