दिल्लीवाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचं कौतुक करण्याची दोन कारणं आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढत असतात. पण, वाभाडे काढले जात असताना सत्ताधाऱ्यांनीही विरोधी सदस्याचं म्हणणं उत्सुकतेने ऐकावं असं फार थोडया वेळा होतं. अमोल कोल्हे लोकसभेत बोलतात तेव्हा ही किमया प्रत्येक वेळा करून दाखवतात. अनेक खासदारांना सभागृहात बोलण्यासाठी पाच-सात मिनिटं मिळतात. अगदी कमी वेळेत मुद्देसूद आणि प्रभावी भाषण करणं फार कमी सदस्यांना जमतं. अभिनयातून कोल्हेंनी आवाज कमावला असल्यानं ते बोलत असताना सभागृहात शांतता पसरते. मग, मुद्दा थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत जाऊन आदळतो. त्यामुळं कोल्हेंच्या भाषणांची दखल घेतली जाते. त्यांच्या वेगळेपणाचं दुसरं कारण असं की, शुक्रवारी लोकसभेत त्यांनी सादर केलेली कविता कोल्हेंनी स्वत: रचलेली होती! ‘रामराज्य’ अवतरल्याचा दावा करणाऱ्यांचे त्यांनी कवितेतून वाभाडे काढले. या कवितेतील काही ओळी अशा आहेत.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

.. चल पडे हम अयोध्या की ओर रामलल्ला के दर्शन की आस लगाए, जो सामने नजारा देखा वो देख कर दंग रह गए, वो तीन मंजिले ४०० खंबे- ३२ सिडियाँ, जय श्रीराम का नारा लगाते हुए हम सिडियाँ चढने लगे, रामलल्ला से क्या गुहार लगाए ये सोचने लगे, पहली सीडी पर याद आई महंगाई, दुसरी पर देश में बढती बेरोजगारी, तिसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकता, चौथी पर सेंट्रल एजन्सी की संदिग्ध भूमिका, हर सिडी पर कुछ ना कुछ याद आ रहा था, कही १५ लाख का जुमला, कही किसानों का आक्रोश था, कही महिला कुस्तिगरों की वेदना थी, कही सालाना २ करोड रोजगारों का वादा था, कही बढती सांप्रदायिकता थी, तो कही चुनिंदा पुंजीपतीयों पर मेहरबान हमारी सरकार का चेहरा था..

हेही वाचा >>> आधार देणारे अदृश्य खांब हीच खरी संपत्ती

.. हमे नतमस्तक देख रामलल्ला मुस्कुराते हुए बोले, मै कल भी था, आज भी हूँ, कल भी रहुंगा.. मगर याद रखना हमेशा मैने त्रेता युग मे रामराज्य लाया था, तुम कलीयुग मे जीते हो जहाँ संविधान ने गणराज्य लाया है, धर्म समाज का किनारा जरूर है, लेकीन देश एक बहती धारा है, किनारे को धारा के बीच लाया तो प्रवाह अड जाता है, प्रगती की पथ से हट जाता है, धर्म का ठेकेदार नही पेहरेदार बनना चाहिए..

नारीशक्ती

मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रीपदावर राहिले नसले तरी, त्यांच्या ‘लाडली बहना’ योजनेने भाजपने हरलेली लढाई जिंकून दिली. त्यानंतर भाजपकडून नारीशक्तीचा उल्लेख वारंवार होताना दिसतो. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीरसभांमध्ये विकासातील महिलांचे महत्त्व सांगितले जाते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी पत्रकारांना दिलेल्या बाईटमध्ये मोदींनी, हे अधिवेशन म्हणजे नारीशक्तीचा उत्सव म्हटले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या अभिभाषणामध्ये महिला विकासाचा मुद्दा होता. मोदींच्या चार प्रमुख ‘जातीं’मध्ये एक ‘जात’ महिलांची आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेची आकडेवारी दिली. महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या निधीचा उल्लेख केला. महिलाविषयक योजनांसाठी अर्थसंकल्पातील तरतूद सांगितली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन संसदेत येण्यापूर्वी मुर्मूना भेटायला गेल्या होत्या. दोघींच्या भेटीला भाजपने विशेष प्रसिद्धी दिली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेची सुरुवात हीना गावित यांनी केली. त्यांच्या भाषणामध्ये महिलांची चर्चा केली गेली. त्यानंतर भाजपच्या बहुतांश सदस्यांचं भाषणही महिला केंद्रित होतं. महिला मतदारांच्या भरवशावर मध्य प्रदेशमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळू शकतं तर, त्याचा कित्ता लोकसभा निवडणुकीतही गिरवला जाऊ शकतो. दोन आठवडयांत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला दिसेल. भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू महिला मतदार असतील हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दोन-तीन दिवसांच्या भाजपनेत्यांच्या विधानांवरून दिसू लागलं आहे.

नवी संसद, नवी सुरक्षा

दोन तरुणांनी लोकसभेत उडी मारून अख्ख्या यंत्रणेला हादरवून टाकलं आहे. त्यांनी संसदेची सुरक्षाव्यवस्था बदलून टाकली. त्यामुळं आधीच बंदिस्त असलेली नवी संसद आणखी आकुंचित झाल्यासारखी वाटू लागली आहे. कोणी तरी उडी मारेल या विचाराने यंत्रणा इतकी हबकून गेली आहे की, सगळया कक्षांमधील पहिल्या रांगेतील सर्व आसनं काढून टाकण्यात आली आहेत. एखाद्याला उडी मारायची असेल तर ती व्यक्ती जणू त्या खुर्च्याचा आधार घेईल असं कोणाला वाटत असेल तर तिच्या कल्पनाशक्तीची कमाल म्हटली पाहिजे. तरुणांनी प्रेक्षक कक्षातून उडी मारली तेव्हा कक्षामध्ये एकही सुरक्षारक्षक नव्हता. आता कक्षांमध्ये सुरक्षारक्षकांशिवाय कोणी दिसत नाहीत. कक्षात उभ्या असलेल्या या रक्षकांची अडचण अशी की, त्यांना अध्यक्षांच्या आसनाकडं पाठ करून उभं राहता येत नाही, तसं केलं तर तो अध्यक्षांचा अपमान समजला जातो. जुन्या सदनामध्ये मोठंमोठे खांब होते, त्याच्या आडोशाला उभं तरी राहता येत होतं. आता कुठलासा छोटा कोपरा बघून त्यांना लपून राहावं लागतं. हे सुरक्षारक्षक संसदेच्या अखत्यारीतील ‘वॉच अ‍ॅण्ड वॉर्ड’ विभागातील आहेत. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी याच विभागाकडं होती. आता ही जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडं दिली आहे. ‘सीआयएसएफ’चे १४० हून अधिक जवान संसदेत येऊन दाखल झाले आहेत. संसदेच्या प्रवेशद्वारापासून सभागृहांच्या प्रवेशद्वारांपर्यंत प्रत्येक प्रवेशद्वारावर हे जवान तैनात केलेले आहेत. संसदेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची झडती घेणं एवढंच त्यांचं काम. विमानतळावर याच दलाचे जवान प्रवाशांची झडती घेत असतात. तशीच तपासयंत्रणा संसदेत दिसू लागली आहे. त्यामुळं ‘सीआयएसएफ’च्या जवानांकडं हताशपणे बघत राहण्याशिवाय संसदेच्या सुरक्षेच्या हाती काही उरलेलं नाही. ‘सीआयएसएफ’मुळं दिल्ली पोलिसांचं काम कमी झालेलं आहे. संसदेच्या आवारात त्यांचं संख्याबळही कमी झालेलं दिसतंय. प्रवेशद्वारांवर ‘सीआयएसएफ’, संसदेच्या आवारामध्ये ‘सीआरपीएफ’ आणि दिल्ली पोलीस तर संसदेच्या आतमध्ये ‘सीआयएसएफ’ व संसदेची सुरक्षा असे सुरक्षेचे तीन नवे स्तर निर्माण केलेले आहेत. इतका कडेकोट बंदोबस्त पाहून कोणालाही धडकी भरेल. पूर्वी खासदारही संसदेच्या आवारात गप्पा मारताना दिसत असत, आता अधिवेशनाचं कामकाज संपल्यावर काही मिनिटांमध्ये संसदेचं आवार चिडीचूप होतं. तशीही विद्यमान सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का याचीच चिंता आहे.

आता भेट पुढच्या वर्षी..

नव्या संसदेमध्ये मध्यवर्ती सभागृहच नाही. जुन्या संसदभवनामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण, संयुक्त अधिवेशनाचं सत्र मध्यवर्ती सभागृहात होत असे. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी या सभागृहाचं महत्त्व कमी करू टाकलं. इथं बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं असा समज असल्याने नव्या इमारतीमध्ये मध्यवर्ती सभागृहाला जागाच दिली गेली नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील सदस्यांना एकत्र येण्याचं ठिकाण नाहीसं झालं आहे. संसदेच्या आवारात कोणी कोणाशी संवाद साधू नये असं कोणाला वाटत असेल तर संयुक्त सभागृह असणारच नाही. पण, प्रश्न होता की राष्ट्रपतींचं अभिभाषण कुठं घ्यायचं? नव्या लोकसभेच्या सभागृहात दोन्ही सदनांतील सदस्य बसण्याएवढी आसनक्षमता असल्यानं तिथंच अभिभाषण घेण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानिमित्ताने दोन्ही सदनांतील सदस्यांना एकत्र येता आलं हे काय कमी झालं? अलीकडच्या काही वर्षांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये उभी रेघच मारलेली असावी असं वातावरण निर्माण झालंय. ही रेघ अभिभाषणाच्या वेळी पुसली गेली होती. सत्ताधारी सदस्य विरोधी बाकांवर बसलेले होते. सोनिया गांधींच्या आसनावर नारायण राणे स्थानापन्न झाले होते. त्यांच्याशेजारी धर्मेद्र प्रधान बसले होते. प्रकाश जावडेकर यांच्या शेजारी कणीमोळी बसलेल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची सरमिसळ पाहायला मिळाली. आता त्यांना पुढच्या लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी एकत्र येण्याची संधी मिळेल. तोपर्यंत संसदेतील चेहरेही बदललेले असतील!