भारतातल्या पाणी उपलब्धतेबद्दल जागतिक बँकेने चिंता व्यक्त केली, इतक्या गंभीर पातळीला आपण गेल्या सात दशकांत पोहोचलो आहोत…

निवडणुकांच्या ऐन धामधुमीत ‘लोकसत्ता’ने गुरुवारी (२१ मार्च) राज्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य दर्शवणाऱ्या वृत्तास मुख्य मथळ्याचे स्थान दिले. मार्चदेखील अजून संपलेला नाही आणि राज्यातील सुमारे तीन हजार गावे आताच टँकरग्रस्त झाली असून धरणांतील सरासरी पाणीसाठा जेमतेम ४१ टक्क्यांवर आलेला आहे. दक्षिणेतील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी आताच सरासरी २८ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्यातही आंध्र प्रदेश (२२ टक्के) आणि कर्नाटक (२९ टक्के) या दोन राज्यांतील स्थिती अधिक गंभीर दिसते. तुलनेने केरळमध्ये गेल्या दहा वर्षांतील ५४ टक्क्यांच्या सरासरीपेक्षा यंदा ४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तेलंगणमध्येही ही स्थिती सरासरी ५९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. पुढील दोन महिन्यांत ही स्थिती अधिक गंभीर होणार असल्याने त्याचे परिणाम तेथील नागरिकांना भोगावे लागणार आहेत. या भयावह वास्तवाची झलक बंगळूरुत सध्या पाहावयास मिळते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial water scarcity crisis in the state three thousand villages affected by water tankers amy
First published on: 22-03-2024 at 00:04 IST