चिंतन थोरात

समाजमाध्यमांमुळे जगातील अनेक परंपरागत बंधने अचानकपणे नष्ट झाली आणि प्रतिभावंत व्यक्तींना आपले विचार, कलागुण इत्यादी थेट जगासमोर मांडण्याची मुभा मिळाली. सर्वाना आपला आवाज, आपले विचार, साहित्य, अभिनयकौशल्य इत्यादी जगासमोर मांडण्याची समान संधी प्राप्त झाली. यामुळेच जगाला जस्टिन बिबर-शॉन मेंडेस यांच्यासारखे गायक मिळाले. केट अपटनसारखे नवीन मॉडेल्स आपल्याला पाहायला मिळाले. प्राजक्ता कोळी, मिथिला पालकर या अभिनेत्रींचा उदयदेखील समाजमाध्यमांतूनच झाला. सर्वसामान्य म्हणवल्या जाणाऱ्यांमधील असामान्य प्रतिभा जगासमोर आणण्याची किमया समाजमाध्यमांमध्ये आहे. समाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतसे अनेक जण आपले विचार व आपल्या कलागुणांचे सादरीकरण समाजमाध्यमांवरून जगासमोर करू लागले. त्यातील ज्या वापरकर्त्यांचे (‘युजर्स’) ‘आशय’ किंवा ‘सामग्री’ (‘कन्टेन्ट’) लोकांना आवडू लागले, त्यांना लाखोंच्या संख्येने लोक ‘फॉलो’ करू लागले. यातूनच सुरुवात झाली ‘प्रभावशाली व्यक्ती’ (‘इन्फ्लुएन्सर्स’) या नवीन संकल्पनेची!

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

हेही वाचा >>> निःशुल्क पार्किंगसाठी जागा आहे, परवडणाऱ्या घरांसाठी नाही ?

‘प्रभावशाली व्यक्ती’ (‘इन्फ्लुएन्सर्स’) म्हणजे जनमतावर प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्ती. खरे पाहता ‘इन्फ्लुएन्सर्स’ या संकल्पनेमुळे समाजाला खूप फायदा होऊ शकला असता. किंबहुना, त्याची सुरुवात तशीच झाली होती. परंतु हळूहळू समाजमाध्यमांच्या ‘डोपामाईन-ड्रिव्हन अल्गोरिदम्स’मुळे समाजमाध्यमांचे स्वरूप बदलत गेले. हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या एका लेखानुसार, समाजमाध्यमांच्या मालक कंपन्यांनी लोकांना वारंवार आपले अ‍ॅप वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी माणसाला कुठल्याही गोष्टींबाबतीत व्यसनाधीन करणाऱ्या आपल्या शरीरातील डोपामाईनचे (एक रसायन) प्रमाण कसे वाढत राहील त्यानुसार आपल्या अ‍ॅपचे सूत्र बनवले आहे. त्यामुळे त्यांचे हे सूत्र सतत असाच ‘आशय वा सामग्री’ (‘कन्टेन्ट’) आपल्या ‘फीड’वर दाखवतात; ज्यामुळे आपल्या शरीरातील डोपामाईन व तत्सम हार्मोन्स प्रवृत्त होत राहतात आणि आपण त्या अ‍ॅप व त्यातील ‘कन्टेन्ट’शी भावनिकदृष्टय़ा जोडले जातो. लोकांचा समाजमाध्यमांतील ‘लाइक्स’ आणि लोकप्रियतेचा हव्यास वाढू लागला आणि त्यासाठी वाट्टेल त्या पद्धतीने ‘कन्टेन्ट’ वापरकर्त्यांच्या माथी मारण्याची स्पर्धाच सुरू झाली. खरे तर समाजातील विविध विषयांतील विद्वान किंवा प्रतिभावान मंडळींनी समाजमाध्यमांवर ‘इन्फ्लुएन्सर्स’ होणे अपेक्षित होते. त्यातून त्यांचे चांगले विचार आणि असामान्य प्रतिभा समाजात सर्वदूर पोहोचणे शक्य झाले असते. आणि जगातील लाखो लोकांनी त्यांना ‘फॉलो’ केले असते तर विचारांची आणि प्रतिभेची एक नवी उंची समाज म्हणून आपण गाठू शकलो असतो. परंतु प्रत्यक्षात झाले भलतेच! समाजमाध्यमांच्या या राक्षसी अल्गोरिदममुळे आणि झटपट लोकप्रिय व्हायच्या लोकांच्या हव्यासापोटी आज ‘इन्फ्लुएन्सर्स’ या संकल्पनेने चुकीचे वळण घेऊन भलतेच उग्र स्वरूप धारण केले आहे.

हेही वाचा >>> उर्फीच्या माध्यमातून भाजप करत असलेल्या राजकारणाचा फटका हिंदू स्त्रियांनाही बसणार आहे…

जगभरात आज जवळपास तीन अब्जांपेक्षा जास्त लोक समाजमाध्यमांचा वापर करतात. सध्या शेकडो प्रकारची समाजमाध्यमे अस्तित्वात आहेत. परंतु जिथे असंख्य लोक परस्परांशी संवाद साधू शकतात अशी पाच सर्वात जास्त वापरली जाणारी समाजमाध्यमे म्हणजे फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन्! या पाचही समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ‘कन्टेन्ट’ लोकांपर्यंत पोहोचवला जातो. फेसबुकवर जास्तकरून फोटो आणि लिखित ‘कन्टेन्ट’ तयार केला जातो. फेसबुकवर शक्यतो लिखित ‘कन्टेन्ट’चीच संख्या आधिक्याने असते. शब्दमर्यादा नसल्यामुळे फेसबुकवर एखादा विषय विस्ताराने मांडता येतो. गेल्या काही वर्षांत फेसबुकवर व्हिडीयोदेखील मोठय़ा प्रमाणात पाहिले जाऊ लागले आहेत आणि खासकरून फेसबुक लाइव्हची लोकप्रियता तर काही औरच आहे. यूटय़ूब हे प्राथमिकत: व्हिडीयो कन्टेन्ट पोस्ट करायचे माध्यम आहे. व्हिडीयोद्वारे बातम्यांपासून ते लघुपटांपर्यंत विविध प्रकारचा कन्टेन्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. इन्स्टाग्राम हे सुरुवातीला फक्त फोटोंना समर्पित माध्यम होतं, पण नंतर भारतात टिकटॉकच्या बंदीनंतर तिथे टिकटॉकसदृश्य छोटय़ा व्हिडीयोंचे (इन्स्टाग्राम रील्स) प्रमाणही वाढू लागले. ट्विटर हे सामाजिक जीवनातील सर्वात महत्त्वाचे समाजमाध्यम समजले जाते. इथे २८० शब्दांमध्ये विविध विषयांवरचे आपले विचार लोक मांडतात. ही सर्व समाजमाध्यमे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टीने वापरली जातात.

हेही वाचा >>> ‘नागा शांतता करारा’पेक्षा भाजपचे राजकारण वरचढ ठरेल?

लिंक्डइन् मात्र व्यावसायिक नेटवर्किंगसाठीच समर्पित समाजमाध्यम आहे. त्याचे सर्व फीचर्स फेसबुकसारखीच आहेत, पण उद्देश वेगळा आहे. या सर्व समाजमाध्यमांमधील ‘कन्टेन्ट’ जरी भिन्न असला तरी सर्वामध्ये काही गोष्टी समान आहेत. त्या म्हणजे त्यांच्यातील डोपामाइनवर्धक अल्गोरिदम्स आणि त्यांच्या वापरकर्त्यांना झटपट लोकप्रिय होण्याचा हव्यास! या दोन्हीमुळे समाजमाध्यमांच्या बाबतीत आणखी एक समान गोष्ट झालेली दिसते. ती म्हणजे ही समाजमाध्यमे विचारांपेक्षा मांडणीला अधिक महत्त्व देताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या वापरकर्त्यांनी त्यावर टाकलेल्या ‘कन्टेन्ट’मधील विचारांच्या खोलीपेक्षा त्याच्या आकर्षकतेवर आणि भावनात्मकतेवर जास्त भर दिला जातो. उदाहरणार्थ, फेसबुकवर अर्थसंकल्पावर एखाद्या तज्ज्ञाने अतिशय मुद्देसूद आणि सर्व बाजूंचा विचार करून पुढील वर्षभराची दिशा समजावून सांगणारा लेख लिहिला तर कदाचित त्याला १००-२०० लाईक्स मिळतात आणि एक ते दीड हजार लोकांपर्यंत तो लेख पोहोचतो. पण जर का एखादा असा ‘इन्फ्लुएन्सर’ असेल; ज्याला त्या विषयाचे फार ज्ञान नाही, परंतु त्या विषयाची गंभीरता न समजून घेता केवळ भाषेच्या प्रभुत्वाद्वारे त्याने अर्धवट माहिती देणारा, भावनाविवश करणारा लेख लिहिला तर त्याला हजार-दोन हजार ‘लाईक्स’ मिळून जवळपास दहा-पंधरा हजार लोकांपर्यंत त्याचा ‘कन्टेन्ट’ पोहाेचतो.

हेही वाचा >>> इराणची हिजाबविरोधी चळवळ चार महिन्यांनंतर कुठे जाते आहे?

ट्विटरवरदेखील लोकप्रिय व्हायचे असेल तर एखाद्याला ट्रोल करणे किंवा विनाकारण लोकांशी भांडणे हा सोपा मार्ग बनला आहे. तेथेही अनेकदा तज्ज्ञांपेक्षा खिल्ली उडवणाऱ्या किंवा टोकाची भूमिका घेऊन जोरजोरात वादविवाद करून भावना भडकावणाऱ्या लोकांना जास्त लोकप्रियता मिळताना दिसते. यूटय़ूब हे मुळातच दृक्श्राव्य माध्यम असल्यामुळे दिखावा हा यूटय़ुबचा महत्त्वाचा भाग आहेच; पण आश्चर्यकारकरीत्या इथे ‘कन्टेन्टला’देखील तेवढंच महत्त्व आहे. बऱ्याचदा अनेक व्हिडीओंना फक्त आणि फक्त त्यातील कन्टेन्टमुळेच लाखो ‘वूज्’ मिळालेले बघायला मिळतात. अर्थात यूटय़ूबवर ज्यांच्या व्हिडीओज्ची प्रकाशयोजना व ध्वनियोजना चांगली असते त्यांना जास्ती ‘फॉलोअर्स’ मिळतात असे एक संशोधन सांगते. लिंक्डईनची अवस्था तर ‘कहॉं से निकले और कहॉं पहुंच गये’ अशी झाली आहे. जे समाजमाध्यम व्यावसायिक नेटवर्किंगसाठी तयार केले गेले होते, ते आता जागतिक निबंध स्पर्धेचे व्यासपीठ बनले आहे. लिंक्डईनमधील पोस्ट्समध्ये विचार १०-२० टक्केच असतो, बाकीचा भर अलंकारिक भाषा वापरून ‘कन्टेन्ट’ आकर्षक करण्यावरच असतो असे येथील ‘इन्फ्लुएन्सर्स’ खासगीत सांगतात. असेच काहीसे इन्स्टाग्रामवर आहे. इथे आकर्षकता विचारांपेक्षा कित्येक पटीने महत्त्वाची ठरते. इन्स्टाग्रामवर फार गंभीर स्वरूपाचा कन्टेन्ट नसतो. शक्यतो अन्न, प्रवास, संगीत, अभिनय इत्यादीबद्दलचा ‘कन्टेन्ट’ जास्त असतो. पण इथेही सौंदर्य व आकर्षकतेवरच अधिक भर दिसतो. इन्स्टाग्रामवरचे ‘इन्फ्लुएन्सर्स’ नक्की कुठल्या विषयात ‘इन्फ्लुएन्सर्स’ आहेत हे समजण्यात बऱ्याचदा गोंधळ होतो. स्वत:चे शरीरसौष्ठवाचे फोटो टाकून लाखो फॉलोअर्स मिळवलेले युजर्स अनेकदा जीवनाविषयीच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करताना दिसतात. तर वेगवेगळ्या प्रकारे सेल्फी काढून आणि टिकटॉक व्हिडीओ बनवून लाखो फॉलोअर्स मिळवलेले युजर्स पाच हजार वर्षांपूर्वी भारतात उडणारी विमाने कशी होती, हे लोकांना पटवून देताना आढळतात. प्रत्येकाला आपले विचार मांडायचा पूर्ण अधिकार आहे, पण अशा लोकांमुळे आज समाजासमोर मोठे प्रश्न उभे