पुढे जायचे तर जुनाट चौकटी मोडाव्याच लागतात. प्रत्येक पिढीत असा नव्याचा शोध घेणारे अनेक तरुण असतात. त्यांना गरज असते, व्यासपीठाची आणि प्रोत्साहनाची. ‘तरुण तेजांकित’ हे ‘लोकसत्ता’ने या धडाडीच्या तरुणांसाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ! या नवोन्मेषी तरुणांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा २९ मार्च रोजी झाला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले…

अभिषेक ठावरेला पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
Gaurav Vallabh
अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!

अनंत इखारला पारितोषिक देताना सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे गौतम ठाकूर आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

डॉ. सूरज एंगडेच्या वतीने पारितोषिक स्वीकारताना त्याच्या मातोश्री. पारितोषिक देताना वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

ज्ञानेश्वर जाधवरला पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

हेमंत ढोमेला पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

प्रिया बापटच्या वतीने पारितोषिक स्वीकारताना सोनल प्रोडक्शन्सच्या रवीना कदम आणि पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

ओजस देवतळेला पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

निषाद बागवडेला पारितोषिक देताना सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे गौतम ठाकूर आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

राहुल कर्डिलेच्या वतीने पारितोषिक स्वीकारताना विनोद पवार आणि पुरस्कार देताना वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे, केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

ऋतिका वाळंबेला पारितोषिक देताना सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे गौतम ठाकूर आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

प्रियांका बर्वेला पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

राजू केंद्रेच्या वतीने पारितोषिक स्वीकारताना एकलव्य फाऊंडेशनचे सदस्य आणि पुरस्कार देताना वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे, केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

सायली मराठेला पारितोषिक देताना सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे गौतम ठाकूर आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

वरुण नार्वेकरला पारितोषिक देताना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

‘तरुण तेजांकित २०२३’ विजेत्यांसहित परीक्षक समिती आणि प्रायोजक

विवेक तमाईचिकरला पारितोषिक देताना वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे आणि केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल

लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेता अतुल कुलकर्णी

अमित मांजरेकर – आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड

अल्पेश कांकरिया – प्राईस वॉटरहाऊस कूपर्स

अजित पडवळ – लक्ष्य अकॅडमी

भास्कर पारीख – कमांडर वॉटरटेक प्रा. लि.

हर्षदा सांगळे, डॉ. रामदास सांगळे आणि अनिता सांगळे – वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

गौतम ठाकूर – सारस्वत को-ऑप. बँक लि.

अरविंद विंझे – एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.

स्मिता शाह आणि कार्तिक शाह – हॉटेल टिप टॉप प्लाझा

अतुल खराटे – इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लि.

चिंतन जैन – श्री नेमिनाथ ज्वेलर्स

लीलाधर बनसोड – मुंबई विद्यापीठ

रविराज इळवे – कामगार कल्याण आयुक्त

स्वानंदी टिकेकर – सूत्रसंचालक

अविनाश मिश्रा – युनिक पब्लिसिटी

विजय कदम आणि वैभव पवार

शशांक माने – मल्टीमीडिया इन्फॉर्मटिक्स

रीना धुरी – पिंटो अॅडव्हर्टायझिंग

हृषीकेश कदम – पवित्र विवाह

बविता यादव – ऑरियल अॅडव्हर्टायझिंग

भालचंद्र जोशी – ३६० वन

महाराष्ट्र हे सर्वच दृष्टीने देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे आणि इथे चांगले काम केल्यास संधीचे सोने होऊ शकते हा इथल्या तरुणांना विश्वास आहे. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात असलेल्या गुणवत्तेला, व्यावसायिकतेबद्दल असलेल्या जिद्दीला तसेच शहरी आणि ग्रामीण भागांतील नवउद्याोजकांच्या प्रयत्नांना ‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ हा मंच न्याय देत आहे याबद्दल आनंद वाटतो.

डॉ. विपीन शर्मामहाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय’, या ओळी खऱ्या अर्थाने ‘तरुण तेजांकित’ या पुरस्कार सोहळ्याने सार्थ ठरतात. ‘लोकसत्ता’ आणि टीमने या उपक्रमाची चार पर्व अतिशय यशस्वीपणे राबविली आहेत. विविध क्षेत्रांत अफाट काम करणारे चाळिशीच्या आतील अनेक तरुण देशभरात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या कर्तृत्वसिद्धीला तरुण वयातच शाबासकीची थाप देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून होत आहे, याचे मला विशेष कौतुक वाटते. तरुणांना या उपक्रमाच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी मिळाली आणि या प्रक्रियेचा मी एक भाग होते, याचा निश्चितच आनंद आहे.

उषा काकडेअध्यक्षा, ग्रॅव्हिट्स फाऊंडेशन

लोकसत्ता ‘तरुण तेजांकित’ हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा आहे. तरुण पिढी ही देशाची खरी ताकद असते. या उपक्रमातून तरुणाईची सर्जनशीलता, चाकोरीबाहेरचा विचार करण्याची वृत्ती, समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आणि जिद्द दिसते. शहरी भागांतच नाही, तर ग्रामीण भागांतही तरुण आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सामाजिक कामांतून ते समाजाला दिशा देत आहेत, उद्याोगांतून रोजगार निर्मिती करून अर्थव्यवस्थेला आपल्या परीने हातभारही लावत आहेत. या तरुणांची कामगिरी नक्कीच अभिमान वाटावा अशी आहे. ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड’ने नेहमीच परंपरा, वारसा जपत नवनिर्मिती करण्यावर भर दिला आहे, रोजगारनिर्मिती केली आहे. त्यामुळे एक उद्याोग म्हणून आम्हाला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाशी जोडले गेल्याचा आनंद वाटतो.

डॉ. सौरभ गाडगीळपु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड

तरुण तेजांकित’ या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत सकारात्मक आणि दिशादर्शक काम करणाऱ्या तरुणांना समाजापुढे आणण्याचा ‘लोकसत्ता’ प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. ‘लोकसत्ता’च्या अनेक उपक्रमांप्रमाणेच हा उपक्रमही समाजोपयोगीच आहे. या पुरस्कारामुळे विजेत्यांना अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल यात शंका नाही. सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

डॉ. पी. अनबलगनमहानिर्मिती

लोकसत्ता तरुण तेजांकित हा यशस्वी तरुणांना प्रोत्साहित करणारा एक आगळावेगळा उपक्रम आहे. या उपक्रमाचा आम्ही एक भाग आहोत याबद्दल मला आनंद आहे.

शैलेश पाटीलकेसरी टूर्स

नेहमीच्याच क्षेत्रांत परंतु काही तरी नवीन करण्याची उमेद बाळगणाऱ्या तरुणांना समाजापुढे आणणारा मंच म्हणजे ‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ हा उपक्रम. गेल्या सहा वर्षांत असे अनेक तरुण-तरुणी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचले आहेत आणि आपापल्या क्षेत्रातील त्यांची घोडदौड अजूनही सुरूच आहे. समाजासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या या सर्व ‘तरुण तेजांकितां’ना मनापासून शुभेच्छा!

महेश अगरवालरिजन्सी ग्रुप

लोकसत्ता’ने अशा ‘तेजांकितां’ना शोधून काढले आहे, ज्यांचे काम फार मोठे आहे. पण यापैकी काही प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. या विजेत्या तरुण तेजांकितांनी आपले कार्य असेच पुढे सुरू ठेवावे. सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन

अनिता सांगळेवैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

आपण जे काही करतो ते जर पूर्ण एकाग्रतेने केले तर नक्कीच यशस्वी होतो. या वर्षीच्या तरुण तेजांकितांनीही अनेक वर्षे मेहनत केली आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

अल्पेश कांकरियाप्राईस वॉटरहाऊस कूपर्स

फारशी प्रगती न केलेल्या भागांतील तरुणांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या माध्यमातून नवी ओळख मिळत आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागांतील तरुणांनाही काम करताना हुरूप येतो. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो.

भास्कर पारीखकमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड

लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ठुमरी कार्यक्रमासह एकंदरीत संपूर्ण सोहळा सुरेख होता. नवीन काही करू पाहणाऱ्या तरुणाईसाठी हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे. अनेकदा वयाची साठी-सत्तरी ओलांडल्यानंतर कामाची दखल घेतली जाते. मात्र, या उपक्रमामुळे अगदी तरुण वयात नवीन ओळख मिळते. उपक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.

अजित पडवळलक्ष्य अकॅडमी