हिरालाल खैरनार

गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथीच्या रोगाची लागण झाल्याच्या बातम्या सध्या वाचनात येत आहेत. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने किंवा बाधित जनावरांचे दूध सेवन केल्याने माणसांना रोगाची लागण होत नाही, ही बाब अनेक तज्ञांनी विविध माध्यमातून या पूर्वी सांगितलेली आहेच. तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा वेध या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट

या रोगाविषयीच्या तांत्रिक बाबी आता शेतकऱ्यांना व दुग्धव्यवसायिकांना माहीत होऊ लागल्या आहेत. सर्वसामान्यांना त्या माहीत नसल्यामुळे घबराट वा गैरसमज यांना वाव अधिक आहे. जनावरांच्या सर्वांगावर चामडीवर पुरळ , गाठी , फोड साधारण पणे दिसतात. तसा हा रोग नवीन नाही. अनेक वेळेला गायींच्या सडाला (स्तन ) , ओटी (कासेला )अशा प्रकारे गाठी येतात. देवी वर्गातला हा आजार आहे.

फार क्वचित वेळी सर्वांगावर या गाठी किंवा फोड पसरतात, जसे सध्याच्या साथीत दिसून येते. या रोगाची साथ अनेक वर्षांनंतर उद्भवली आहे. इतर साथीच्या आजाराचा प्रसार ज्या वेगाने आणि झपाट्याने होतो, तसे या रोगाच्या बाबतीत घडत नाही. शिवाय मृत्यूचे प्रमाण सुद्धा अत्यल्प आहे. म्हणून शेतकर्यांनी / पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र काळजी घेणे आवश्यक आहे . रोगाची लागण निरोगी गायी – गुरांना होऊ नये म्हणून बाधित जनावरांपासून तात्काळ वेगळी करावी, इतर जनावरांना लस टोचून घ्यावी. गोठा आणि परिसर स्वच्छ करावा, गोमांशा , डास , गोचीड यांचा नायनाट करावा. बाधीत गायी – गुरांवर पशुवैद्दकिय अधिकार्यांच्या कडून उपचार करून घ्यावेत. दुभत्या गायींची धार काढण्यापूर्वी कोमट पाण्यात हळद टाकून कास आणि सड धुऊन कोरड्या फडक्याने पुसून घेतल्यास उत्तम. धार (दूध) काढून झाल्यावर संबंधित व्यक्तीने साबणाने हात धुवून घ्यावे. कच्चे धारोष्ण दूध पिऊ नये. दूध उकळून प्यावे अथवा खावे. ही साधी पथ्ये वाटली, तरी रोगाचा प्रादुर्भाव पाहाता ती पाळावीच लागतील.

दुर्लक्षाचा रोग अधिक जुना!

प्रशासकीय दृष्ट्या मंत्रालया पासून ग्रामपंचायती पर्यंत पशुसंवर्धन हा विषय अतिशय दुय्यम ठरवला जातो. मंत्री, सचिव, आयुक्त या सर्वांची अशी धारणा असते की आपणास दुय्यम खाते दिले. या खात्याचा कार्यभार नाकारण्याकडे कल असतो. तसेच आर्थिक निधी पुरेसा उपलब्ध होत नाही. नवीन पद निर्मिती आणि अस्तित्वात असलेली रिक्त पदे तत्परतेने भरणे या बाबीकडे दुर्लक्ष होते.

पशुवैद्यकीय सेवांचे जाळे राज्य स्तरीय आणि जिल्हा परिषद स्तरीय संस्था असे द्विस्तरीय आहे. त्या – त्या संस्थाचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. मोठ्या शहरांच्या क्षेत्रातही गुरे पाळली जातात, पण या शहरांमध्ये महानगरपालिका मानवी आरोग्य , शिक्षण , पाणी पुरवठा , मलनिस्सारण , स्वच्छता , रस्ते इत्यादी सुविधा पुरवते . मात्र पशुसंवर्धन विषयाकडे महानगरपालिका गांभीर्याने पाहत नाहीत. महानगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः चे पशुवैद्यकीय दवाखान्याने सुरू करणे गरजेचे आहे. २५ वर्षापूर्वी पशुसंवर्धन खात्याची पुनर्रचना करण्यात आली त्यात ही बाब नमूद केली होती, मात्र पुढे राज्य पातळीवर फारसा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे अशा साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी सतत राज्य आणि जिल्हा परिषद स्तरीय संस्थांवर अवलंबून राहावे लागते. अर्थात अशा साथीच्या काळात सर्व संस्थांनी समन्वयाने काम करावेच लागते, तो भाग निराळा.

महापालिका आणि पशुआरोग्य

महानगरपालिकांनी कार्यक्षेत्रात असलेले पशुधन, भटके आणि पाळीव कुत्रे यांची संख्या विचारात घेऊन स्वतःचे पशुवैद्यकीय दवाखाने चालू केले पाहिजेत. पशु आरोग्य सेवा देता येतील, शिवाय भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे , पाळीव आणि भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण करणे , मोकाट गायी – गुरांमुळे रस्ता वाहतुकीवर मोठा परिणाम होतो ,अपघात होतात जखमी जनावरांच्या वर उपचारा मोठा प्रश्न निर्माण होतो. असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.

लम्पी रोगाच्या साथीच्या निमित्ताने का होईना पण सर्वंकष विचार झाल्यास राज्याचे भलेच होईल!

पशुसंवर्धन विभागातून सहाय्यक आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत.

dr.hmkhairnar@gmail.com