पी. चिदम्बरम

नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल जे काही बोलले त्यात खरे तर आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे? ते दोघेही त्यांच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेत्यांच्या भाषणांमधून आजवर सांगितल्या गेलेल्या गोष्टीच तर त्यांनी निष्ठावान अनुयायी उचलतात तशा मन:पूर्वक  उचलल्या आहेत.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

फ्रान्सिस बरॉड हा चित्रकार लिव्हरपूलचा. मार्क या त्याच्या भावाचा मृत्यू झाला. मार्कचा फोनोग्राफ प्लेयर, त्याच्या आवाजातील काही रेकॉर्डिग्ज आणि मार्ककडे असलेला फॉक्स टेरियर जातीचा निपर नावाचा कुत्रा या सगळय़ा गोष्टी फ्रान्सिसकडे आल्या. भावाची आठवण म्हणून मार्क या गोष्टी सतत जवळ बाळगायचा. तो मार्कच्या आवाजातील रेकॉर्ड वाजवायचा, तेव्हा निपर धावत यायचा. आपल्या मालकाचा आवाज येतोय आणि तो दिसत नाहीये म्हणून तो गोंधळून जायचा आणि तो आवाज कुठून येतो आहे, ते समजावे म्हणून अगदी कान देऊन ऐकत बसायचा. फ्रान्सिस जातीचा चित्रकार.. त्याने हे दृश्य रंगवले आणि त्या चित्राला ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ असे शीर्षक दिले. ग्रामोफोन कंपनीने १८९९ मध्ये हे पेंटिंग १०० पौंडांना विकत घेतले आणि त्याचा लोगो केला. हा लोगो इतका लोकप्रिय झाला की, आठ वर्षांनंतर कंपनीने तिचे नाव बदलून एचएमव्ही केले. निपरच्या स्मृती २०१४ मध्ये लंडनमध्ये नीलफलकावर जपल्या गेल्या.

परिघावरचे नाही

गेल्या आठवडय़ात, जेव्हा मी वाचले की भाजपच्या दोन प्रवक्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे (नूपुर शर्मा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आणि नवीन कुमार जिंदल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले), तेव्हा मला निपरची गोष्ट आठवली. मला नूपुर आणि नवीन या दोघांविषयी लिहायचे आहे, पण त्यांचा कोणताही अनादर करायचा नाही, हे कृपया लक्षात घ्या. तर ५ जून रोजी नूपुर यांना एक पत्र मिळाले. त्यात म्हटले होते, ‘‘तुम्ही विविध विषयांवर पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध मत व्यक्त केले आहे.’’ या वाक्याने मला आश्चर्य वाटलेच, शिवाय भारताचे नागरिक असलेल्या मुस्लीम तसेच ख्रिश्चन धर्मीयांबाबतीत भाजपची भूमिका नेमकी काय आहे असा प्रश्नही पडला.

नूपुर आणि नवीन हे भाजपचे निष्ठावान अनुयायी आहेत आणि त्यांचे नेते जे काही म्हणतात, ते हे दोघेही लक्षपूर्वक ऐकतात. तुमच्यासारख्या अनेकांप्रमाणे नूपुर आणि नवीन निरीक्षण करतात, वाचन करतात आणि श्रवण करतात. उदाहरणार्थ, २०१२ च्या गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींनी केलेले भाषण त्यांनी ऐकले असणार. त्यात मोदी म्हणाले होते की, ‘‘आपण पाच कोटी गुजराती लोकांचा स्वाभिमान आणि मनोबल उंचावले, तर अली, माली आणि जमालींच्या योजना आपले काहीही नुकसान करू शकणार नाहीत.’’ पण हे ऐकताना या दोघांना हे प्रश्न पडले असतील का, की अली, माली आणि जमाली हे कोण आहेत? ‘आम्ही’ म्हणजे नेमके कोण? आणि ‘आपले’ नुकसान होईल अशा योजना अली, माली आणि जमाली का काढतील?

संस्मरणीय शब्द

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी २०१७ मध्ये ‘सब का साथ, सब का विश्वास’ हा नारा देताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्याबद्दलची भूमिका मांडली होती. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘तुम्ही एखाद्या गावात कब्रस्तान (मुस्लिमांची दफनभूमी) तयार केले तर स्मशानही (हिंदुंची स्मशानभूमी) तयार केले पाहिजे. या बाबतीत कोणताही भेदभाव नसावा.’’ त्यांच्या या शब्दांनी नूपुर आणि नवीन या दोघांवरही सखोल परिणाम केला असावा.

११ एप्रिल २०१९ रोजी गृहमंत्री अमित शहा आपल्या भाषणात जे म्हणाले, तेदेखील या दोघांनी ऐकले असावे. अमित शहा म्हणाले होते, ‘‘आम्ही संपूर्ण देशात एनआरसीची (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) अंमलबजावणी करू. आम्ही बौद्ध, हिंदु आणि शीख वगळता प्रत्येक घुसखोराला देशातून काढून टाकू. घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची प्रतिज्ञा भाजपने केली आहे. बेकायदेशीर पद्धतीने देशात घुसखोरी करणारे लोक हे वाळवीसारखे असतात. गरिबांसाठी असलेले धान्य ते खातात, नोकऱ्या बळकावतात.’’ हे सगळे ऐकून तेव्हा नूपुर आणि नवीन यांची अगदी खात्री पटली असेल की आपण योग्य व्यक्तीने योग्य ठिकाणी उच्चारलेले योग्य शब्द ऐकत आहोत.

१५ डिसेंबर २०१९ रोजी, झारखंडमधील एका निवडणूक रॅलीत आपले पंतप्रधान म्हणाले होते की, ‘‘गडबड करणारे ‘लोक’ त्यांच्या कपडय़ांवरून ओळखता येतात.’’ नूपुर आणि नवीन यांनी ते भाषण बहुधा ऐकले असेल आणि लोकांना त्यांच्या कपडय़ांवरून ओळखण्याचा संकल्प केला असेल.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथ वारंवार म्हणत होते की, ‘‘स्पर्धा आता खूप पुढे गेली आहे. लढत आता ८० विरुद्ध २० अशी आहे. नूपुर आणि नवीन यांनी हे शब्ददेखील नक्कीच ऐकले असतील आणि ‘२० टक्के’ शत्रू कोण हे त्यांच्या जाणिवेत पक्के बिंबले गेले असेल.

मुस्लिमांबद्दलच्या भाजपच्या भूमिकेबद्दल कोणालाही शंका नाही. एम. एस. गोळवलकर  (गुरुजी) यांच्या  लिखाणात त्याचे धागेदोरे सापडतात. भाजपला देशात, देशाच्या संसदेत तसेच विधिमंडळात मुस्लीम नको आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजपच्या ३७५ खासदारांमध्ये या महिन्याच्या अखेरीस एकही मुस्लीम खासदार असणार नाही. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत किंवा १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने एकही मुस्लीम उमेदवार उभा केला नाही. ११ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, पण फक्त एकाच मुस्लीम व्यक्तीला भाजपने मंत्रीपद दिले आहे. जून २०१२ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून एस. वाय. कुरैशी निवृत्त झाले तेव्हापासून एकाही मुस्लीम अधिकाऱ्याची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली नाही. अर्थात ही उदाहरणे एवढीच नाहीत. त्यांची यादी मोठी आहे.

माझ्या मते, नूपुर शर्मा आणि नवीन कुमार यांनी विविध मुद्दय़ांवर भाजपची भूमिका इमानदारीत मांडली. पक्ष आणि पक्षप्रमुख हे त्यांचे एचएमव्ही- हिज मास्टर्स व्हॉइस आहेत. त्यांनी आपल्या मास्टरचा आवाज ऐकला, त्याचे म्हणणे समजून घेतले आणि ते आपापल्या पद्धतीने बोलले. भाजप ही आधुनिक भारताची ग्रामोफोन कंपनी आहे.

बहिरेपणा चालणार नाही

भाजपला आणि त्यांच्या सरकारला त्यांच्या अल्पसंख्याकविरोधी धोरणांचे आणि भयगंडाचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी वारंवार दिला होता. रोमियोविरोधी पथके, लव्ह जिहाद मोहीम, सीएए, एनआरसी, कलम ३७० रद्द करणे, राज्य विधानसभेतील धर्मातरविरोधी विधेयके यांच्याबाबतीत भाजप सरकारला वेळीच सावध केले होते. हिजाब, हलाल आणि अजान यांसारख्या बिनमहत्त्वाच्या मुद्दय़ांना अति महत्त्व देऊ नका, असेही वारंवार बजावले होते. भाजप सतत काढत असलेले समान नागरी संहिता आणि इतरही अनेक मुद्दे इस्लामविषयीच्या पूर्वग्रहातून सतत पुढे येत आहेत हेही सांगितले. पण सरकारने ते सगळे ऐकून न ऐकल्यासारखे दाखवले. आता, अरब अमिरातींसह इतर १५ देशांनी भाजपच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्याचा निषेध केल्यावर सरकार आपला बचाव करत आहे. परराष्ट्रमंत्र्यांचा तोफखाना थंडावला आहे आणि परराष्ट्र सचिव आपले कौशल्य पणाला लावत आहेत.

या सगळय़ामधली अतिशय खेदाची बाब म्हणजे या सगळय़ा संदर्भात पंतप्रधानांनी निषेधाचा एक शब्दही उच्चारला नाही. आपण या वादळावरही स्वार होऊ शकू आणि फारसे काही न घडता सगळे सुरळीत होऊन जाईल, असे त्यांना वाटते. पण २० कोटी मुस्लिमांना वगळून भारतात राजकीय जीवन सुरळीत होणार नाही हे वास्तव आहे. त्याबाबत या वेळी, विरोधी पक्षांनी नाही तर, जगाने मोदींना आधीच सावध केले आहे.

संकेतस्थळ : pchidambaram.in     

ट्विटर : pchidambaram.in