गेल्या काही वर्षांत विनोद आणि वाद हे अतूट समीकरण झालं आहे. कुणाल कमरा, वीर दास ही त्याची काही बहुचर्चित उदाहरणं. नुकताच बिग बॉस जिंकलेला मुनव्वर फरुकीही याच वर्गातला. तो तर विनोद केल्याच्या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली तब्बल ३७ दिवस तुरुंगात राहून आला आहे. अर्थात त्याच्यावरचा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही हा भाग वेगळा… तो तुरुंगातून बाहेर तर आला, पण त्याचे शो धडाधड रद्द होत गेले आणि मोठ्या प्रयत्नांती उभारलेल्या स्टँड अप कॉमेडीमधल्या करिअरवर त्याला पाणी सोडावं लागलं. इथवर सगळं समजण्यासारखं आहे. यात फार काही नवीन नाही, पण खरे प्रश्न इथून पुढेच सुरू होतात…

देशभर प्रचंड लोकप्रिय असलेला, त्यातही प्रेक्षकांच्या मतांवर हार जीत अवलंबून असलेला बिग बॉस हा शो मुनव्वर जिंकलाच कसा? त्याला एवढी भरभरून मतं दिली कोणी? एवढे लोक त्याच्या बाजूने आहेत, तर त्याने नक्की कोणाच्या भावना दुखावल्या होत्या?

Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Loksatta samorchya bakavarun opposition parties Prime Minister Narendra Modi campaign
समोरच्या बाकावरून: ‘५६ इंची छाती’च्या नेत्याने खोटे का बोलावे?
man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
What Raj Thackeray Said About Hitler?
राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”
IIT mumbai, employee suicide,
ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या
police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?

हेही वाचा – आधार देणारे अदृश्य खांब हीच खरी संपत्ती

रियालिटी शोजच्या सत्यते विषयी शंका असू शकतात. स्टँड अप कॉमेडीयन्सच्या दर्जाविषयी वाद असू शकतात, मात्र आपलं म्हणणं मांडण्याच्या हक्कविषयी कोणत्याही शंका किंवा कोणतेही वाद असण्याचं कारण नाही. जे मंडायचं आहे ते मांडताना कायद्याचं उल्लंघन झालं तर शिक्षा व्हायलाच हवी, पण ती ठोठावण्यापूर्वी आरोप सिद्ध व्हायला हवा, याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही. एखाद्याचा पोटापाण्याचा व्यवसाय त्याच्याकडून हिरावून घेतला जाऊ नये, कारण घटनेनेच प्रत्येकाला अर्थार्जनाचा अधिकार बहाल केला आहे, त्यामुळे त्या अधिकाराविषयीही संशय असण्याचं कारण नाही. एका विनोदावरून मुनव्वरचे हे सर्व अधिकार हिरावून घेतले गेले. आणि तेही त्या विनोदाचा पुरावाही सादर न करता. मुनव्वरची पार्श्वभूमी पाहता त्याच्यासाठी त्याचं काम किती महत्त्वाचं होतं हे लक्षात येतं…

मुनव्वर गुजरातच्या जुनागढमध्ये मुस्लीम कुटुंबात जन्मला आणि वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत तिथेच वाढला. आई – वडील सदैव कर्जबाजारी. तो काळ त्यांच्यासाठी फार खडतर होता. एका मुलाखतीत तो गोध्रा हत्याकांडानंतरच्या दंगलीची आठवण सांगतो- तुम्ही लॉकडाऊन २०२० मध्ये अनुभवलं असेल, आम्ही २००२ मध्येच त्याचा अनुभव घेतला होता. तब्बल १२ दिवस वीज नव्हती. घराबाहेर पडता येत नसे. छतावरून दिसणाऱ्या घडामोडी एवढाच काय तो बाहेरच्या जगाशी दुवा होता…

पुढे २००७ मध्ये त्याच्या आईने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नंतर हे कुटुंब मुंबईत आलं आणि डोंगरीत एका नातेवाइकाच्या बिऱ्हाडातल्या गर्दीत स्थिरावलं. लोक म्हणतात नोकऱ्या नाहीत, पण मुनव्वरला मात्र मुंबईत आल्यानंतर अवघ्या तीन तासांत नोकरी मिळाली. नळ बाजारातल्या एका भांड्यांच्या दुकानात- विक्रेत्याची! ६० रुपये रोज. मग अनेक लहान मोठी काम करत पुढे तो एका जाहिरात एजन्सीमध्ये शिपाई म्हणून कामाला लागला. तिथे त्याने डिझायनिंगचं काम शिकून घेतलं.

तो सांगतो की- जोक तर लहानपणापासूनच खूप सुचायचे पण त्यातून आपलं म्हणणं, आपलं जगणं शेकडो लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि पोटही भरता येईल याची जाणीव झाली नव्हती. ती झाली तेव्हा झपाटल्यासारखे खूप विनोद लिहून काढले. परफॉर्म करू लागलो. यूट्यूबवर अपलोड केले तर चांगला प्रतिसाद मिळू लागला. पण तो कॉमेडीमधून पैसे कमावण्यासाठी पुरेसा नव्हता. काम आवडत होतं त्यामुळे करत राहिलो. तेव्हा अपलोड केलेले शो मला आज पैसे मिळवून देतायत. जरा जम बसला तेवढ्यात लॉकडाऊन लागलं. शो बंद झाले. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर पुन्हा शो सुरू केले तर तेवढ्यात इंदूरची घटना घडली आणि सगळं करिअरच गुंडाळावं लागलं…

इंदूरमध्ये नेमकं काय घडलं?

मुनव्वर आपल्या शोमध्ये सरकार, राजकारण, धर्म, प्रथा परंपरा, कुटुंबव्यवस्था यावर उपरोधिक भाष्य करत असे. त्यांतील विरोधाभासांवर बोट ठेवत असे, व्यांगांची खिल्ली उडवत असे. १ जानेवारी २०२१ला इंदूरमधील एका कॅफेत त्याचा शो सुरू होता. भाजपच्या आमदार मालिनी गौर यांच्या मुलाने तो शो मध्येच थांबवला. मुनव्वर हिंदू देवतांवर आणि अमित शहांवर विनोद करत आहे, असा त्याचा आरोप होता. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. मुनव्वरला अटक झाली. तब्बल ३७ दिवस तो तुरुंगात होता. त्याने असा काही विनोद केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केलं. तो तुरुंगातून सुटला मात्र या एका घटनेने त्याचं करिअर धुळीला मिळालं.

त्यानंतर त्याने रॅप लिहिली. हिपहॉपमध्ये काही प्रयोग केले. मुझिक अल्बम्स केले. अभिनयातही नशीब आजमावून पाहिलं. लॉक अप या कंगना रानौत होस्ट असलेल्या रिॲलिटी शोचा तो विजेता ठरला आणि आता बिग बॉसचाही. खरंतर हा काही दर्जेदार म्हणावा असा कार्यक्रम नाही. अनेकांच्या मते तो तद्दन फुटकळ शो आहे, मात्र या शोचा चाहता वर्गही मोठा आहे. म्हणूनच तर त्याचे १७ सीझन्स झाले आहेत. मुनव्वरनेही शोला साजेसा, पुरेसा उथळपणा केला. पण तरीही त्याचं यश विशेष आहे. कारण तुम्ही एक दरवाजा बंद कराल तर मी दुसरा उघडेन, सगळेच दरवाजे बंद केलेत तर खिडकीतून बाहेर पडेन, खिडक्याही बंद केल्यात तर भिंत फोडून बाहेर येईन, पण प्रत्येक बंदी गणिक मी पुढे जातच राहीन, अशा जिद्दीचं हे उदाहरण आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राचे राजकीय अधःपतन चिंताजनक!

लॉक अप असो वा बिग बॉस डोंगरीकरांचा लाडका मुन्ना जिंकून आल्यानंतर तिथे हमखास गर्दी जमते. जुनाट पडक्या इमारती, चोऱ्यामाऱ्या, गुन्हेगारी, गरिबी अशा नकारात्मकतेची पुटं चढलेला हा परिसर त्याच्या प्रत्येक विजयागणिक झळाळून निघतो. मुनव्वरच्या ५० लाख जिंकण्याने त्यांचे प्रश्न सुटणार नसतात, त्यांचा संघर्ष पुढेही तसाच सुरू राहणार असतो. पण डोंगरी म्हणजे केवळ गुन्हेगारी नाही. इथे प्रामाणिकपणे मेहनत करणारीही माणसं आहेत, हे त्यांना जगाला ओरडून सांगायचं असतं. आपणही असं काहीतरी भारी करू शकतो हे स्वतःला पटवून द्यायचं असतं. धर्माच्या नावे एक संधी हिरावून घ्याल तर १०० संधी निर्माण करू हे आव्हान द्यायचं असतं…

राहिला प्रश्न मुनव्वरला मिळालेल्या मतांचा… तर ही मतं केवळ आणि केवळ एका विशिष्ट वर्गातून आलीत, असं म्हणावं तर एवढी मतं देणाऱ्या वर्गाला अल्पसंख्य म्हणता येणार नाही… मुनव्वरला मतं मिळाली कारण आजही भारतातले बहुसंख्य प्रेक्षक निखळ ज्ञानरंजनासाठी टीव्हीसमोर बसतात. समोरच्या कलाकाराची पार्श्वभूमी, त्याचा धर्म, त्याची जात यातलं काही त्यांच्या गावीही नसतं. त्यांचा ईक्यू म्हणजेच भवनांक उत्तम आहे, दर विनोदागणिक तो दुखावला जात नाही. त्यावर खळखळून हसून सोडून देण्याएवढी उदारता त्यांच्यात शिल्लक आहे… समाजात तट पाडू पाहणारे कितीही बलशाली असेल तरीही सामान्यांनमध्ये खोलवर रुजलेली ही उदारता ते तट झुगरण्यास पुरून उरेल… मुनव्वरचा विजय हा विश्वास दृढ करतो.

vijaya.jangle@expressindia.com