फिक्शन
१) टेल्स ऑफ पोस्टरगंज : रस्किन बॉण्ड, पाने : १५२२९५ रुपये.
मसुरी या निसर्गसंपन्न ठिकाणी राहणाऱ्या रस्किन बॉण्ड यांचं हे १२० वं पुस्तक. त्यांची ही नवी कादंबरीही त्यांच्या नेहमीच्या प्रसन्न आणि ओघवत्या शैलीत आहे. ती वाचताना एका सुंदर आणि रम्य गावातून सफर केल्याचा अनुभव मिळतो.
२) लॉसिंग माय रिलिजन : विश्वास मुदगल, पाने : ३५६१९९ रुपये.
जागतिकीकरणाबरोबर नव-आध्यात्मिक गुरूंचा संप्रदायही उदय पावला. ही कादंबरी अशाच एका गुरू वा आधुनिक ऋषीबद्दल आहे. हे सदगृहस्थ एका कंपनीचे मालक असतात. पण ती नंतर दिवाळीखोरीत निघते. मग ते चंबूगबाळे आवरून अमेरिकेत जातात.. तिथल्या हिप्पींचे गुरू होतात, असा या कादंबरीचा एकंदर ‘आधुनिक’ प्रवास आहे.
३) द व्हॅनिशिंग अॅक्ट : प्रवीण अधिकारी, पाने : २४०२५० रुपये.
हा कथासंग्रह नेपाळी नागरिकांच्या भावना, आकांक्षा आणि स्वप्नांची स्थित्यंतरं मांडतो. नेपाळमधील नागरिक आणि जगभर स्थलांतर केलेले नेपाळी, कॉलेजवयीन नेपाळी तरुणांची स्वप्ने या संग्रहातील कथांमधून प्रतिबिंबित झाली आहेत. या कथांची भाषा सहज प्रवाही आणि संवादी आहे. आपल्या शेजारच्या देशातील समाजवास्तवाची स्थूल कल्पना या संग्रहातून येऊ शकते.
नॉन-फिक्शन
१) इम्प्लोजन- इंडियाज ट्रिस्ट विथ रिअॅलिटी : जॉन एलियट, पाने : ४००६९९ रुपये.
कधीकाळी ‘नियतीशी करार’ केलेल्या भारताला सध्या ‘वास्तवाशी करार’ करताना भ्रष्टाचार, चलता है, विकास, सत्ता, मानवी हक्क आणि जमिनींना आलेला सोन्याचा भाव असा अनेक गोष्टींवरून घुसळण आणि ओढाताण अनुभवावी लागत आहे त्याची ही कर्मकथा आहे.. एका पत्रकाराने वास्तवाला समोर ठेवून रेखाटलेली.
२) द लिव्हिंग गॉडेस : इझाबेला ट्री, पाने : ३५०५९९ रुपये.
काठमांडू येथील एका जिवंत देवीच्या महात्म्याची ही कथा आहे. या देवीला नेपाळच्या राजापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र आदराचं स्थान मिळतं; पण ती वयात आली की तिच्या जागी नवीन मुलीची देवी म्हणून निवड केली जाते. एका बुद्ध मुलीला हिंदू देवी बनवून तिचा महिमा कसा आचरला जातो, त्याची ही गोष्ट. हिंदू देवीच्या या लीला आगळ्यावेगळ्या ठरतात.
३) थिंग्ज युवर मदर नेव्हर टोल्ड यू अबाऊट लव्ह : जुही पांडे, पाने : २१४१९९ रुपये.
प्रेमाची गुंतागुंत, त्यातील पेच आणि त्याच्या अनंत छटा उलगडून दाखवणारे हे पुस्तक ज्यांना प्रेम जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठी वाचनीय ठरण्याची शक्यता आगदीच नाकारता येत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
विशलिस्ट
रस्किन बॉण्ड, पाने : १५२२९५ रुपये. मसुरी या निसर्गसंपन्न ठिकाणी राहणाऱ्या रस्किन बॉण्ड यांचं हे १२० वं पुस्तक. त्यांची ही नवी कादंबरीही त्यांच्या नेहमीच्या प्रसन्न आणि ओघवत्या शैलीत आहे.

First published on: 01-03-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular new arrivals books