News Flash

महाराष्ट्र संगीत

प्रबंध गायकीपासून ते ख्याल गायकीपर्यंतचा अभिजात संगीताचा सारा प्रवास उत्तरेकडील प्रांतांमध्येच घडून आला.

हिंदुस्थानी आणि कर्नाटक

कर्नाटक संगीतातील सगळय़ा रचना देवाचे गुणगान करणाऱ्या असतात आणि कलावंतापासून ते श्रोत्यांपर्यंत सगळय़ांच्याच मनात कलावंताचा धर्म ही बाब महत्त्वाची मानली जाते.

संगीतातील जातिधर्म

कलावंताच्या घडणीच्या काळात प्रतिभा आणि सर्जनशीलता यांच्या साह्य़ाने प्रयोगशीलता आकाराला येऊ लागली.

घराण्यांचे असणे

घराण्यांची अपरिहार्यता, सौंदर्याविष्काराच्या अंगाने आजही महत्त्वाची आहे. चार घराण्यांच्या शैली एकत्र करून एखाद्या नव्या शैलीला जन्म देणे ही सहजसाध्य गोष्ट नसते.

गायकीचा केंद्रबिंदू

किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ काय किंवा जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खाँ काय, त्यांना ज्या शैलीचा साक्षात्कार झाला, तो त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांना संक्रमित करता आला.

कलात्मक बदलाचे संकेत

आज जे ख्याल गायन आपण ऐकतो, ते अमीर खुस्रोचे नव्हे, हे तर सरळच आहे. त्या मूळ शैलीत गेल्या काहीशे वर्षांत वेळोवेळी बदल झाले.

कलांची प्रयोगशाळा

भारतीय संगीतात काही तरी नवे करायचे म्हणून जे बदल झाले, ते सगळेच काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत.

स्वातंत्र्याचे गाणे

कलांसमोर सतत उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीे कलावंत एकेकटय़ाने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतात.

सर्जनाचे गाणे!

रागसंगीताची मूळ चौकट कितीही पोलादी असली, तरीही ती आतून मोठी करण्याचे असामान्य धैर्य अनेक कलावंतांनी दाखवले. एकाच रागाकडे वेगवेगळय़ा अंगांनी पाहण्याची दृष्टी त्यातून विकसित झाली.

सहगान

अभिजात भारतीय संगीताच्या सादरीकरणात सातत्यानं सर्जन घडत असतं. कलावंताला नेमक्या याच सर्जनाची आवश्यकता असते. त्यासाठीच त्याच्या कलाजीवनाची धडपड असते.

जुगलबंदी

संगीतातल्या नवनव्या प्रयोगांना आव्हान देणारं एक साधन म्हणून जुगलबंदीकडे पाह्य़लं जाऊ लागलं आणि त्यामुळे कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतातील दिग्गज एकत्रितपणे गाऊ लागले.

बँड म्युझिक

बँड ही कल्पना आपण भारतीय चित्रपटसंगीतात बेमालूमपणे मिसळली, तरीही कार्यक्रमांच्या पातळीवर ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही.

समूह संगीत

समूह संगीतात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला, ती धून पूर्णपणे समजून घेणं, ती पाठ करणंही भाग पडलं. जे गायनात तेच समूह वाद्यसंगीतातही.

तान कपतान..

तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती रंगत आणत नाही, तर एका वेगळ्या अनुभवाच्या पातळीवर नेऊन

अमूर्त आणि अर्थगर्भ

स्वर आणि लयीच्या या बंधनात राहूनही सतत नवं करण्याच्या या ध्यासातून संगीत सतत नवे अर्थ शोधत राहतं. कलावंत आणि प्रत्येक रसिक यांच्यासाठी हे अर्थ सारखेच असतील, अशी शक्यताही कमी.

हे संगीत ‘शास्त्रीय’ का?

चित्रपटातील गाणी सहजपणे गुणगुणणाऱ्यांच्या मनावर शास्त्रीय संगीताबद्दल एक दडपण का वाटते, याचे खरे उत्तर आजवरच्या कलावंतांनी त्याकडे लक्ष दिले नाही असे आहे.

आज आनंद मना!

कुमारजींचा खरा ध्यास होता, तो सतत काही नवं करत राहण्याचा. मुद्दामहून नवं करण्याच्या हट्टापलीकडे जाऊन, सततच्या चिंतनातून जे सापडत होतं

सर्जनाचं बेट!

राजाश्रयाच्या काळात तो मिळणाऱ्या कलावंतांची संख्या फार मोठी नव्हतीच. म्हणून बाकीचे सगळे संगीत करत नव्हते, असं काही घडलं नाही.

स्वरायन: एका स्वरशताब्दीच्या निमित्ताने..

यंदा जन्मशताब्दी पूर्ण होत असलेल्या गंगुबाई हनगल यांच्या साडेनऊ दशकांच्या जीवनात सुमारे ऐंशी वर्ष तर गाण्यातच गेली. जी गेली, ती नुसती तालीम करून पाठांतर करण्यात गेली नाहीत, तर त्याआधी

लेखन आणि सृजन

संगीत लिहिण्याची पद्धत परकीय संगीतात चांगलीच रुजली. संगीतकारानं संगीत नुसतं निर्माण करून थांबायचं नाही, तर ते लिहून ठेवायचं.

परंतु या ‘सम’ ही..

सम या संकल्पनेनं भारतीय संगीत व्यापून गेलं आणि पाश्चात्त्य संगीताचं आगमन होऊन ते स्थिरावेपर्यंत अढळ राहिलं. परकीय संगीतातही लय या कल्पनेचं स्थान महत्त्वाचंच, पण समेला तिथं स्थान नाही.

कला आणि कारण

एखाद्या मैफलीचं रसग्रहण करणं आणि एकूणच संगीताचा पसारा नव्यानं समजावून सांगणं अशा दोन्ही स्तरावर मराठीमध्ये हे लेखन झालेलं आहे.

Just Now!
X