फिक्शन
१) पॅशन फ्लॉवर-सेव्हन स्टोरीज : सायरस मिस्त्री, पाने : २०८४९५ रुपये.
सायरस मिस्त्री हा इंग्रजीतील मॅड म्हणावा असा विनोदी लेखक आहे. त्याचा सात कथांचा हा संग्रह तसाच आहे. वाचनानंदाचे पूर्ण समाधान देणारा, हसवणारा आणि फँटसी-वास्तव यांचा मेळ घालणारा.
२) द मिरर नोज द ट्रथ अँड अदर स्टोरीज : कुसुम अन्सल, पाने : २०८२९५ रुपये.
भारतातील सुशिक्षित आणि करिअरिस्ट स्त्रियांच्या भावविश्वाची स्पंदनं टिपणारा हा कथासंग्रह प्रेम, स्वओळख, नातेसंबंध आणि स्वशोध यांचा स्त्रीच्या संदर्भात शोध घेण्याच्या प्रयत्न करतो.
३) शिखंडी अँड अदर टेल्स दे डोन्ट टेल यू : देवदत्त पटनाईक, पाने : २६८२९९ रुपये.
भारतातील प्रसिद्ध पुराणकथालेखकाचे हे नवे पुस्तक पुराणातल्या शिखंडी आणि अशाच इतर कथांचे; नव्या दंतकथांची आणि संदर्भाची भर घालणारं.
नॉन-फिक्शन
१) वन लाइफ इज नॉट इनफ : के. नटवर सिंग, पाने : ४६४५०० रुपये.
खरं तर ‘नटवरलाल के हसीन सपने’ असे या आत्मचरित्राचे वर्णन करायला हवे. स्वत:च्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याचे, त्याचे प्रांजळपणे विश्लेषण करायचे सोडून सिंग यांनी जो उद्योग केला आहे, तो गेली काही दिवस बातम्यांचा आणि चर्वितचवर्णाचा विषय झाला आहे.
२) कॅपिटल- अ पोटर्र्ेट ऑफ ट्वेन्टी-फर्स्ट सेंच्युरी दिल्ली : राना दासगुप्ता, पाने : ४०६७९९ रुपये.
जागतिकीकरणाच्या काळात भारतातील मोठय़ा शहरांचा कायापालट होतो आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली कुठल्या स्थित्यंतरातून गेली, कशी बदलते आहे याचा आलेख यात वाचायला मिळतो.
३) अनब्रोकन- अ वर्ल्ड वॉर सेकंड स्टोरी ऑफ सव्र्हाव्हल, रिसायलेन्स अँड रिडेम्पशन : लॉरा हेलेनब्रँड, पाने : ५२८८०० रुपये.
पुढच्या महिन्यात दुसऱ्या महायुद्धाला पंचाहत्तर वर्षे होतील. त्याविषयीच्या बहुचर्चित पुस्तकाची ही सुधारित आवृत्ती रहस्यकथेसारखी थरारक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2014 रोजी प्रकाशित
विशलिस्ट
१) पॅशन फ्लॉवर-सेव्हन स्टोरीज : सायरस मिस्त्री, पाने : २०८४९५ रुपये. सायरस मिस्त्री हा इंग्रजीतील मॅड म्हणावा असा विनोदी लेखक आहे. त्याचा सात कथांचा हा संग्रह तसाच आहे.
First published on: 09-08-2014 at 05:31 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wish list fiction nonfiction