सध्याच्या जगात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि संदिग्धता निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतं. व्यवसायाचं क्षेत्र देखील त्याला अपवाज नाही. अनेक मोठे व्यवसाय, काही स्टार्टअप्स आणि काही प्रस्थापित व्यवसायांमध्ये प्रचंड गुंतागुंत निर्माण करणारे बदल झपाट्याने होत आहेत. नव्या जगातली कौशल्य आणि साहित्यामध्ये पारंगत असणारं मनुष्यबळ या बदलांचा सामना करण्यासाठी आवश्यक होऊन बसतं. त्यात करोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसाय आणि संस्थांची कार्यप्रणाली, आयटी सिस्टीम आणि डिजिटल क्षमतेची कसोटीच लागली आहे. त्यामुळे बदलत्या जगातल्या या नव्या वास्तवाचा सामना करण्यासाठी सर्वच व्यवसायांना, त्यांच्या धोरणांमध्ये, पद्धतीमध्ये आणि नेतृत्वामध्ये अमूलाग्र बदल करणं क्रमप्राप्त झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीमुळे व्यवसायामधल्या याच बहुविध वातावरणात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामध्ये मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅट्रॉनिक्स, क्रिप्टो करन्सी, NFT (नॉन फंजीबल टोकन) मार्केटप्लेस अनेक नवनव्या संकल्पना आहेत. या कल्पनांमुळे अनेकांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. मेटाव्हर्ससारख्या संकल्पना, ज्यांच्या मदतीने आपण किंवा आपले अवतार आपल्या जगभरातील सहकाऱ्यांसोबत एकत्र बसणं शक्य होतंय, त्या नेटवर्किंग आणि टीमवर्कच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. केपीएमजी २०२१ सीईओ आऊटलुक पल्स सर्वेनुसार, ७४ टक्के व्यवसायांच्या प्रमुखांनी त्यांचे व्यवसाय डिजिटाईज्ड झाल्याचं मान्य केलं आहे.

हे बदलते प्रवाह रोजगार पुरवणारे आणि रोजगार शोधणारे यांच्यावर सारखाच परिणाम करणारे आहेत. रोजगार पुरवणाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम एनव्हेअर अर्थात कुठेही बसून काम करण्याची मुभा क्रांतिकारी ठरली आहे. यामुळे त्यांना जगभरातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. कारण इथे कर्मचारी कुठे बसले आहेत, याचा फारसा परिणाम होत नाही. कंपन्यांना आता महत्त्वाच्या ठिकाणांहून कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी मेहनत खर्ची घालावी लागत नाही. त्याशिवाय, त्यांना कुशल मनुष्यबळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा प्रचंड खर्च देखील उचलावा लागत नाही. कारण त्यांना आता जगभरात कुठूनही उत्तम दर्जाचं मनुष्यबळ आणि तेही तुलनेनं स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम एनीव्हेअर ही एक दुधारी तलवारच आहे. कारण सध्याच्या काळातील बहुतेक नोकर्‍या उद्या निरर्थक होतील तर आगामी काळात उघडणार्‍या बहुतेक नवीन नोकर्‍या आज अस्तित्वातही नाहीत. याशिवाय, आगामी काही वर्षांत लाखो नवोदित सुशिक्षित प्रचंड जीवघेणी स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत नोकरीच्या शोधात उतरलेले असतील.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा उभा राहातो की दररोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नव्या व्यवसायांना आवश्यक असलेलं कौशल्य नसताना हे सर्व विद्यार्थी या नव्या कार्यपद्धतीच्या नोकऱ्यांसाठी कशी स्पर्धा करणार? ही जबाबदारी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची आहे. त्यांनी डिजिटल युगामध्ये निर्माण झालेल्या नव्या करिअरच्या संधी आणि त्याअनुषंगाने निर्माण झालेली आव्हाने यांचा अंदाज घेऊन त्यानुसार नवोदित उमेदवारांना प्रशिक्षण द्यायला हवं. जेणेकरून, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये या प्रशिक्षणाचा आणि कौशल्यांचा उपयोग होईल. सरकारला देखील हीच अपेक्षा आहे की सर्व उच्च शिक्षण संस्थांनी असं मनुष्यबळ तयार करावं, जे या नव्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी तयार असेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देईल. दुर्दैवाने आकडेवारीवरून हे सिद्ध झालं आहे की आज अस्तित्वात असलेल्या बहुतेक शिश्रण संस्था तरुणांना अशा प्रकारच्या रोजगारासाठी तयार करू शकत नाहीयेत. कारण त्यांचं लक्ष हे प्रामुख्याने व्यावसायिक कौशल्यांपेक्षा पुस्तकी अभ्यासक्रमावर जास्त केंद्रीत असतं. गाझियाबादच्या आयएमएसमध्ये मात्र गेल्या ३२ वर्षांच्या अनुभवातून तरुणांना २१व्या शतकातील बाजारपेठांसाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकवण्यावर, त्यावर संशोधन करण्यावर, त्यांचं प्रशिक्षण देण्यावर आणि त्यासंदर्भात समुपदेशन करण्यावर भर असतो. नव्या युगाच्या बाजारपेठांसाठी कार्यक्षम आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी संस्थेचा भर हा सामग्र कौशल्ये, संज्ञानात्मक क्षमता, जटिल समस्या सोडवण्याची क्षमता, सामाजिक कौशल्ये आणि पर्यावरणाबाबत उमेदवारांमध्ये जागरूकता विकसित करण्यावर आहे.

संस्थेच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमात कौशल्य विकासासाठी अनेक कल्पक आणि दर्जेदार गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये व्हॅल्यु अॅडेड सर्टिफिकेशन प्रोग्राम, व्हॅल्यु अॅडेड शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम, सेंटर फॉर इनोव्हेशन अँज आन्तरप्रुनरशिप, स्टुडण्ट आऊटरीच, कम्पिटन्सी मॅपिंग अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय, पर्सनल अँड प्रोफेशनल स्किल्स प्रोग्राम, डिपार्टमेंट क्लब अशा कौशल्य वाढवण्यासाठी आवश्यक बाबीही आहेत. त्यासोबतच, व्यवसायांसाठी उमेदवारांची तयारी व्हावी, यासाठी प्लेसमेंट रेडिनेस एनहान्समेंट प्रोग्राम, सीएसआर अॅक्टिव्हिटीज, प्री प्लेसमेंट प्रिपेअर्डनेस कमिटी, कॉर्पोरेट इंटरफेस सिरीज यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी डिस्टिंक्टिव्ह टॉक सिरीज, ग्लोबल अकॅटेमिक कोलॅबोरेशन्स, इंटरनॅशनल स्टडी टूर यांचा समावेश आहे. कॉर्पोरेट विश्वाशी विद्यार्थ्यांची ओळख व्हावी, यासाठी कॉर्पोरेट डेव्हलपमेंट अँड एक्सलन्स सेंटर, एआयसीटीई स्पॉन्सर्ड प्रोग्राम्स, कन्क्लेव्ह आणि इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. सध्याच्या व्यावसायिक बाजारपेठेच्या गरजांना पुरून उरण्यासाठी आमच्या अभ्यासक्रमात ब्लूम्स टॅक्सोनॉमीच्या टप्प्यांप्रमाणे सातत्याने सुधारणा केली जात असते. शिक्षण व्यवस्थेमध्ये संशोधन आणि दर्जा सातत्याने सुधारण्यासाठी संस्थेनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सहकार्य तत्वावर देखील काम सुरू केलं आहे.

सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या जगात टिकाव धरून राहायचं असेल, तर तरुण पिढीने नवी माहिती, ज्ञान आणि कौशल्य शिकण्यात आणि आत्मसात करण्यामध्ये चपळ असायलाच हवं. विद्यार्थ्यांनी हे समजून घ्यायला हवं की ही चपळता शिकणं ही आजच्या काळाची गरज आहे. ही चपळता असल्यामुळे नव्याने उपस्थित होणाऱ्या अडचणींवर नेमकं काय करावं याची कल्पना नसताना ते मार्ग काढू शकतील. यामुळे भूतकाळ आणि वर्तमानकाळातील अनुभवाच्या आधारे कोणत्याही अनिश्चित परिस्थितीचा अंदाज बांधणं विद्यार्थ्यांना शक्य होतं. यासोबतच हे अत्यंत आवश्यक आहे की या देशाचं भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही बंधनांशिवाय त्यांचे पंख उघडायला हवेत. जेणेकरून त्यांना त्यांच्या क्षमतांचा खरा अंदाज येईल.

तरुणांनी केलेल्या कामामुळे त्यांना फक्त बिलं चुकवण्यासाठी पगार मिळतो असं नाही, तर त्यामुळे या देशाच्या युवा पिढीला एक दिशा देण्याचं काम केलं जातं. यामुळे त्यांची उत्पादकता वाढते आणि त्यांना अधिक अर्थपूर्ण असं काहीतरी करण्याची संधी मिळते. युवा पिढीची ही गरज ओळखण्यात अपयश आल्यास त्यातून त्यांना चुकीचं दिशादर्शन आणि समाजात असंतुलन निर्माण होतं. सध्या देशाचं आर्थिक इंजिन पुन्हा रुळावर येण्याच्या मार्गावर असताना, उच्च शैक्षणिक संस्थांनी उत्पादक आणि रोजगारक्षम व्यावसायिक तयार करण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळामध्ये जगभरातल्या संस्था नव्या वास्तवाकडे वळत असताना व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रातील संस्थांनी वाढीची मानसिकता, सहयोगाची भावना आणि शिक्षण आणि कौशल्य विकासासंदर्भात गतिशील दृष्टिकोन स्वीकारायला हवा.

आयएमएस गाझियाबादच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी https://www.ims-ghaziabad.ac.in इथे क्लिक करा!

हे नवं युग येणाऱ्या काळामध्ये कोणत्या दिशेने जाईल, याचा अंदाज सहज लावता येऊ शकेल. पण एकीकडे आख्खं जग या बदलाच्या वेगाशी जुळवून घेत असताना शिक्षण संस्थांनी या सर्व पार्श्वभूमीवर हुशारीने धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे. त्यांना या स्पर्धेतून उडी मारून बाहेर पडायचं आहे की वेगाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज होऊन या प्रवासाचा आनंद लुटायचा आहे!

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ims ghaziabad new age management education focused on corporate readiness and skill enhancement pmw
First published on: 15-03-2022 at 11:08 IST