ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या लढतींसाठी फिरोझशाह कोटला मैदानातील आर.पी. मेहरा ब्लॉक वापराकरिता आवश्यक परवान्यांच्या पूर्ततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (डीडीसीए) बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ३० मार्चला उपांत्य फेरीचा पहिला सामना या मैदानावर होणार आहे.
‘‘आर. पी. मेहरा ब्लॉकमध्ये दोन हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते. यासाठी परवानगी देण्याची विनंती न्यायाधीश मुदगल यांना विनंती केली आहे,’’ असे डीडीसीएचे खजिनदार रविंदर मनचंदा यांनी सांगितले. तिकिटांचे नुकसान आणि रिकाम्या स्टँड्समध्ये महत्त्वाचा सामना नको, या भूमिकेतून आयसीसीने डीडीसीएला निर्वाणीचा इशारा दिला आहे.