भारत-पाकिस्तान ट्वेन्टी २० सामन्याआधी गायलेल्या राष्ट्रगीतासाठी आपण पैसै घेतले नसल्याचे स्पष्टीकरण महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी चार कोटी रुपये घेतल्याचा दावा सोशल मिडियावर सुरु होता. पण हे वृत्त संपूर्णपणे निराधार असून, राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असे विधान बच्चन यांनी केले. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही हे वृत्त फेटाळून लावत, अमिताभ यांची पाठराखण केली आहे. इतकेच नाही तर अमिताभ ज्या चार्टर्ड प्लेनने कोलकात्यात आले त्याचे भाडे तसेच, हॉटेल व्यवस्थेचा खर्च त्यांनी स्वतः केल्याचे सौरभने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2016 रोजी प्रकाशित
राष्ट्रगीतासाठी पैसे घेणारा गरीब मनाचा- अमिताभ बच्चन
राष्ट्रगीतासाठी आपण पैसै घेतले नसल्याचे स्पष्टीकरण महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 20-03-2016 at 14:38 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly confirms amitabh bachchan didnt take a dime to sing national anthem