Microsoft ही एक टेक कंपनी आहे. सध्या आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत सुद्धा कमर्चाऱ्यांची कपात सुरु आहे. मात्र मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांसाठी अजून एक वाईट बातमी आली आहे. कंपनी लवकरच आपल्या Windows 10 Home आणि Windows 10 Pro या डाऊनलोड्सची विक्री थांबवण्याच्या तयारीत आहे. ३१ जानेवारीनंतर वापरकर्ते हे दोन्ही विंडोज डाउनलोड करून शकणार नाहीत. ३१ जानेवारी हा हे विंडोज डाउनलोड करण्याचा आणि लायसन्स विक्रीचा शेवटचा दिवस असेल असे कंपनीने सांगितले आहे. मात्र कंपनी २०२५ पर्यंत विंडीज १० साठी सिक्युरिटी अपडेट देणे सुरु ठेवणार असून, १४ ऑक्टोबर २०२५ पासून विंडोज १० चा सपोर्ट पूर्णपणे बंद केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने आपल्या windows १० प्रॉडक्ट पेजद्वारे ही घोषणा केली आहे. विंडोज १० आणि प्रो डाउनलोड हे ३१ जानेवारीपर्यंत विकीरसाठी उपलब्ध असतील. मात्र व्हायरस, आणि इतर सायबर हल्ल्यांपासून पीसीचे संरक्षण करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सिक्युरिटी अपडेट देत राहणार आहे.

हेही वाचा : Dangerous Apps: तुमच्या स्मार्टफोनमधून ‘हे’ २०३ अ‍ॅप्स डिलीट करा, नाहीतर…

याबाबदल अधिक माहिती मायक्रोसॉफ्टने शेअर केली नसली तरी , ग्राहक मर्यादित कालावधीपर्यंत अधिकृत वेबसाइटवरून Windows 10 Home आणि Windows 10 Pro खरेदी करू शकतात असे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहिल्यास कंपनी सध्या आपल्या windows ११ वर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने २०१५ मध्ये विंडोज १० लाँच केले होते. तर विंडोज ११ २०२१ मध्ये लाँच केले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 january microsoft users not able to download at windows 10 and windows 10 pro tmb 01
First published on: 28-01-2023 at 17:51 IST