गुगल पिक्सेल ७ आणि गुगल पिक्सेल ७ प्रोची लॉंच तारीख समोर आली आहे. कंपनीचा कार्यक्रम ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाईल. भारतीय वेळेनुसार तो संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. या कार्यक्रमात गुगल पिक्सेल ७, गुगल पिक्सेल ७ प्रो आणि गुगल पिक्सेल वॉच सादर केले जातील. याशिवाय, कंपनी लवकरच नेस्ट स्मार्ट होम उत्पादनाची घोषणा करणार असल्याचेही बोलले जात आहे.
कंपनीने पुष्टी केली आहे की गुगल पिक्सेल ७ आणि गुगल पिक्सेल ७ प्रोमध्ये कंपनीचे पुढील जनरेशनचे टेन्सर सोक्स (Tensor SoCs) दिले जातील आणिअँड्रॉइड १३ वर काम करेल. गुगलचे म्हणणे आहे की नवीन चिपसेटमध्ये वापरकर्त्यांना फोटो, व्हिडिओ, सुरक्षा आणि उच्चार ओळखण्यासाठी वैयक्तिक वैशिष्ट्ये मिळतील.
iPhone 14 घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या फीचर्स, भारतातील किंमत, लॉंच डेट आणि बरंच काही…
काही दिवसांपूर्वी, गुगल पिक्सेल ७ प्रो एका अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला होता. यावरून असे दिसून आले आहे की हा फोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये ऑफर केला जाऊ शकतो. यासोबतच या इव्हेंटमध्ये गुगल पिक्सेल वॉचदेखील सादर केले जाईल. या घड्याळात, फीटबीट आरोग्य आणि फिटनेस क्रियाकलापांसह कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये मर्ज केले जाईल. आगामी स्मार्टवॉच सर्व पिक्सेल फोन आणि अँड्रॉइड फोनवर काम करेल आणि यामध्ये कंपनीच्या नवीन वेअरओएसचा अनुभव मिळेल.