सध्या Airtel कंपनीचे ५जी नेटवर्क देशातील सर्वात जास्त शहरांमध्ये पसरलेले आहे. तसेच IPPB बँक देखील भारतीय सरकारद्वारे चालवण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. Airtel आणि India Post Payments Bank म्हणजेच IPB ने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर बँकिंग सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

व्हाट्सअ‍ॅप मेसेजिंग सोल्युशन Airtel IQ द्वारे ग्राहकांपर्यत पोचवले जाणार आहे. यामध्ये एक क्लाउड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सर्व्हिस आहे जी ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांशी व्हॉइस, एसएमएस आणि व्हाट्सअ‍ॅपवर संवाद साधण्याची परवानगी देते. एअरटेलने दावा केला आहे की व्हाट्सएपसाठी बिझनेस सर्व्हिस प्रोव्हायडर (BSP) म्हणून काम करणारी ही जगातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
how to make Pooris Without Rolling Pin
लाटणं न वापरता झटपट बनवा टम्म फुगणारी गोल पुरी! वेळ वाचवण्याचा देशी जुगाड, पाहा Viral Video
Indian Computer Emergency Response Team issues high severity warning For iPad iPhone and MacBook users
सरकारी एजन्सीने जारी केला इशारा; iPad, iPhone अन् ‘या’ युजर्सना हॅकर्सचा धोका

हेही वाचा : Mobile Aadhaar Link: फेब्रुवारीमध्ये आधार कार्डला लिंक झाले १ कोटींपेक्षा अधिक मोबाईल नंबर, तुम्ही केलं नसल्यास जाणून घ्या प्रोसेस

ही सर्व्हिस मिळणार

एअरटेल IPPB ग्राहकांना Whatsapp वर बँकेला कनेक्ट होण्यासाठी आणि बँकिंग सर्व्हिसचा फायदा घेण्यासाठी सक्षमी करणार आहे. या सेवांमध्ये अन्य गोष्टींसाह डोरस्टेप सर्व्हिस रिक्वेस्ट अणि जवळील पोस्ट ऑफिसचा पत्ता द्यावा लागणार आहे. एअरटेल – IPPB WhatsApp बँकिंग सोल्यूशन देखील मल्टी लँग्वेज सपोर्ट तयार करण्यासाठी काम करत आहे. यामध्ये ग्राहकांना अधिक सुविधा मिळणार आहेत. म्हणजेच, देशातील ग्रामीण भागात राहणारे लोक देखील त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा वापरू शकतील. एअरटेलच्या मते, कंपनी बँकेच्या ग्राहकांना २५० दशलक्ष मासिक मेसेज प्रदान करण्यासाठी IPPB सोबत काम करत आहे.

एअरटेल - संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस
एअरटेल – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Airtel IQ एक मजबूत सोपे आणि सुरक्षित क्लाउड कम्युनिकेशन आहे. Airtel IQ चे बिझनेस हेड अभिषेक बिस्वाल यांच्या मते साधायचे एसएमएस आणि व्हॉइस कम्युनिकेशनमध्ये whatsapp मेसेजिंगसह इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना ऑफर केले जाते. IPPB आणि Airtel IQ WhatsApp सोल्यूशनमध्ये थेट एक लाइव्ह ग्राहक सपोर्ट एजंट देखील असू शकतो . यामध्ये ग्राहकांना २४ तास अणि साथी दिवस बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती मिळू शकते.