scorecardresearch

Airtel द्वारे नव्या ऑफरची घोषणा; ग्राहकांना आता अनुभवता येणार अनलिमिटेड 5G नेटवर्कची सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Airtel’s Free Unlimited 5G Data Offer: या ऑफरचा उपयोग करुन ग्राहक 5G+ सेवांचा लाभ घेऊ शकतात.

how to get airtel 5g unlimited data
एअरटेल – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Airtel’s Free Unlimited 5G Data Offer: भारती एअरटेल ही आपल्या देशातील एक नामांकित टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे ग्राहक जगभरामध्ये पसरलेले आहेत. सध्या एअरटेलद्वारे 4G, 4G+, 5G आणि 5G+ नेटवर्कच्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. ग्राहकांना 5G प्लस नेटवर्कची क्षमता अनुभवता यावी यासाठी एअरटेल कंपनीद्वारे नव्या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने 5G प्लस सेवांवरील कमाल मर्यादा काढून टाकल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ग्राहकांना डेटा संपल्यावरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

एअरटेल कंपनीद्वारे दिली जाणारी ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठी रुपये २३९ पासूनच्या अनलिमिटेड रिचार्जवर उपलब्ध आहे. सर्व पोस्टपेड ग्राहक त्यांच्या प्लॅनची ​​पर्वा न करता ऑफरचा दावा करु शकतात. या कंपनीची सेवा घेणारे ग्राहक Airtel Thanks App वर लॉग इन करुन 5G प्लस नेटवर्कचा अनुभव घेऊ शकतात. याव्यतिरिक्त https://www.airtel.in/airtel-thanks-app या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने देखील नव्या ऑफर लाभ घेता येऊ शकतो.

या नव्या ऑफरबद्दल भारती एअरटेलचे कस्टमर बिझनेस डायरेक्टर शाश्वत शर्मा यांनी सविस्तरपणे माहिती दिली. ते म्हणाले, “या प्रास्ताविक ऑफरमुळे आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या 5G प्लसच्या नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे. त्यांना डेटा संपण्याची चिंता न करता या तगड्या नेटवर्कचा वापर करण्याचा अनुभव मिळणार आहे. आम्हाला आशा आहे की ग्राहकांना या नव्या ऑफरमुळे नक्की फायदा होईल.”

आणखी वाचा – नव्या चॅटबॉटमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात? या ‘२०’ क्षेत्रांमध्ये AI घेऊ शकतो माणसांची जागा

रिलायन्स जिओच्या नेटवर्कला टक्कर देण्यासाठी एअरटेलद्वारे देशभरामध्ये 5G नेटवर्क पसरवण्यात आले आहे. २०२४ पर्यंत एअरटेलचे हे नेटवर्क भारतभर पसरवण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीची 5G नेटवर्कची सुविधा भारतातील २७० शहरांमध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 12:43 IST