Airtel recharge plans: सध्या मोबाईल रिचार्ज महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील आघाडीच्या कंपन्या एअरटेल आणि जिओने आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. रिचार्जच्या वाढत्या किंमती ग्राहकांचे टेन्शन वाढवत आहेत. यामुळे अनेक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत आहेत. अशातच एअरटेलने अलीकडेच त्यांच्या ३८ कोटींहून अधिक मोबाइल यूजर्ससाठी २ नवीन प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये यूजर्सना अनलिमटेड कॉलिंग, डेटा आणि ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. एअरटेलच्या या ३ एंटरटेन्मेंट प्लॅन व्यतिरिक्त असे अनेक स्वस्त प्लॅन आहेत ज्यात यूजर्सना जास्त व्हॅलिडिटी दिली जाते.
एअरटेलकडे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह एक प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजर्सना ३६५ दिवसांसाठी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह बरेच फायदे दिले जातात. एअरटेलच्या ३६५ दिवसांच्या वॅलिडिटीसह सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
भारती एअरटेलचा हा स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन २२४९ रुपयांच्या किमतीत येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण ३६५ दिवसांसाठी अनलिमटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यामध्ये यूजर्सना मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा देखील मिळतो. वापरकर्ते संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. तसेच यूजर्सना दररोज १०० मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळेल. एअरटेल या रिचार्जमध्ये एकूण ३० जीबी हाय स्पीड डेटा देते. त्यामुळे यूजर्स कोणत्याही डेली लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतात.
एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन
एअरटेलच्या सर्वात स्वस्त ३६५ दिवसांच्या प्लानबद्दल जाणून घेऊया. या प्लानसाठी तुम्हाला १८४९ रुपये मोजावे लागतात. भारती एअरटेलने या वर्षाच्या सुरुवातीला ट्रायच्या आदेशानुसार हा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन विशेषतः 2जी फीचर फोन यूजर्ससाठी आणण्यात आलाय