भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. ज्या वापरकर्त्यांना ओटीटीचे फायदे असलेले रिचार्ज प्लॅन हवे असतील त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरू शकते. कारण एअरटेलकडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत ज्यामध्ये, ओटीटीचे फायदे मिळतात. रिलायन्स जिओनंतर एअरटेलने देशामध्ये ५जी नेटवर्क सुरु केले आहे.
एअरटेल कंपनीचे प्रीपेड प्लॅन्स हे ५ जी अनलिमिटेड डेटा ऑफर आणि ओटीटी फायद्यांसह येतात. एअरटेलकडे ५०० रुपयांच्या आतमधील काही प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना ओटीटीचे फायदे मिळतात व ५ जी नेटवर्कचा लाभ मिळतो. एअरटेलने ओटीटी फायद्यांसह येणारे रिचार्ज प्लॅन्स कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
ओटीटी फायद्यांसह ५०० रुपयांच्या आतमध्ये असणारे एअरटेलचा प्रीपेड प्लॅन्स
भारती एअरटेकडे १४८ रुपयांचा एक प्लॅन आहे. जो ५०० रुपयांच्या आतमध्ये येतो. या १४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये १५ जीबी डेटासह येतो. याची वैधता वापरकर्त्यांच्या बेस प्रीपेड पिलांच्या वैधतेप्रमाणेच आहे. हा एक डेटा व्हाउचर प्लॅन हे. यामध्ये तुम्हाला एअरटेल एक्सट्रीम प्ले (१५ पेक्षा अधिक ओटीटी) चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.
५०० रुपयांच्या आतमध्ये येणार दुसरा प्लॅन हा ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १००एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले या ओटीटी फायद्यासह अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर केला जातो. तसेच यामध्ये अपोलो 24|7 सर्कल मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे फायदे मिळतात.
एअरटेलच्या तिसऱ्या प्लॅनची किंमत ४९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे २८ दिवसांसाठी मिळतात. तसेच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटा, एअरटेल एक्सट्रीम प्ले, डिस्नी +हॉटस्टार मोबाइलचे तीन महिन्यांसाठी सबस्क्रिप्शन, अपोलो 24|7, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे फायदे मिळतात..