Amazon Great Summer Sale: मे महिना सुरु आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही कडक उन्हाळा आहे. उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक नानाविध प्रकारचे उपाय करत असतात. काहीजण सतत पाणी पीत असतात, तर काहीजण विहीर, तलावाच्या पाण्यामध्ये डुंबलेले असतात. या तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये पंखा, रेफ्रिजरेटर, एसी अशा विद्युत उपकरणांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. या काळात एअर कंडिशनरला मोठी मागणी असल्याने त्याच्या किंमतीमध्येही वाढ होत असल्याचे पाहायला मिळते.

नुकतीच Amazon Great Summer Sale 2023 ला सुरुवात झाली आहे. कमी किंमतीमध्ये अत्याधुनिक एसी विकत घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. या सेलमध्ये एअर कंडिशनरवर अनेक डिस्काउंट ऑफर्स दिल्या जाणार आहेत. बॅंकाकडून दिली जाणारी सवलत आणि एक्सचेंज ऑफर्समुळे तुम्ही अर्ध्या किंमतीमध्ये नवा एसी घरी आणू शकता. अ‍ॅमेझॉनच्या या भव्यदिव्य सेलमुळे एसी खरेदी करण्याचा निर्णय तुम्हाला पुढे ढकलावा लागणार नाही. चला तर मग या सेलमधील उत्तमोत्तम एअर कंडिशनरबद्दल जाणून घेऊयात..

Godrej 1 Ton 5 Star, 5-In-1 Convertible Cooling, Inverter Split AC

गोदरेज कंपनीच्या या एसीची मूळ किंमत ४९,९०० रुपये इतकी आहे. यावर ३५ टक्क्यांची सूट दिली आहे. तेव्हा एसीची किंमत ३२,४९० रुपये इतकी होईल. हा एसी खरेदी करु शकता. ICICI किंवा Kotak बॅंकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्याने १,५०० रुपयांची बचत होईल. जुना किंवा वापरातला एसी एक्सचेंज ऑफरमध्ये दिल्यास ७,००० रुपये वाचवू शकता. बॅंक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरमुळे हा एसी तुम्ही २३,९९० रुपयांना विकत घेऊ शकाल.

Panasonic 1.5 Ton 3 Star Wi-Fi Inverter Smart Split AC

पॅनसॉनिक कंपनीच्या या एअर कंडिशनरची मूळ किंमत ५५,४०० रुपये आहे. अ‍ॅमेझॉन सेलद्वारे या एसीवर ३४ टक्के सूट दिली जात आहे. यामुळे या एसीची किंमत ३६,४९० इतकी झाली आहे. १.५ टन क्षमता असलेल्या या एसीला एनर्जी सेव्हिंगसाठी ३ स्टार्स मिळाले आहेत.

आणखी वाचा – सॅमसंग, अ‍ॅप्पलच्या प्रीमियम फोन्सना टक्कर देण्यासाठी मोटोरोलाने लॉन्च केला नवा स्मार्टफोन; किंमत आहे…

LG 1.5 Ton 5 Star DUAL Inverter Window AC

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये या एसीवर ४२ टक्क्यांची सूट मिळत आहे. परिणामी एसीची किंमत ६८,९०० रुपयांवरुन ३९,९९० रुपये इतकी झाली आहे. जुना एसी एक्सचेंज केल्यावर ८,४६० रुपयांची बचत करता येईल. बॅंक ऑफर जोडल्याने या एसीची किंमत ३०,०३० रुपये होईल. थोडक्यात ऑफर्समुळे हा एसी अर्ध्या किंमतीमध्ये खरेदी करता येईल. (एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी रक्कम ही एसीच्या गुणवत्तेवर निश्चित केली जाईल.)

IFB 1.5 Ton 5 Star Inverter Smart Split Ac with WIFI Ready

या एसीची बाजारातील किंमत ५८,९९० रुपये आहे. यावर अ‍ॅमेझॉन सेल २५ टक्के सूट दिली जाणार आहे. असे केल्याने हा एसी ४३,९९० रुपयांना खरेदी करता येईल. या एसीला एनर्जी सेव्हिंगसाठी ५ स्टार्स मिळाले आहेत.

आणखी वाचा – WhatsApp Web चा वापर करताय? ‘हा’ खास पर्याय मिळाल्याने आता आधीच कळणार सर्वकाही…

LG 1.5 Ton 4 Star AI DUAL Inverter Split AC

LG 1.5 Ton 4 Star AI DUAL Inverter Split AC या एअर कंडिशनरवर अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ४२ टक्क्यांची सूट दिली जात आहे. याची मूळ किंमत ७१,९९० रुपये आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा एसी ४१,४९० रुपयांना खरेदी करु शकता.