ई-कॉमर्स वेबसाइट Amazon उद्या म्हणजेच १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान Amazon प्राइम डे सेलचे आयोजन करत आहे. सेल अंतर्गत, तुम्ही स्मार्टफोन आणि इतर गॅझेट स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तो Amazon वरून विकत घेणे आणि इतर वेबसाइटशी तुलना करणे चांगले होईल. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

‘या’ स्मार्टफोन्सवर मिळेल डिस्काउंट

तुम्ही Amazon वरून ६९,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत iPhone 14 खरेदी करू शकता. ही किंमत बँक ऑफर्ससह आहे. हाच फोन Flipkart वर ७०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे जिथे तुम्हाला Axis Bank क्रेडिट कार्डवर ७५० रुपयांची सूट मिळेल. तुम्हाला क्रोमा येथे iPhone 14 ७२,९९९ रुपयांना मिळेल, तर तो विजय सेल्समध्ये ७०,९९० रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, एकूणच तुम्ही Amazon वरून iPhone 14 स्वस्तात खरेदी करू शकता.

(हे ही वाचा : Chandrayaan-3: चांद्रयान-३ लाँचसाठी सज्ज असताना झोमॅटोने इस्रोला पाठवली ‘ही’ खास डीश! )

Google Pixel 7 5G

हा फोन Amazon वर ५०,९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यावर तुम्हाला १,२७५ रुपयांची सूटही मिळेल. हा फोन फ्लिपकार्टवर ४७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच तुम्हाला Axis Bank क्रेडिट कार्डवर १,००० रुपयांची सूट मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तो फ्लिपकार्टवरून खरेदी करा. हा फोन क्रोमा आणि विजय सेल्सवर उपलब्ध नाही.

Samsung Galaxy S23 5G

जर तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट, क्रोमा आणि विजय सेल्स वरून विकत घेतला तर तुम्हाला तो ७४,९९९ रुपयांच्या किमतीला मिळेल तर Amazon वर कंपनी ७३,९९९ रुपयांच्या किमतीला विकत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

OnePlus 10 Pro 5G

Amazon प्राइम डे सेलच्या टीझरनुसार, हा OnePlus फोन ५१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल तर त्याची किंमत ५६,९९९ रुपये आहे. हाच फोन Flipkart वर ६६,९९९ मध्ये उपलब्ध आहे तर Croma वर ५४,९९९ मध्ये विकला जात आहे. तुम्हाला ते विजय सेल्समध्ये ५६,९९९ च्या किमतीत मिळेल. मात्र, यामध्ये तुम्हाला ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ५,००० रुपयांची झटपट सूटही दिली जात आहे. याचा अर्थ Amazon आणि Vijay Sales या फोनवर सर्वोत्तम ऑफर देत आहेत.