अ‍ॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनी नवनवीन उत्पादने लॉन्च करत असते. आता नोहेंबर महिना हा सणासुदीचा काळ आहे. अ‍ॅपलच्या दिवाळी सेलचा एक भाग म्हणून, कंपनी आयपॅडवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना १० व्या जनरेशनमधील आयपॅडवर डिस्काउंट देत आहे. हे आयपॅड मागील वर्षी लॉन्च करण्यात आले होते. याची मूळ किंमत ही ४४,९०० रुपये इतकी आहे. तर कंपनी १० व्या जनरेशनमधील आयपॅडवर ग्राहकांना किती रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे . तसेच या आयपॅडचे फीचर्स काय काय आहेत. हे जाणून घेऊयात.

अ‍ॅपलच्या १० व्या जनरेशनमधील आयपॅडचे फीचर्स

१० व्या जनरेशनमधील आयपॅडच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये वापरकर्त्यांना फ्लॅट एज डिझाइन आणि ५जी चा सपोर्ट मिळतो. या टॅबलेटमध्ये कंपनीच्या मालकीचे लाइटनिंग पोर्ट नाही आहे. तसेच यामध्ये चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन १५ सिरीजमध्ये देखील यूएसबी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : ओटीटीचे फायदे हवे आहेत? मग एअरटेलकडे आहेत ५०० रुपयांच्या आतमधील ‘हे’ बेस्ट प्लॅन्स, जाणून घ्या

तसेच या टॅबलेटमध्ये तुम्हाला १०.९ इंचाचा डिस्प्ले मिळतो. तसेच पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात येणार आहे. आयपॅड २०२२ मध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आणि समोरील बाजूस देखील १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळतो. या डिव्हाइसला वार्षिक सॉफ्टवेअर अपग्रेड करता येते.

काय आहेत ऑफर्स ?

अ‍ॅपल १० व्या जनरेशनमधील आयपॅडवर आकर्षक डिस्काउंट देत आहे. हे उत्पादन मागील वर्षी लॉन्च करण्यात आले होते. या आयपॅडची मूळ किंमत ४४,९०० रुपये आहे. जी कंपनीने कमी करून आता ३९,९०० रुपये इतकी केली आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या आयपॅडवर ५ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीच्या दिवाळी सेलचा एक भाग म्हणून, १० व्या जनरेशनमधील आयपॅडवर एचडीएफसी बँकेच्या खरेदी कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला ४ हजारांचा अतिरिक्त सूट मिळू शकते. या बँक ऑफरमुळे या आयपॅडची किंमत कमी होऊन ३५,९०० रुपये होते. म्हणजेच दोन्ही ऑफर्सचा विचार केला असता ग्राहकांना आयपॅडवर एकूण ९ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो.

Story img Loader