Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली iPhone 15 सिरिज लॅान्च केली आहे. २२ तारखेपासून आयफोन १५ सिरीजची विक्री सुरू झाली आहे. या सिरीजमध्ये आयफोन १५,आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरिज खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. मात्र ज्या ग्राहकांना आयफोन १४ प्लस खरेदी करायचा आहे. त्या ग्राहकांना आयफोन १४ हा फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळू शकते. तर आयफोन १४ प्लस स्वस्तात खरेदी करण्यासाठी त्यावर कोणकोणत्या ऑफर्स व बँक ऑफर्स मिळत आहेत, हे जाणून घेऊयात.

आयफोन १४ प्लस या फोनला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आयफोन १४ प्लस निळा, जांभळा, मिडनाइट, स्टारलाइट आणि लाल अशा ५ रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. आयफोन १४ प्लसमध्ये देखील आयफोन १३ प्रमाणेच A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. आयफोन १४ प्लसमध्ये १२ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि एक अल्ट्रा वाइड सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन १४ प्लसमध्ये ५जी नेटवर्कचा सपोर्ट मिळतो. हा फोन एकदा चार्ज केल्यास २६ टक्के सुरु राहू शकतो असा Apple चा दावा आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…

हेही वाचा : iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट

आयफोन १४ प्लसचे बेस मॉडेल भारतात ८९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आले होते. आयफोन १५ प्लसच्या लॉन्चिंगनंतर कंपनीने आयफोन १४ प्लसच्या किंमतीमध्ये १० हजार रुपयांनी कपात केली आहे. आता भारतात आयफोन १४ प्लस ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरु होते. सध्या आयफोन १४ प्लस खरेदीदारांना फ्लिपकार्टवर २४,५९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते. तसेच त्यांना या मॉडेलवर ४०,४०० रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकतो.

आयफोन १४ प्लस हा १४,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर ६४,९९९ रुपयांमध्ये लिस्टेड करण्यात आला आहे. याशिवाय खरेदीदारांनी कोटक बँक, एसबीआय आणि आरबीएल बँकेच्या खरेदी कार्डने व्यवहार केल्यास त्यांना १,२५० रुपयांची सूट मिळू शकते. यामुळे आयफोन १४ प्लसची किंमत ६३,७४९ रुपये इतकी होते. तसेच खरेदीदारांना आपल्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३९,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर्ससह तुम्हाला आयफोन १४ प्लस फ्लिपकार्ट सेलमध्ये ४४,४०० रुपयांच्या डिस्काऊंटनंतर केवळ २४,५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.