आयफोन युजरसाठी महत्वाची बातमी आहे. काही निवडक आयफोन मॉडेल्समध्ये आयओएस अपडेट केल्यानंतर सुरक्षेसंबंधी एक महत्वाचे फीचर अचानक गायब झाल्याचे दिसून आले आहे. या अपडेटमुळे आयफोन युजर्स निराश झाले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅकरुमर्च्या अहवालानुसार, आयओएस १५.७.१ मध्ये एक नवा बग आलेला आहे, ज्यामुळे आयफोनमधील एका महत्वाच्या सुरक्षा फीचरचे व्यवस्थित काम करणे बंद झाले आहे. iphone 12 pro आणि iphone 13 pro युजर्सना फोनमध्ये आयओएस १५.७.१ अपडेट टाकल्यानंतर फोनमधील फेस आयडी फीचर वापरण्यात समस्या होत आहे. हे फीचर फोनमध्ये रिसेट करताना स्क्रिनवर ‘फेस आयडी नॉट अव्हेलेबल एरर’ असा मेसेज येत आहे.

(फोन मधील बॅटरी लवकर संपते का? मग ‘हे’ अ‍ॅप्स तातडीने काढा, गुगलनेही प्लेस्टोअरवरून हटवलेत)

अ‍ॅपलच्या प्रतिक्रियेवर संताप

बगमुळे अनेक आयफोन युजर्सना त्रास झाला आहे. यावर कंपनीने लक्ष देण्याची गरज होती. मात्र, कंपनीला अजूनही हा बग ओळखता आलेला नाही किंवा त्याचे समाधान देखिल तिला काढता आलेले नाही. या अगोदर आयफोनमध्ये बगची समस्या निर्माण झाली होती. त्यावर अ‍ॅपलने नवा अपडेट दिला आहे. मात्र यावेळी पुन्हा बग समस्या निर्माण झाल्याने युजर्सना आयफोनमधील फीचर वापरताना त्रास होत आहे. त्यामुळे आता युजर्स काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(अबब.. २४ तासांत अ‍ॅपलमध्ये ५० टक्के कर्मचारी कपात? अशी झाली कारवाई)

या वर्षी लाँच केली आयफोन १४ सिरीज

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. त्यामुळे आयफोन १३ प्रो, १२ प्रो च्या किंमतीमध्ये घट झाली आहे. हे फोन्स सेलमध्ये अजून कमी किंमतीत मिळत आहे. अनेकांनी हे फोन्स घेतले आहे. त्यामुळे, नव्या फोनमध्ये जर बगमुळे इतर समस्या निर्माण झाल्या तर याने ग्राहकांमध्ये अ‍ॅपल विषयी नाराजी पसरू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone face id problem after update ssb
First published on: 23-10-2022 at 10:48 IST