scorecardresearch

Premium

Apple स्टोअर्सची भारतातील विक्रमी कमाई ते ट्विटरने २५ लाख भारतीय अकाउंट्सवर घातलेली बंदी, टेक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवर वापरकर्त्यांना एक नवीन फिचर देणार आहे.

weekly tech updates 2023
टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रमुख अपडेट्स (image Credit- प्राजक्ता राणे)

टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक कंपन्यांनी लाखो अकाउंट्सवर बंदी घातली आहे. टेलिकॉम कंपन्यांनी आपले नवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. अनेक नवीन स्मार्टफोन्स, लॅपटॉप लॉन्च झाले आहेत. ChatGpt चा वापर सर्वत्र होताना दिसून येत आहे. तर आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काय-काय घडामोडी झाल्या आहेत ते जाणून घेणार आहोत.

Vodafone-Idea चा ग्राहकांना मोठा धक्का : Vodafone- Idea या टेलिकॉम कंपनीला अजूनही आपले ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. ५ जी नेटवर्क सुरू करण्यासाठी व्हीआय प्रयत्न करत आहे. त्यातच आता कंपनीने एक निर्णय घेतला आहे. व्हीआयने आपले ९९ आणि १२८ रुपयांचे जे रिचार्ज प्लॅन्स आहेत. त्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता कमी केली आहे. Q4 FY23 मध्ये टेल्कोच्या ARPU मध्ये QoQ वाढ झाली नाही. ९९ आणि १२८ रुपयांच्या प्लॅनची वैधता कमी केल्यामुळे व्हीआयला फार मदत मिळणार आहे. याबाबतचे वृत्त telecom talk ने दिले आहे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

हेही वाचा : Weekly Tech Updates: मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या ‘जुगलबंदी’ चॅटबॉटपासून ते रिलायन्स जिओचा फॅमिली रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

गुगलने बार्ड चॅटबॉटमध्ये आणले नवे Magic compose beta फीचर: गुगलने चॅटजीपीटी AI चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी गुगल बार्डची सुरुवात केली. या चॅटबॉटमध्ये गुगलने Magic compose beta हे नवीन फीचर जोडण्यास सुरुवात केली आहे. गुगल बार्डमधील नव्या फीचरमुळे यूजर्संना AI टेकचा वापर करुन संदेशाचा मजकूर लिहिण्यास मदत होणार आहे. मॅजिक कम्पोज बीटा फीचरमुळे लिहिलेला मजकूर रीमिक्स, एक्साइटेड, चिल, शेक्सपियर, लिरिकल, फॉर्मल आणि शॉर्ट या सात वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये रिफ्रेम करणे शक्य होणार आहे. सध्या फक्त RCS-enabled US SIM cards असलेल्या Android फोन्समध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

JioCinema वर तब्बल ३.२ कोटी प्रेक्षकांनी पाहिला IPL चा अंतिम सामना:

जिओ सिनेमावर तब्बल ३.२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा अंतिम सामना पहिला आहे. या संख्येने आधीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले असून जिओसिनेमाने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या क्वालिफायर २चा सामना जो मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये खेळला गेला त्यामध्ये २.५७ कोटी लोकांनी जिओसिनेमावर हा सामना पाहिला. ज्यामध्ये गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने १२९ धावांची शानदार खेळी केली होती. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.

WhatsApp ने रोलआऊट केले Status Archive फिचर: मेटा व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवर वापरकर्त्यांना एक नवीन फिचर देणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वेळ वाचवणारे व खूप कामाचे ठरणार आहे. असे फिचर मेटा इंस्टाग्रामवर आधीपासून देत आहे. दरम्यान कंपनी व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवर Status Archive हे फिचर देणार आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते आपल्या स्टेटसला ३० दिवसांसाठी Archive करू शकणार आहेत. हे फीचर इंस्टाग्राम स्टोरी सारखे आहे जिथे यूजर्सना स्टोरी आर्काइव्ह करण्याचा पर्याय मिळतो.

हेही वाचा : WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी रोलआऊट केले Status Archive फिचर, जाणून घ्या काय होणार फायदा

भारतात अ‍ॅपल स्टोअर्सची मोठी कमाई:

Apple चे सीईओ टीम कुक यांनी भारतात Apple BKC आणि Apple Saket या भारतातील दोन रिटेल स्टोअर्सचे उदघाटन केले. या दोन्ही स्टोअर्सनी मिळून तब्बल ४४ ते ५० कोटींची मासिक विक्री केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे Apple आपल्या मुंबई आणि दिल्लीमधील स्टोअरसाठी अनुक्रमे ४० आणि ४२ लाख रुपये इतके मासिक भाडे देत आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

इंदूरची अस्मी जैन ठरली स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज स्पर्धेची विजेती:

Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लॉन्च करत असते. Apple ने त्यांची वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) २०२३ ची घोषणा केली आहे. हा Apple चा वार्षिक इव्हेंट आहे. या इव्हेंट अगोदर WWDC23 Swift स्टुडंट चॅलेंजच्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. अस्मी जैन या चॅलेंजची विजेती ठरली आहे. जी मध्येप्रदेशची रहिवासी आहे. मध्यप्रदेशच्या इंदूरची रहिवाशी असलेली २० वर्षीय अस्मी जैन ही मेडी-कॅप्स विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. Apple WWDC23 स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजमध्ये स्विफ्ट कोड भाषेचा वापर करुन ओरिजिनल Apps तयार करायचे असतात.या चॅलेंजमध्ये ३० देशांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. 

गेल्या वर्षी ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. त्यापाठोपाठ अनेक कंपन्यांनी याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपले चॅटबॉट देखील लॉन्च केले आहेत.आता AI बाबत अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिव्हिल सर्व्हिसेसच्या इच्छुकांनी चॅटजीपीटीचा वापर सिस्टीमची फसवणूक करण्यासाठी केला आहे. तेलंगणा लोकसेवा आयोग (TPSC) सध्या एका घोटाळ्याची चौकशी करत आहे. जो सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असू शकतो. देशामध्ये पहिल्यांदाच सिव्हिल सर्व्हिस करू इच्छित असणाऱ्याने सिस्टिमला फसवण्यासाठी ChatGPT चा वापर केला आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या प्रकरणामध्ये स्थापित करण्यात आलेल्या एसआयटीला यामध्ये AI चा वापर करण्यात आल्याचे कळले आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.

हेही वाचा : ChatGpt च्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये केली कॉपी ,कमवले १ कोटींहून अधिक रुपये; नेमकं काय केलं?

WhatsAppने एप्रिलमध्ये ७४ लाख भारतीय अकाउंट्स केले बॅन:

WhatsApp: IT नियम 2021 अंतर्गत, WhatsApp दर महिन्याला मासिक सुरक्षा अहवाल( Monthly Sefty Report) जारी करते. कंपनीने एप्रिल महिन्याचा अहवालही प्रसिद्ध केला होता. १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने ७४ लाख भारतीय अकाउंट्सवर बॅन केले आहेत. हे सर्व अकाउंट्स नवीन आयटी नियमाचे पालन करत नव्हते म्हणजेच हे अकाउंटस् कोणत्या कोणत्या स्वरुपात प्लॅटफॉर्मवर चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होते. बँन केलेल्या अकाउंट्सपैकी कंपनीने स्वत:हून २४ लाख अकाउंट्स कोणत्याही तक्रारीशिवाय बॅन केले आहेत.

Twiier ने २५ लाख भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी : Twitter ही एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. एलॉन मस्क हे ट्विटर सीईओ आहे. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरने तब्बल २५ लाख ट्विटर अकाउंट्स बॅन केली आहेत. ही अकाउंट्स कंपनीने मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान बॅन केली आहेत. ट्वीटरने सांगितले २५ मार्च ते २६ अप्रैल दरम्यान, बाल लैंगिक शोषण आणि भावना उद्दीपित करणाऱ्या कंटेंटचा (porn) प्रसार करणाऱ्या तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या सुमारे २५,५१,६२३ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

भारतात सुरू होणार आणखी तीन Apple स्टोअर्स: अ‍ॅपल कंपनी २०२७ पर्यंत भारतामध्ये आणखी ३ स्टोअर्स सुरू करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गचे अ‍ॅपलचे मुख्य वार्ताहर मार्क गुरमन यांनी याबाबत एक ट्विट पोस्ट केले आहे. मार्क गुरमन यांच्या मते , नवीन ३ सुरू होणारी स्टोअर्स पहिल्या २ स्टोअर्सप्रमाणेच मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू होणार आहेत. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील बोरिवलीमध्ये देशातील तिसरे Apple स्टोअर सुरू होऊ शकते. तसेच २०२७ मध्ये पाचवे स्टोअर हे वरळी येथे सुरू केले जाणार आहे. अ‍ॅपल टेक जायंटचे चौथे स्टोअर हे २०२६ मध्ये सुरू होणार आहे. जे राजधानी दिल्लीमधील DLF Promenade मॉलमध्ये आहे. हे भारतातील कंपनीचे सर्वात मोठे दुसरे रिटेल स्टोअर असू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple stores whatsapp and twitter ban accounts chatgpt vi new plan google bard jio cinema check weekly tech updates tmb 01

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×