नुकतेच अ‍ॅपल कंपनीने आपली आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. यामध्ये आयफोन १४ प्रो, प्लस आणि इतर मॉडेल्सह एअरपॉड आणि तीन स्मार्ट हातघडाळींचा देखील समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त या घडाळींमध्ये केवळ वेळ दाखवणे इतपतच फिचर नव्हे तर त्यात आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधित फीचर्स देखील आहेत जी ग्राहकांना आकर्षित करत आहेत. अ‍ॅपल वॉच अल्ट्रा ही या फीचर्सनीयुक्त आहे. मात्र तिची किंमत ही तिच्या पूर्वजांपेक्षा अधिक असल्याने ती ग्राहकांना परवडेल का ? हा प्रश्न आहे. परंतु, त्यातील काही नवीन फीचर्स हे ग्राहकांना नवीन मॉडेल घ्यावे की नाही, यावर विचार करण्यास नक्कीच भाग पाडू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅपल वॉच अल्ट्रामधील ‘हे’ फिचर्स आकर्षित करणारे

मोठी साइज पण..

अ‍ॅपल अल्ट्राची डिझाइन वेगळी आहे. या घडाळीला टायटॅनियम चेसिस आहे. घडाळीत मोठे क्राऊन असून तिला अतिरिक्त अ‍ॅक्शन बटन आहे जिचा वापर एकाधिक कामे करण्यासाठी करता येऊ शकतो. घडाळीची साइज ४९ एमएम इतकी आहे. जुन्या मॉडेल्समध्ये ती ४५ एमएम इतकी आहे, परंतु टायटॅनियम बॉडी असल्याने तिच्या वजनात काही ग्राम्सची भर आहे.

(Iphone In India: आता भारतातच तयार होणार iPhone? टाटा समूहाचा ‘हा’ प्लॅन यशस्वी झाल्यास भारतीयांना…)

घडाळ आहे मजबूत

अल्ट्रा ही घडाळ घराबाहेर फिरणाऱ्यांना विचारात ठेवून बनवण्यात आली आहे. ती २० अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात उत्तम प्रकारे काम करू शकते. त्याचबरोबर, ही घडाळ पाण्यात ४० मीटर खोलीपर्यंत काम करू शकते. ती वॉटर रेझिस्टेन्स असून पाण्यापासून तिला सुरक्षा आहे.

बॅटरी लाइफ

लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी अ‍ॅपल वॉच अल्ट्रा तिच्या दिर्घकाळ पुरणाऱ्या बॅटरी बॅकअपमुळे फायद्याची ठरू शकते. ही घडाळ फुल चार्जमध्ये ३६ तास चालते आणि लो पॉवर मोडमध्ये ती ६० तास चालू शकते. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना फ्लाइटमध्य किंवा लाउंजमध्ये चार्जिग करण्याची आवश्यक्ता भासणार नाही.

(विश्लेषण : सॅटेलाईट फोन, अल्ट्रा वॉच… ॲपलच्या परिषदेत कोणती भविष्यवेधक उत्पादने सादर झाली?)

आकर्षक ट्रेल लूप स्ट्रॅप पण..

अ‍ॅपल वॉच

अल्ट्रा घडाळीचे ट्रेल लूप स्ट्रॅप हे भडक रंगाचे असून ते ऑफिसमध्ये नेणे काहींना अयोग्य वाटू शकते. त्यामुळे ही घडाळ केवळ आउटडोअर अडव्हेंचर्ससाठीच लिमिटेड ठरेल.

नेहमीच्या कामांसाठी अ‍ॅक्शन बटन

घडाळीतील अ‍ॅक्शन बटन पहाड चढल्यानंतर परतीचा मार्ग शोधण्यात तर मदत करतेच, त्याचबरोबर ती हॉटेल शोधण्यात देखील मदत करू शकते. ही घडाळ शहरातील तुमच्या आवडत्या रेस्टॉरेंटचा बुकमार्क बनवून ते शोधण्यात मदत करू शकते. घडाळीत कंपास वेपॉइंट आणि बॅकट्रॅक हे पार्यय देखील आहेत. तसेच, अ‍ॅक्शन बटन कस्टमाइझ्ड करून ती अनेक परिस्थितीत सहज वापरता येते.

(अ‍ॅप्पलने एअरपॉडसह लाँच केल्या ३ दमदार स्मार्ट वॉच, ‘या’ सुरक्षा फिचरची जोरदार चर्चा)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple ultra watch features can attract new buyers ssb
First published on: 11-09-2022 at 12:06 IST