अ‍ॅपल वॉच हे आपल्या नवनवीन फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यातील काही फीचर्स ही लोकांचा जीव वाचवू शकतात अशापैकी आहेत. अ‍ॅपल वॉचने पुन्हा एकदा लाईफ सेव्हिंग या फीचरमुळे सर्वांचे मन जिंकले आहे. मार्सेला ली, सॅन डिएगोच्या CBS 8 न्यूज चॅनेलवरील न्यूज अँकरने अलीकडील स्कीइंग ट्रिप दरम्यान तिच्या मुलाचे प्राण वाचवण्यात या उपकरणाने कशी मदत केली याबद्दल तिचा अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्सेला ली, आपला अनुभव सांगताना म्हणाल्या की, प्रवासात असताना तिच्या १६ वर्षाच्या मुलाला अस्वस्थ वाटत आहे. थोड्या वेळाने त्या मुलाचे ओठ आणि बोटाची टोके निळी पडल्याचे आईच्या लक्षात आले म्हणून तिने मुलाची ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी आपल्या हातातील अ‍ॅपल वॉच त्याच्या मनगटात घातले. त्यानंतर वॉचमध्ये त्याची ऑक्सिजन लेव्हल ही ६६ टक्के असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : अंतराळ-तंत्रज्ञान स्टार्टअप सक्षम होणार; मायक्रोसॉफ्टने केला इस्त्रोसोबत सामंजस्य करार

त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने जवळील रुग्णालयात जाऊन ऑक्सिजन लेव्हल चेक केली असता ती ८८ टक्क्यांपेक्षा कमी होती. म्हणजेच अ‍ॅपल वॉचने दाखवलेली ऑक्सिजन लेव्हल आणि रुग्णालयातील ऑक्सिजन लेव्हल ही अचूक होती. मुलाच्या पुढील टेस्ट केल्यावर लक्षात आले कि मुलाच्या फुफ्फुसात पाणी होते. त्याला हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडेमा (HAPE) ची समस्या आहे. ज्यामुळे त्याचा मृत्यू शकतो असा हा आजार होता. BS 8 च्या अहवालानुसार, कोलोरॅडोमधील १०,००० पैकी जवळपास एक स्कीअर HAPE मुळे प्रभावित होतात.

हेही वाचा : CES 2023: सॅमसंगने लाँच केले ‘हे’ एलईडी टीव्ही; जाणून घ्या खासियत

एका अभ्यासामधून असा निष्कर्ष निघाला आहे की , Apple Watch चा ECG एक अचूक अंदाज म्हणून वापर जाऊ शकतो. हा अभ्यास कॅनडातील niversity of Waterloo येथील संशोधकांनी केला आहे. ईसीजी किंवा इलेक्ट्रोकार्डियोग्राम ही एक चाचणी आहे जी हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या विद्युत सिग्नलची वेळ आणि ताकद नोंदवते. ईसीजी पाहून, डॉक्टर तुमच्या हृदयाच्या ठोक्यांबद्दल माहिती मिळवू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple watch has saved the life of a child with oxygen level low to its feature tmb 01
First published on: 06-01-2023 at 14:32 IST