scorecardresearch

एआय Bard साठी ChatGpt चा डेटा वापरल्याच्या आरोपांवर Google ने दिले उत्तर; म्हणाले…

Google ने घोषणा केली की बार्ड अमेरिका आणि इंग्लंडमधील काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

google denied allegations bard use chatgpt deta
ओपनेआयचे चॅटजीपीटी आणि गुगलचे बार्ड (image credit – loksatta graphics team)

OpenAI कंपनीने आपला CHatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. हे एक कृत्रिम माध्यम आहे. AI ने चॅटबॉट लॉन्च केल्यानंतर अनेक कंपन्या या स्पर्धेमध्ये उतरल्या. CHatGpt ची स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील Bard लॉन्च केला आहे. यानंतर chatgpt गुगलसमोर फार काळ टिकणार नाही अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र काही कालावधीतच त्यामधील कमतरता दिसू लागली होती. बार्डच्या लॉन्चिंगवेळी त्यामध्ये काही एरर दिसून आले होते.

त्यानंतर google वर आरोप करण्यात आला की गुगलने चॅटजीपीटीचा डेटा वापरून बार्डला ट्रेनिंग दिले आहे. IANS च्या रिपोर्टनुसार गूगलने The Verge दिलेल्या एका निवदेनामध्ये हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. गूगलचे प्रवक्ते Chris Pappas यांनी The Verge ला सांगितले की, बार्डला ShareGPT किंवा ChatGPT च्या कोणत्याही डेटावर ट्रेनिंग देण्यात आलेले नाही. शेअरजीपीटीचा उल्लेख करण्यात आला आहे कारण गुगलने शेअरजीपीटी नावाच्या वेबसाइटवरून चॅटजीपीटी डेटा मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा : Bard Google: ChatGpt चं टेन्शन वाढलं, गुगल लवकरच लॉन्च करणार ‘बार्ड’

गुगलचे माजी एआय अभियंता जेकब डेव्हलिन यांनी ओपनएआयमध्ये सामील होण्यासाठी कंपनी सोडली होती असा आरोपही करण्यात आला होता. गुगलच्या माजी कर्मचाऱ्याने चॅटजीपीटीचा डेटा न वापरण्याचा इशाराही गुगलला दिला होता. हे ओपनएआयच्या सेवा अटींच्या विरोधात असल्याचे कर्मचाऱ्याने म्हटले होते.

Google ने अलीकडेच सार्वजनिक चाचणीसाठी Bard रोलआऊट केले आहे. याआधी बार्ड हे लोकांसाठी उपलब्ध नव्हते. आता अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये, Google ने घोषणा केली की बार्ड अमेरिका आणि इंग्लंडमधील काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:05 IST

संबंधित बातम्या