ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून यूपीआय पेमेंट आणि डेबिट कार्डचा वापर अधिक वाढला आहे. त्यांच्या वापरावर ऑनलाइन ई कॉमर्स कंपन्या विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंवर सूट देखील देत आहेत. मात्र क्रेडिट कार्डच्याबाबतीत लोकांमध्ये गैरसमज आहे. क्रेडिट कार्ड घेतल्यास खर्च खूप होईल असा अनेकांचा समज आहे. तो कदाचित खराही असू शकतो. पण क्रेडिट कार्ड जर योग्य प्रकारे वापरले तर त्याचे भरपूर लाभही तुम्हाला मिळू शकतात. हे लाभ कसे मिळू शकतील, याबाबत आपण जाणून घेऊया.

क्रे़डिट कार्डचा वापर करून तुम्ही अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. क्रेडिट कार्डचा योग्य उपयोग केल्याने तुमची बचत होऊ शकते, तसेच लोन घेण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो. सध्या कार लोन, घर लोनसाठी मोठी मागणी आहे. तुमचे घर, कारचे स्वप्न पूर्ण होण्यास क्रेडिट कार्ड मदत करू शकते.

(१० लाख फेसबुक यूजरचा डेटा धोक्यात! मेटाने ४०० अ‍ॅप्सबद्दल केले सावध, असे करतात डेटा चोरी)

क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे आहेत फायदे

क्रेडिट कार्डचा लाभ तुम्ही ग्रेस काळात उपभोगू शकता. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने काही खरेदी करता तेव्हा खरेदी आणि पेमेंटदरम्यान एक ग्रेस काळ असतो. या काळात बँकेकडून व्याज आकारले जात नाही. हा काळ १८ दिवसांपासून ते ५५ दिवसांपर्यंतचा असू शकतो. तुम्हाला जर पैशांची गरज पडली तर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार करू शकता आणि ग्रेस काळ पूर्ण होण्याआधी तुम्ही ते पैसे व्याजाविनाच बँकेला परत करू शकता. म्हणजे अडचणीत क्रेडिट कार्ड खूप फायद्याचा ठरू शकतो.

कर्ज सहज मिळू शकेल

क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करू शकता. क्रेडिट स्कोअर चांगले राहिल्यास तुम्हाला कर्ज मिळण्यास सोपे जाईल. त्याचबरोबर, क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला अचानक आवश्यकता पडल्यास प्रि अप्रुव्हड लोन देखील मिळू शकते.

(लाँच पूर्वीच ONE PLUS BUD PRO 2 चे फीचर लिक, वायरलेस चार्जिंगसह ‘हे’ फीचर देणार स्पष्ट आवाज, जाणून घ्या..)

ईएमआयने भरू शकाल बिल

ज्या वस्तू तुम्ही पूर्ण पैसे देऊन घेऊ शकत नाही, त्या वस्तू तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहज मिळवू शकता, त्यानंतर तुम्ही ईएमआयने पैसे भरू शकता. ईएमआयचे दोन प्रकार असतात. नो कॉस्ट ईएमआय आणि व्याजासोबत ईएमआय. नो कॉस्ट ईएमआय ३ ते ९ महिन्यांपर्यंत असतो. यात तुमच्यापासून व्याज घेतले जात नाही. तर व्याज असलेल्या ईएमआयचा कालावधी एक वर्षांहून अधिकचा असतो. यात थोड्या व्याजासह ईएमआय मिळतो.

ईकॉमर्स कंपन्या देतात सूट

सणासुदीचे दिवस आहेत. या काळात खरेदीचे प्रमाण वाढले आहे. तसेच ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांनी सेल सुरू केल्यानंतर खरेदीमध्ये अजून भर पडली आहे. ईकॉमर्स कंपन्यांकडून क्रेडिट कार्डच्या वापरावर सूट देण्यात येते. तुम्ही निवडलेली वस्तू क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विकत घेतल्यास इन्स्ट्ंट डिस्काउंट किंवा इतर लाभ मिळू शकतात.