आधुनिक काळात फोन ही जवळपास प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. ऑनलाइन व्यवहारांपासून अनेक महत्त्वाची कामे स्मार्टफोनवरून केली जात आहेत. तसंच लोक अनेकदा एक चांगला बजेट फोन शोधत असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही असा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, ज्यामध्ये मजबूत बॅटरीसह आधुनिक फीचर्स असतील आणि तो ८००० रुपयांच्या आत उपलब्ध असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अशाच काही स्मार्टफोन्सची माहिती इथे आहे. यामध्ये Realme, Redmi आणि Samsung तसेच Tecno कंपनीचे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. या सर्व फोनमध्ये 5000mAh असण्यासोबतच तुम्हाला 3GB पर्यंत RAM ची सुविधा देखील देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन्सची संपूर्ण माहिती…

SAR Televenture takes over Tikona for Rs 669 crores print eco news
‘एसएआर टेलीव्हेंचर’चा ६६९ कोटींच्या मोबदल्यात ‘तिकोना’वर ताबा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Tecno Spark 8C: फोन Android v11 द्वारे समर्थित आहे, 3GB RAM सह जोडलेला आहे. फोनमध्ये octa-core (1.6 GHz, dual core + 1.6 GHz, hexa core) प्रोसेसर आहे. तसंच ग्राहकांना 6.6-इंचाचा (16.76 सेमी) डिस्प्ले मिळतो, जो 267 PPI, IPS LCD 90 Hz रिफ्रेश रेटसह येतो. कॅमेरामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश आहे, ज्यामध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय बॅटरीसाठी 5000 mAh नॉन रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 7,899 रुपये आहे.

Realme Narzo 50i: तुम्ही हा फोन 7,499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. Realme Narzo 50i च्या कार्यक्षमतेबद्दल बोलायचं झालं तर ते Octa Core, 1.6 GHz द्वारे समर्थित आहे. यात 2GB रॅम सपोर्ट आहे आणि स्टोरेजसाठी 32GB आहे. पण, तुम्ही मायक्रो कार्डने 256 GB पर्यंत वाढवू शकता. याशिवाय यात 4GB + 64GB व्हेरिएंट देखील दिले आहेत. हा फोन 6.5 इंच (16.51 सेमी) डिस्प्ले, 270 PPI, IPS LCD 60 Hz रिफ्रेश रेटसह येतो. कॅमेरा 8 MP प्राथमिक कॅमेरा, LED फ्लॅश आणि 5 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh न काढता येणारी बॅटरी देखील आहे.

आणखी वाचा : आता लपवता येणार ‘Last Seen’ चा स्टेटस, WhatsApp आणतंय एक नवीन फीचर

Samsung Galaxy A03 Core: सॅमसंगचा हा फोन फक्त 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज ऑप्शनसह देण्यात आला आहे. या फोनची किंमत 7,598 रुपये आहे. त्याच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर त्यात Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच यात 5000 mAh बॅटरी, 8 MP रियर कॅमेरा आणि समोर 5 MP कॅमेरा आहे. डिस्प्लेसाठी, यात 720 x 1600 पिक्सेल आणि 270 ppi सह 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन Android v11 वर चालतो आणि Octa core, 1.6 GHz, Cartex A55 द्वारे समर्थित आहे.

आणखी वाचा : YouTube Shorts मध्ये मिळणार TikTok चे एक खास फिचर, रिमिक्स व्हिडीओ बनवण्यासाठी उपयोगाचे

Redmi 9A Sport: Xiaomi च्या या फोनची किंमत 6,999 रुपये आहे. हा फोन Android v10 द्वारे समर्थित आहे. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन ऑक्टा कोर (2 GHz, Quad Core + 1.5 GHz, Quad core), MediaTek Helio G25 द्वारे समर्थित आहे. यात 2GB रॅमसह 32GB स्टोरेज आहे. डिस्प्लेमध्ये 6.53-इंच (16.59 सेमी) 269 PPI, IPS LCD आहे. तसंच बॅक कॅमेरा 13 MP प्राइमरी एलईडी फ्लॅशसह येतो. याशिवाय 5 MP चा फ्रंट कॅमेरा देखील यात देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅटरीमध्ये 5000 mAh न काढता येणारी बॅटरी देण्यात आली आहे. त्याचा स्टोरेज ऑप्शन 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. पण, याचा आणखी एक व्हेरिएंट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो.