WhatsApp मॅसेजिंग अॅपने अलीकडेच अनेक फिचर्स आणली आहेत. जी लवकरच सर्व यूजर्ससाठी सादर केली जाईल. या फीचर्समध्ये कम्युनिटीज, इमोजी रिअॅक्शन्स, युजर्ससाठी 2GB डेटा शेअरिंग, एका टॅबमध्ये ३२ लोकांना कॉल करण्याची सुविधा दिली जाईल. तसंच आता मॅसेजिंग अॅप आणखी एक फिचर आणत आहे.

WABetaInfo च्या अलीकडील अहवालानुसार, मेटा-मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म एका फिचरवर काम करत आहे जेथे युजर्स त्यांचे “लास्ट सीन” स्टेटस लपवू शकतील. iOS युजर्ससाठी नवीन व्हॉट्सअॅप बीटा वर्जनमध्ये याची चाचणी केली जात असल्याची माहिती आहे.

, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
ChatGPT now has its own web search engine
OpenAI’s Search Engine : OpenAI चे नवे सर्च इंजिन! अचूक माहिती शोधणे होणार सोपे; विनामूल्य करता येईल वापर
IAS Whatsapp Group Controversy
IAS Whatsapp Group Controversy : IAS अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठा गोंधळ; केरळ सरकार करणार चौकशी, तर फोन हॅक झाल्याचा अधिकाऱ्याचा दावा
Singham Again OTT Release
‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी

या फीचरच्या रोलआउटनंतर, कोणताही युजर त्याचे लास्ट सीन फक्त त्या लोकांना दाखवू शकतो ज्यांना तो दाखवू इच्छितो. म्हणजेच, आता तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप गुपचूप वापरण्यास सक्षम असाल आणि तुम्ही व्हॉट्सअॅपवर अॅक्टिव्ह असताना इतर लोकांना त्याबद्दल माहितीही नसेल.

आणखी वाचा : Infinix Hot 11 2022 स्मार्टफोन ८,९९९ रूपयांना लॉन्च, बॅटरी एका चार्जवर २२ तास टिकेल

हे फिचर कसे वापरावे
सर्वप्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. या फीचरसाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल, जिथे तुम्हाला प्रायव्हसी सेक्शनवर क्लिक करावे लागेल. नंतर “लास्ट सीन” पर्यायावर जावे लागेत आणि “Everyone,” “conatct List” आणि “कोणतीही नाही” मधील पर्याय निवडा. यानंतर हे फीचर तुमच्या व्हॉट्सअॅपवरही काम करण्यास सुरुवात करेल.

प्रोफाइल पिक्चरसाठीही सुविधा सुरू होईल
याव्यतिरिक्त, Whatsapp ने प्रोफाईल पिक्चर्स आणि “अबाउट” सेक्शनसाठी देखील असेच फिचर सादर करणे अपेक्षित आहे. या फीचरमुळे यूजर्स हे ठरवू शकतील की त्यांचे व्हॉट्सअॅप प्रोफाइल पिक्चर कोण पाहू शकतात. रिपोर्ट्सनुसार, तुम्ही WhatsApp सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > लास्ट सीन / प्रोफाईल फोटो / अबाउट हे फीचर उघडल्यास तुम्हाला ‘Accept My Contacts…’ नावाचा नवीन पर्याय मिळू शकेल.