Bharati Airtel ही भारतामधील एक ५ जी नेटवर्क देणारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन पोस्टपेड , प्रीपेड रीचार्ज प्लॅन आणत असते. तसेच Reliance Jio सह एअरटेल कंपनीने आपले ५ जी नेटवर्क देशातील अनेक शहरांमध्ये सुरू केले आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी एक रीचार्ज प्लॅन घेऊन आला आहे. तर हा रीचार्ज प्लॅन नक्की काय आहे आणि यामध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ही जाणून घेऊयात.

ग्राहक शक्यतो प्रत्येक महिन्याच्या महिन्याला रीचार्ज करतो किंवा ३ महिन्यांचा रीचार्ज एकदम करतो. मात्र या आपण जर का वर्षभराचा रीचार्ज प्लॅन खरेदी केला तर एकाच वेळेला जास्त पैसे लागतात मात्र तो थोडा अधिक फायदेशीर ठरू शकतो. आज आपण एअरटेलच्या अशा रीचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊयात ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला केवळ १५० रुपये खर्च करावे लागू शकतात.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
Disney pushing users towards paying for their own account and Stop password sharing From June
नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी?
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

हेही वाचा : Google I/O 2023 मध्ये लॉन्च झाले Android 14; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनमध्ये करता येणार डाउनलोड?

एअरटेलच्या या रीचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवस म्हणजेच पूर्ण वर्षभराची वैधता मिळते. त्यासाह मोफत एसएमएस आणि डेटाचा फायदा मिळतो. हा एअरटेलचा प्लॅन १,७९९ रुपयांचा वर्षभरासाठी येतो. हा प्लॅन खरेदी केल्यास प्रत्येक महिन्याला रीचार्ज करावा लागणार नाही. तसेच यामध्ये ३६०० एसएमएस मोफत करता येतात.

या १,७९९ च्या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजे वर्षामध्ये तुम्हाला २४ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच अन्य फायद्यांचा विचार केला असता यामध्ये Extreme App प्रीमियम, Airtel मोफत Hello Tune, अनलिमिटेड डाउनलोडसह Wync Musicचे सब्स्क्रिप्शन सुद्धा मोफत देण्यात येते.

हेही वाचा : भारतात लॉन्च झालेल्या Google Pixel 7a वर मिळतोय ४ हजार रुपयांचा डिस्काउंट, HDR सपोर्टसह मिळणार…

Airtel आणि Reliance Jio या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. मात्र VI कंपनीला अजूनही आपले ५ जी नेटवर्क देशात सुरू करता आलेले नाही.