Bharati Airtel भारतातील एक टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम रिचार्ज पॅक सादर केला आहे. लॉन्च करण्यात आलेला प्लॅन हा प्रीपेड वापरकर्त्यांसाठी आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणकोणते फायदे मिळणार आहे आणि हा प्लॅन किती रुपयांचा आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

एअरटेलने ७७९ रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ९० दिवसांची वैधता मिळणार आहे. दीर्घ वैधता असणारा प्लॅन ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

हेही वाचा : एअरटेलच्या ‘या’ पॅकमध्ये मिळवा १५ ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिपशन आणि फ्री डेटादेखील

एअरटेलच्या या ७७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्ते भारतातील कोणत्याही नेटवर्कवर फोन करू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सचा आनंद घेता येत येणार आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये डेली १.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. दिवसाच्या डेटाची मर्यादा संपली तर स्पीड ६४ KBPS इतका होतो.

एअरटेलच्या ७७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस करण्याचा फायदा मिळणार आहे. दिवसाची एसएमएस करण्याची मर्यादा संपल्यास वापरकर्त्यांना लोक एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये मोजावे लागणार आहेत. ७७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे मूल्य वाढवण्यासाठी एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांना अनलिमिटेड ५ जी डेटा, Apollo 24|7 Circle मेंबरशिप, Wynk Music आणि फ्री हॅलो ट्यून्स असे अनेक फायदे दिले आहेत. मात्र या प्लॅनमध्ये कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश नाही.

एअरटेल कंपनी सध्या एअरटेल UPI वापरून केलेल्या व्यवहारांवर कॅशबॅक ऑफर करते. ही ऑफर एअरटेल UPI वर जून २०२३ दरम्यान केलेल्या पहिल्या तीन व्यवहारांसाठी वैध असणार आहे. वापरकर्ते एअरटेल थँक्स App pay सेक्शनचा वापर करून सहजपणे त्यांचा प्लॅनचा रिचार्ज करू शकतात.