एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम स्मार्ट रिचार्ज पॅक सादर केला आहे. या रिचार्ज पॅकमध्ये, वापरकर्त्यांना १५ पेक्षा जास्त OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर अधिक ओटोटी अ‍ॅप्स पाहण्याची इच्छा असल्यास, हा पॅक तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. कारण या प्लॅनमध्ये १५ पेक्षा जास्त अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन फक्त १४८ रुपयांमध्ये दिले जात आहे. यासोबतच हे अ‍ॅप्स चालवण्यासाठी फ्री डेटाही दिला जात आहे.

एअरटेल १४८ पॅक असा अ‍ॅड ऑन पॅक सुरु केला आहे. म्हणजे तुम्हाला नियमित प्लॅन रिचार्ज करावा लागेल. तुम्ही नियमित एक महिन्याचा रिचार्ज प्लॅन करत असाल, तर यात अ‍ॅड ऑन डेटा पॅकची वैधता तुमच्या नियमित एका महिन्याच्या प्लॅनइतकीच असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना १ GB फ्री डेटा दिला जातो आहे. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉल करण्याची सुविधा मिळत नाही. पण हा प्लान १५ पेक्षा जास्त OTT अ‍ॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये Sony Liv, Lionsgate Play, Eros Now, Hoichoi, ManoramaMax आणि Airtel Xstream Play चे मोफत सबस्क्रिप्शन ३० दिवसांसाठी दिले जाते.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

हेही वाचा – WhatsAppने एप्रिलमध्ये ७४ लाख भारतीय अकाउंट्स केले बॅन! तुम्ही करत नाही ना ही चूक?

हा पॅक का आहे फायदेशीर

जर तुम्ही हे १५ अ‍ॅप्स ३० दिवसांसाठी वेगळे रिचार्ज केले तर तुम्हाला ५०० ते ६०० रुपये खर्च करावे लागतील. एअरटेलच्या १४८च्या अ‍ॅड ऑन प्लॅनमध्ये डेटासह १५ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

टीप – जर तुम्ही 3 महिन्यांसाठी रिचार्ज करत असाल, तर त्या कालावधीत तुम्हाला १५ अ‍ॅप्सचे जास्तीत जास्त ३० दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. त्याचप्रमाणे जर नियमित रिचार्ज प्लॅन कमी दिवसांचा असेल तर योजना लवकरच संपेल.