ट्विटर कंपनीचे मालक बनल्यापासून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्याने चर्चेत आहेत. ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. मात्र आता हे निर्णय त्यांच्याच अंगाशी येत असल्याचे दिसत आहे. या निर्णयांमधील एक निर्णय म्हणजे ब्लु टिकसाठी युजरला महिन्याला ८ डॉलर मोजावे लागणार. यानंतर कोणीही हे ब्लु टिक विकत घेऊ शकेल असे मस्क यांचे म्हणणे होते. पण या निर्णयामुळे मस्क यांनाच मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काही निवडक देशांमध्ये ब्लु टिकचा नवा नियम लागू झाला आहे. यामुळेच अनेक युजर्सच्या नावापुढे आता ब्लु टिक पाहायला मिळत आहे. नुकतीच एक बातमी व्हायरल झाली आहे. यानुसार ‘येशू ख्रिस्त’ यांच्या ट्विटर अकाउंटलाही ब्लु टिक मिळाले आहे. यानंतर सर्वच युजर थक्क झाले आहेत. मात्र यात काहीही आश्चर्यकारक नाही कारण आता कोणीही ब्लु टिक सहज विकत घेऊ शकतं.

Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
Services sector growth at 14 yr high
सेवा क्षेत्राची सक्रियता १४ वर्षांच्या उच्चांकी; महिनागणिक किंचित मंदावूनही एप्रिलमध्ये ६०.८ गुणांवर
malaysia development berhad scandal
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
women employees, India centers,
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील केंद्रांत ५ लाख स्त्री कर्मचारी, ‘एग्झिक्युटिव्ह’ उच्चपदस्थ मात्र केवळ ६.७ टक्के
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
What is Sleep Divorce
Sleep Divorce म्हणजे काय? जोडप्यांनी रात्री वेगळं झोपणं कितपत फायदेशीर?
Women at workplace
लैंगिक समानता असलेल्या कंपन्यांमध्ये महिला असतात अधिक प्रामाणिक, सर्वेक्षणातून अनेक खुलासे समोर!
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर

येशू ख्रिस्ताचे हे अकाउंट २००६ पासून ट्विटरवर आहे. या अकाऊंटच्या बायोमध्ये ‘कार्पेंटर, हीलर आणि गॉड’ असे लिहले आहे. तसेच या प्रोफाईलवर येशू ख्रिस्ताचे विकिपीडिया पेजही लिंक केले गेले आहे. या अकाउंटला आठ लाखांहुनही अधिक लोक फॉलो करत आहेत आणि आता हे अकाउंट व्हेरीफाईडही झाले आहे.

“…हाच आहे का तुझा संघर्ष?”; ‘स्ट्रगल इज रिअल’ म्हणणाऱ्या सई ताम्हणकरवर नेटकरी भडकले

Twitter Blue Tick: ट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय

हे असे एकच बनावट अकाउंट नाही ज्याला ब्लु टिक मिळाले आहे. गेमिंग पात्र सुपर मारिओ आणि इतर अनेक अकाउंट्सनी आठ डॉलर्स भरून ब्लु टिक मिळावले आहे. अशाचप्रकारे भविष्यात इतरही अनेक बनावट अकाउंट्सना ब्लु टिक मिळू शकते. याच गोष्टीमुळे अनेक युजरर्स नाराज आहेत. यामुळे विश्वासार्ह्य अकाउंट्सची ओळख पटवणे कठीण होईल अशी भीती युजर्सना आहे.

दरम्यान, ट्विटरनं या आठवड्यात लॉंच केलेलं ट्विटर ‘ब्लू टीक’ सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द केलं आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे.